Mango Season : पुणे बाजार समितीत हापूसची तुरळक आवक सुरू

Pune Hapus Market : हवामान बदलांच्या गर्तेत अडकलेल्या कोकण हापूस आंब्याच्या हंगामाला पुणे बाजार समितीमधील तुरळक आवकेने प्रारंभ झाला. गेल्या दोन महिन्यांपासून बिगर हंगामी आवक होत होती.
Mango Market
Mango MarketAgrowon
Published on
Updated on

Pune Mango News : हवामान बदलांच्या गर्तेत अडकलेल्या कोकण हापूस आंब्याच्या हंगामाला पुणे बाजार समितीमधील तुरळक आवकेने प्रारंभ झाला. गेल्या दोन महिन्यांपासून बिगर हंगामी आवक होत होती. मात्र आता मुख्य हंगामाच्या आंब्याची आवक सुरू झाली आहे.

गुरुवारी (ता. १८) आडते असोसिएशनचे सचिव करण जाधव यांच्या पेढीवर पावस (जि. रत्नागिरी) येथील शेतकरी समीर हरचिरकार यांच्या बागेतील ५ डझनाच्या पेटीची आवक झाली. या वेळी हंगामातील पहिल्या पेटीची विधीवत पूजा करून हंगामाचा प्रारंभ झाला असून, पहिली पेटी युवराज काची यांनी २३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे जाधव यांनी सांगितले.

Mango Market
Mango Season : सातपुड्यात आंबा बागांना मोहर कमी

यंदाच्या हापूस हंगामाबाबत बोलताना जाधव म्हणाले, की यावर्षी अवकाळी पाऊस, थंडीची कमतरता यामुळे मोहर कमी लागल्याने सुरुवातीच्या टप्प्यात हापूसची आवक कमी राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहराचा हंगाम जोमत राहण्याचा अंदाज आहे. Mango

Mango Market
Longest Hapus Leaf : हापूसच्या सर्वाधिक लांबीच्या पानाची गिनेस बुकमध्ये नोंद

हंगामातील आवक टप्प्याटप्प्याने वाढेल. साधारण १० फेब्रुवारीपासून दररोज ५० पेट्यांची आवक सुरू होऊन, मार्चमध्ये मोठी आवक होईल. यानंतर दुसऱ्या बहाराच्या आंब्याची मुबलक आवक एप्रिल मे महिन्यात होईल.

याबाबत शेतकरी समीर हरचिरकार म्हणाले, की आमची ६० झाडे असून, पहिल्या टप्प्यातील पहिली पेटी गुरुवारी (ता. १८) पुण्यात पाठविली. सध्यातरी हवामान चांगले असून, थंडी पडायला सुरू झाल्याने दुसऱ्या बहरातील आंब्याचे चांगले उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com