Sanjana Hebbalkar
जनावर दूध देण्याची क्षमता किंवा दूधाची मात्रा ही ते खात असलेल्या पदार्थ आणि चाऱ्यापासून होते
त्याच्या चाऱ्यावर जनावराच्या दूधाची क्षमता आणि त्याचे गुण अवलंबून असतात. पण सध्याच्या परिस्थितीवर चारा मिळण अवघड झालयं
शेतात चाऱ्याची लागवड केल्यास त्याचा फायदा होतो. यातील एक महत्त्वाचं म्हणजे ओटचा चारा होय
ओट हे काहीसे गहू पिकासारखेच दिसणारे, पण गव्हापेक्षा थोडे उंच वाढणार चारा पीक आहे. या चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असत.
दुभत्या जनावरांना ओट चा चारा दिल्यास दुधाच उत्पादन वाढत याशिवाय दुधातील फॅटच प्रमाणही वाढत.
पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत शेणखत, कंपोस्ट खत मिसळावे. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दोन ओळींत ३० सेंमी अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी.
पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू सवंर्धकाची बीजप्रकिया करा.
४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी, तर उरलेलं ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ दिवसांनी आणि ४० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रति हेक्टरी द्याव.
लागवडीनंतर ५० दिवसांत करायची आहे तर दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी किंवा ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना करावी.