Turmeric Crop Disease: हळदीवरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना

Turmeric Leaf Spot Measures: यंदा हळदीची लागवड २५ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज जाणकरांनी सांगितला आहे. मात्र, काही भागांत हळदीमध्ये करपा रोग आढळल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकरी सोप्या उपाययोजना करुन हळदीचे उत्पादन वाचवू शकतात.
Leaf Spot in Turmeric
Leaf Spot in TurmericAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती:

१. हळदीवर करपा रोग 'कोलेटोट्रिकम कॅपसिकी' बुरशीमुळे होतो, विशेषतः सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये.

२. ढगाळ वातावरण, जास्त पाऊस, कमी निचरा, २१-२३°C तापमान व ८०% आर्द्रता रोग वाढवतात.

३. पानांवर तपकिरी अंडाकृती ठिपके येऊन पाने करपतात व गळतात.

४. प्रकाशसंश्लेषण थांबल्याने कंदाची वाढ खुंटते व उत्पादन घटते.

५. नियंत्रणासाठी स्वच्छता, रोगग्रस्त पाने जाळणे आणि शिफारस केलेली बुरशीनाशक फवारणी करावी.

Halad Disease Management: मागील दोन वर्षांपासून हळदीला चांगला भाव मिळाला सध्याही हळदीचे दर स्थिर आहेत. त्यामुळे यंदा हळदीची लागवड २५ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज जाणकरांनी सांगितला आहे. मात्र, काही भागांत हळदीमध्ये करपा रोग आढळल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

कोलेटोट्रिकम कॅपसिकी या बुरशीमुळे हळदीवर करपा रोग होतो. या रोगाची तीव्रता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत जास्त असते. साधारणत: हळदीच्या एका रोपाला १० ते १२ पाने असतात. काढणीपर्यंतपण तेवढेच पाने असणे अपेक्षित असते. त्यामुळे हळदीचे उत्पादन चांगले मिळते. शास्त्रज्ञांच्या मते एका रोपाला एक किलो हळकुंड लागल्यास प्रत्येक पानाचा १०० टक्के वापर झाला, असे म्हणू शकतो.

Leaf Spot in Turmeric
Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

रोगासाठी अनुकुल घटक

अत्यंत ढगाळ वातावरण आणि भरपूर पाऊस या दोन्ही गोष्टी रोग वाढतो. सोबत पाण्याचा निचरा कमी होणाऱ्या जमिनीत ही बुरशी सक्रिय होते. साधारणत: २१ ते २३ अंश सेल्सियस तापमान आणि ८० टक्के आद्रता या रोगाच्या वाढीसाठी अनुकुल असते. याकाळात बुरशी सक्रिय होऊन प्रादुर्भाव वाढवते. 

करपा रोगाची लक्षणे

पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. त्यांना उन्हाकडे धरुन पाहिल्यास त्यामध्ये अनेक वर्तुळे दिसतात. 

या रोगाची तीव्रता वाढल्यास रोगट भाग पूर्णत: वाळतो आणि तांबूस-राखाडी रंगाचा दिसतो. असे ठिपके वाढून संपूर्ण पान करपते आणि तांबूस- तपकिरी रंगाचे दिसायला लागते. थोड्या दिवसात हे पान गळून जाते. 

नुकसान

ही बुरशी पानांवर पसरते त्यामुळे पान करपते. करपलेल्या पानामध्ये प्रकाशसंश्लेषण म्हणजेच अन्ननिर्मितीची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. कंदाच्या वाढही पूर्ण होत नाही.

नियंत्रण

या रोगाच्या नियंत्रणासाठी हळद संशोधन योजनेतील संशोधक डॉ. मनोज माळी यांनी उपाय सुचविले आहे. नियमितपणे शेताचे निरीक्षण करावे. या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगग्रस्त पाने, फुले यांच्यामार्फत होतो. त्यामुळे रोगग्रस्त पाने, फुले गोळा करुन त्वरित जाळून नष्ट करावीत. शेतामध्ये स्वच्छता ठेवावी.

हळदीवरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी २० ते २५ ग्रॅम मँकोझेब (७५ डब्ल्यू. पी.) किंवा १० ते १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू. पी.) किंवा २५ ते ३० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड (५० डब्ल्यू. पी.) प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

रोगाची तीव्रता वाढल्यास प्रोपीकोनॅझोल (२५ ई. सी.) ५ ते १० मि.लि. किंवा क्लोरोथॅलोनील (७५ डब्ल्यू. पी.) २० ते २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून शेतात फवारावे.

हवामानाच्या अंदाजानुसार सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. हळदीवरील करपा रोग कधी जास्त दिसतो?

जास्त पाऊस आणि आद्रता, सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत करपा जास्त होतो.

२. करपा रोगाची मुख्य कारणे कोणती?
जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण, व पाण्याचा कमी निचरा होणारी जमीन असल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

३. करपा रोगाची लक्षणे कशी ओळखावी?
पानांवर तपकिरी अंडाकृती ठिपके व वर्तुळाकार डाग दिसतात.

४. या रोगामुळे किती नुकसान होते?
पाने करपून गळतात, अन्ननिर्मिती थांबते व कंद लहान राहतात.

५.करपा रोगाचे नियंत्रण कसे करावे?
रोगग्रस्त पाने जाळणे, शेताची स्वच्छता, व मँकोझेब/कार्बेन्डाझिम/बोर्डोमिश्रण यांची फवारणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com