Rice : भात पिकावरील कीड, रोगाचे नियंत्रण कसे कराल?

भात पीक सध्या फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता भात खाचरात पाणी बांधून ठेवून पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी.
pests and diseases on rice crop
pests and diseases on rice cropAgrowon
Published on
Updated on

भात पीक (Rice Crop) सध्या फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता भात खाचरात पाणी बांधून ठेवून पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी. पाणथळ भागातील भात खाचरात पाणी साठून राहिल्यामुळे भात पिकावर निळे भुंगेरे, सुरळीतील अळी आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भात खाचरात पाणी खेळते राहील याची काळजी घ्यावी. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता दोन ते तीन दिवसांच्या अंतराने फोडून लावावे व नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. भात खाचरातील बांधावरील गवत काढून बांध तणमुक्त ठेवावेत. जेणेकरून किडींच्या खाद्य वनस्पतींचा समूळ नायनाट केल्याने भात पिकावरील किडींच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यास मदत होईल.निळे भुंगेरे, सुरळीतील अळी, पाने गुंडाळणारी अळी आणि खोडकिडीच्या नियंत्रणासाठी डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पुढील उपाय सुचविले आहेत.

pests and diseases on rice crop
पीक सल्ला : खरीप भात, आंबा, काजू, सुपारी, नारळ, भाजीपाला_फळबाग रोपवाटिका

- निळे भुंगेरे या किडीची अळी आणि प्रौढावस्था हानिकारक असते निळे भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात व पानाची सुरळी करून आतील हरित भाग खातात. परिणामी पानांवर पांढरे पट्टे दिसून येतात.

- पाने गुंडाळणाऱ्या किडीची अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिटकवून पानांची गुंडाळी करते व त्यात राहते. अळी आतील पृष्ठभागातील हरित द्रव्य खाते त्यामुळे गुंडाळीच्या बाह्य पृष्ठभागावर पांढरे चट्टे दिसून येतात.

- सुरळीतील अळी कोवळे पान कापून त्याचे लहान लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसते. अळीच्या नियंत्रणासाठी भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. शेतातील पाणी एका बाजूने बाहेर काढावे जेणेकरून सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी.

pests and diseases on rice crop
भात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

नियंत्रण कसं करायचं ?- पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी आणि निळ्या भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी लॅंम्ब्डासायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) पाच मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप असताना फवारणी करावी. लक्षात ठेवा सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत. - पावसाची उघडझाप आणि ढगाळ वातावरणामुळे पाणथळ भागातील भात पिकातील खाचरात पाणी साठून राहिल्यामुळे तसेच जिथे घनदाट लागवड आणि नंतर खताची आवाजवी मात्रा दिली असलेल्या क्षेत्रात तपकीरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोपांच्या चुडात पाच ते दहा तुडतुडे आढळल्यास ॲसिफेट (७५ टक्के) पाण्यात विरघळणारी भुकटी २२.५ ग्रॅम किंवा फिप्रोनील (५ टक्के प्रवाही) २० मिली किंवा इमीडाक्लोप्रीड (१७.८ % प्रवाही) २ मिली किंवा थायामिथॉक्झाम (२५ %) डब्ल्यू जी २ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. - खाचरात पाणी जास्त काळ न साठवता फोडून लावावे व नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. फवारणी करताना कीडनाशकाचा फवारा चुडाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. - भात पिकावरील खोडकिडीची अळी प्रथम कोवळ्या पानावर उपजीविका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते. यामुळे रोपाचा मधला भाग वरून खाली सुकत येतो यालाच गाभा मर असे म्हणतात. - लावणी नंतर शेतात पाच टक्के कीडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडीपूंज आढळून आल्यास उपाययोजना कराव्यात.
- पानथळ भागामध्ये पाण्याचा निचरा करुन बांध बांधून घेवून दाणेदार कीडनाशकाचा वापर करावा. खोड किडींच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये २० ते २५ मीटर अंतरावर एक असे ८ कामगंध सापळे प्रति एकरी लावावे. फुटवा अवस्थेत दिल्या जाणाऱ्या नत्र खताच्या मात्रेसोबत दाणेदार कीडनाशक द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com