Mango Market : विदर्भात कैरीला ५००० रुपयांवर दर

Unripe Mango : कळमना बाजारात कैरीची आवक सुरुवातीला ४० क्‍विंटल होती. ४००० ते ४५०० असा दर होता. आता दर ४००० ते ५००० रुपयांवर पोहोचले आहेत.
Mango Season
Mango SeasonAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यांतून होणारी बैंगनपल्ली तसेच लालपट्टा वाणाच्या आंब्याची आवक मंदावल्याने विदर्भातील कळमना तसेच अमरावती बाजार समितीत स्थानिक कच्च्या आंब्यांना (कैरी) मागणी वाढून दर तेजीत आले आहेत. कळमना बाजारात कैरीची आवक सुरुवातीला ४० क्‍विंटल होती. ४००० ते ४५०० असा दर होता. आता दर ४००० ते ५००० रुपयांवर पोहोचले आहेत.

अमरावती बाजार समितीचा विचार करता बैंगनपल्ली आंब्याची आवक काही प्रमाणात होत होती. या ठिकाणी आंब्याचे व्यवहार ५००० ते ७००० रुपयांनी होत होते. त्यासोबतच लालपट्टा आंबा वाणाचे दर देखील ५००० ते ७००० रुपयांपर्यंत होते. त्यानंतर या दोन्ही आंबा वाणांची आवक सातत्याने कमी होत गेली.

Mango Season
Mango Season : पुणे बाजार समितीत हापूसची तुरळक आवक सुरू

आता अमरावती बाजारात या आंब्यांची आवक शून्यावर आली आहे. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या बागेतील कैऱ्यांना मागणी वाढून दरातही सुधारणा नोंदविण्यात आली आहे. अमरावती बाजारातील कैरीची आवक सध्या १०० क्‍विंटलच्या पुढे आहे.

Mango Season
Mango Season : राजापूरमधून आंबा पेटी अहमदाबादला रवाना

शनिवारी (ता. ३०) या बाजारात १० क्‍विंटल आवक नोंदविली गेली. ३००० ते ४००० रुपयांनी कैरीचे व्यवहार होत आहेत. नागपूरच्या कळमना बाजाराचा विचार करता या बाजारात कैरी आवक अत्यल्प ५० क्‍विंटल इतकी आहे.

२० मार्चला २५०० ते ४००० रुपयांपर्यंत दर खाली आले होते. आता दर ४००० ते ५००० रुपयांवर पोहोचल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यांतून आवक वाढल्यास स्थानिक आंबा वाणांच्या दरावर परिणाम होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com