Turmeric Market Rate: जानेवारी महिन्यात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक (Maize Arrival) मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन (Soybean Arrival) यांचीही आवक कमी राहिली. तुरीचा हंगाम (Tur Season) सुरू झाला आहे.
तुरीची आवक जानेवारी महिन्यात वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातसुधा ती वाढती असेल. हळद (Turmeric), हरभरा व कांदा यांची आवक स्थिर होती तर टोमॅटोची आवक घटली.
जानेवरी महिन्यात मूग व टोमॅटो वगळता सर्व शेतीमालाच्या किमती घसरत होत्या. मुगाचा आवक हंगाम संपला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कापसाच्या व सोयाबीनच्या किमतींमध्ये नरमाई आली.
चांगल्या पिकाच्या अपेक्षेने व बाजारात पुरेसा साठा असल्याने हरभऱ्याची किमती घसरत आहेत. पुढील महिन्यात तुरीचे दर वाढत्या आवकेमुळे घटले तरी ते हमीभावाच्या वर राहतील, अशी अपेक्षा आहे.
२७ जानेवारी रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) डिसेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ०.८ टक्क्याने वाढून रु. २९,९१० वर आले होते;
या सप्ताहात मात्र ते ०.३ टक्क्याने घसरून रु. २९,८२० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) ०.४ टक्क्याने घसरून रु १,६१२ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.
मका
मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,२४० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४ टक्क्यांनी घसरून रु. २,१५० वर आल्या आहेत.
फ्यूचर्स (फेब्रुवारी डिलिव्हरी) किमती रु. २,१६० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. २,१८३ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.
हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. ७,३९२ वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ७,२४४ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,७८८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,४५० वर आल्या आहेत. एकंदर किंमत वाढीचा कल आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात १.५ टक्क्याने घसरून रु. ४,९१४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.१ टक्क्याने घसरून रु. ४,८६१ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.
मूग
मुगाच्या किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. याही महिन्यातसुद्धा हा कल कायम आहे. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ३.५ टक्क्यांनी वाढून रु. ८,०७५ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती १.३ टक्क्याने घसरून रु. ८,००० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) १.७ टक्क्याने घसरून रु. ५,६५६ वर आली होती; या सप्ताहात ती पुन्हा १.३ टक्क्याने घसरून रु. ५,५८३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून ६,९५० वर आली होती. या सप्ताहात ती १.३ टक्क्याने घसरून रु. ६,८६० वर आली आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.
कांदा
कांद्याची किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२८८ होती; या सप्ताहात ती रु. १,२७५ वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ८६७ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ८३३ वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.