Animal Care : जनावरांसाठी ऊस वाढ्याचा चारा म्हणून वापर? फायद्याचा की तोट्याचा?

Animal fodder : ज्या ठिकाणी उसाचं क्षेत्र जास्त आहे अशा ठिकाणी जनावरांना फक्त उसाचं वाढ खाऊ घातलं जातं. जनावरांना उसाचे वाढे खाऊ घातल्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच वाढत्या उन्हामुळे जनावरांमध्ये अनेक आजार होण्याची शक्यता असते.
Sugarcane Labor
Sugarcane LaborAgrowon
Published on
Updated on

ज्या ठिकाणी उसाचं क्षेत्र जास्त आहे अशा ठिकाणी जनावरांना फक्त उसाचं वाढ खाऊ घातलं जातं.  जनावरांना उसाचे वाढे खाऊ घातल्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच वाढत्या उन्हामुळे जनावरांमध्ये अनेक आजार होण्याची शक्यता असते.

ज्या ठिकाणी उसाचं क्षेत्र जास्त आहे अशा ठिकाणी जनावरांना फक्त उसाचं वाढ खाऊ घातलं जात. वाढे जास्त प्रमाणात खाऊ घातल्यामुळे वाड्यातील ऑक्झलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र होऊन लघवी वाटे निघून जातं. त्यामुळे जनावराच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते. त्यामुळे जनावरांना  मिल्क फिव्हर हा आजार होतो.यामुळे जनावर थकून एकदम खाली बसतात.

Sugarcane Labor
Animal Care : हा चारा जनावरांच्या फायद्याचा ठरेल

शरीराचे तापमान कमी होते. रवंथ करणं बंद होतं. जनावरे खात नाहीत.दूध देणं कमी होतं.शरीर थंड पडतं.जनावरे मान टाकून बसतात यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. ऊस वाढ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालण्यापुर्वी त्यावर प्रक्रिया करावी लागते. हे वाढे खाऊ घालण्यापुर्वी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाढ्यावर मिठाचे द्रावण किंवा चुन्याच्या निवळीची प्रक्रिया करावी.यासोबतच जनावरांना खनिज मिश्रणांचा पुरवठा करावा.  याशिवाय 

अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांच्या नाकातून सुद्धा रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.यावर उपाय म्हणून जनावराच्या डोक्यावर थंड पाणी ओतावं. जनावरांना भरपूर थंड पाणी आणि हिरवा चारा द्यावा.जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यामध्ये सावलीत राहतील याची काळजी घ्यावी. रक्तस्त्राव थांबत नसेल तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्व क आहारातून किंवा औषधातून द्यावं. 

जास्त  उन्हामुळे जनावरांच्या कातडीला कडव्या आजार होतो.ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो त्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो. चाऱ्याच्या कमतरतेमुळे भुकेपोटी जनावर गाजर गवत खातात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता जनावरांना कडव्या  हा आजार होतो.

गाजर गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो.यावर उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावीत. जनावरे गाजर गवत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याना भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावं.पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत. अशा प्रकारे काळजी घेतल्यास जनावरांमध्ये उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. 

-------------- 

माहिती आणि संशोधन - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com