नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत (Nanded APMC) असलेल्या नवा मोंढा बाजारात नवीन हळदीची आवक (Turmeric Arrival) सुरू झाली आहे. बुधवारी (ता. १) भोकर तालुक्यातील मसलगा येथील शेतकरी शेषराव गुणाराव बिरगाळे यांनी २६ क्विंटल हळद विक्रीसाठी (Turmeric Rate) आणली होती. यास ६२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
राज्यात सांगली, हिंगोलीनंतर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होते.
या ठिकाणची हळद खरेदी करण्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आदी राज्यांतून व्यापारी येतात. व
र्षभर हळद विक्रीचा व्यवहार या ठिकाणी चालतो. नांदेड बाजार समितीला हळदीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून बाजार शुल्काच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पन्न मिळते.
सध्या बाजारात मागील वर्षीच्या हळद विक्रीचा व्यवहार होत आहे. अशातच बुधवारी (ता. १) नवीन हळदीची आवक सुरू झाली. शेतकरी शेषराव गुणाराव बिरगाळे (रा. मसलगा, ता. भोकर) यांनी २६ क्विंटल हळद विक्रीसाठी आणली होती.
यास ६२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीची सचिव साहेबराव बारहाते यांनी दिली. लिलाव शेडमध्ये शेषराव बिरगाळे यांचा बाजार समितीकडून सत्कार करण्यात आला.
या वेळी बाजार समितीचे सहायक सचिव माणिक बारसे, गणेश भारसावडे, रवींद्र कल्याणकर, बबन शेळके, उद्धव कदम, विजय मंगनाळे यांच्यासह व्यापारी मधूकर देशमुख, प्रल्हाद बागल, विजयकुमार गोयंका, द्वारकादास मुंदडा, आनंद धूत, पप्पू मंत्री, रमेश आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.