Milk Production : चांगली वैरण ही उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे, कारण दुभत्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ६५ टक्के खर्च हा आहारावर होतो. हा खर्च कमी करण्यासाठी पुरेसा हिरवा आणि कोरडा चारा उपयोगी ठरतो. चाराटंचाईमुळे चाऱ्याचे भाव वाढतात.
चारा टंचाईला दरवर्षी सामोर जाव लागत त्यामुळे दुधउत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात. चारा टंचाई निर्माण होण्याची कारणे काय आहेत? याशिवाय चारा टंचाईवर काय उपाय करायचते याविषयी माहिती देत आहेत दिनेश भोसले.
गेल्या ७०- ७५ वर्षात देशातील दूध उत्पादन वाढल मात्र त्या प्रमाणात चाऱ्याच उत्पादन मात्र झाल नाही. त्यामुळे दरवर्षी चारा टंचाईला सामोर जाव लागत. चारा लागवडीखाली जमीन मात्र फारच कमी म्हणजे ४ ते ५ टक्केच आहे. चारा लागवड नेमकी किती जमिनीवर होते याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही.
शासकीय यंत्रणाद्वारे जिल्हा स्तरावर, राज्य निहाय चारा लागवडीची आकडेवारी गोळा केली जाते. त्याप्रमाणे चारा लागवडी विषयी अंदाजे आकडेवारी दिली जाते. यालाच गेस्टीमेट म्हणतात. हा केवळ अंदाज असतो. कधी कधी हा अंदाज पूर्णपने चुकीचाही असू शकतो.
शेतकऱ्यांना जमिनीनूसार पीक लागवडीच नियोजन कसं कराव हेच समजत नाही. धान्य, भाजीपाला आणि फळ पिकासोबतच चारा लागवडीलाही महत्व दिल पाहिजे. म्हणजे एक चतुर्थांश जमिनीवर चारा लागवड ही व्हायलाच हवी. उत्तर भारतातील शेतकरी आपल्या शेतीच्या एक चतुर्थांश भागावर चारा लागवड ही करतातच.
पण आपल्याकडे अस होताना दिसत नाही. उत्तर भारतीतील शेतकरी आपल्या पशुधनावर जेव्हड प्रेम करतात त्या तुलनेत आपल्याकडील शेतकरी करत नाहीत. आपल्या जनवरांना घरचाच चारा असलेला कधीही चांगल असतं.
कारण बाजारात जो चारा मिळतो तो निकृष्ट दर्जाचा असेल तर आपल्या जनावरावर त्याचे परिणाम होणारच. पशुपालक स्वस्त मिळणाराच चारा घेतात. म्हणजे कमी खाऊ घालून जास्तीत जास्त उत्पादन मिळाव अशी अपेक्षा असते. असं कसं चालणार.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेकॉर्ड किपींग
पशुपालकांनी रेकॉर्ड किपींग म्हणजे नोंदी ठेवण अत्यंत आवश्यक आहे. पशुपालकांनी विविध अॅपचा वापर करुन नोंदी ठेवल्या पाहिजेत. गायी म्हशींना त्याच्या अवस्थेनूसार, वजनानूसार किती हिरवा, कोरडा चारा द्यायचा, किती पशुखाद्य दिल पाहिजे याविषयीच नियोजन केल पाहिजे यालाच रॅशन बॅलन्सिंग अस म्हणतात. अमेरिका, युरोप मधील पशुपालक ज्याप्रमणे दुग्धव्यवसाय करतात त्याप्रमाणे पंजाबमधील पशुपालकांनी दुग्धव्यवसायात बदल केले आहेत.
पंजाबमधील दुग्धव्यावसायीक एका गायीपासून ३०५ दिवसात म्हणजे एका वेतामध्ये ७ ते १२ हजार लिटर दुध उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत. पण महाराष्ट्रात आज १० टक्के देखील जनावरे अशी नाहीत जी ७ हजार लिटरपेक्षा जास्त दूध देत असतील. आपले पशुपालक पंजाब मध्ये दरवर्षी पंजाब मधील मोठमेठ्या प्रदर्शनाला भेटी देतात पण आपल्याकडे अनुकरण करत नाहीत.
खाद्य नियोजन
बॅलंन्सिंग करुन जनावरांच्या खाद्य नियोजन केलं पाहिजे. म्हणजे हिरवा, कोरडा चारा, पशुखाद्य विविध पेंडीचा वापर करुन जवावरांच्या खाद्य व्यवस्थापन केल पाहिजे. याशिवाय दूध काढण्यासाठी मिल्किग मशीनचा वापर केला पाहिजे.
ज्या शेतकऱ्यांकडे १० पेक्षा जास्त गायी आहेत त्या पशुपालकाला मजुर ठेवावा लागतो. अशावेळी मजूर त्यांच्या पद्धतीने जनावराला खाऊ घालतो.
त्यामुळे मजूर काय करतो? आपल्या जनावरांला काय, किती प्रमाणात खाऊ घालतो? याची माहिती मालकाला नसते. त्यासाठी मजुरांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने पशुवैद्यकीय डॉक्टरांना ट्रेनिंग देण करजेच आहे.
कारण गावात जे पशुवैद्यकीय डॉक्टर असतात ते जनवरांवर उपचार करण्यात व्यस्त असतात. शेतकऱ्यांच्या मुलांनाही ट्रेनिंग देण्याचीही गरज असते. कारण तेच पुढे जाऊन व्यवसाय सांभाळणार आहेत.
चारा लागवड
एकदल चारा हा खरीपात घेतला जातो. तर द्विदल चारा हा रब्बी हंगामात घेतला जातो. त्यामुळे आता रबी हंगामात द्विदल चाऱ्याची प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरणी केलीच पाहिजे. कारण द्विदल चाऱ्यात प्रथिने जास्त प्रमाणात असतात तर एकदल चाऱ्यामध्ये उर्जा जास्त प्रमाणात असते.
चारा लागवडीसाठीआपल्या विभागानूसार विविध विद्यापीठाने शिफारस केलेल्या चाऱ्याची लागवड करावी. याशिवाय कापणी करुन वापरता येईल अशा चाऱ्याची लागवड करण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक चारा आहे त्या शेतकऱ्यांनी मुरघास बनवून ठेवावा.
याशिवाय युरीया प्रक्रिया करुनही वाळला चारा वापरला पाहिजे. महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तस पहायला गेल तर उसाचे वाढे हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा चारा आहे. पण चारा टंचाई काळात जनावरांची चाऱ्याची गरज भागावी म्हणून अनेक पशुपालक जनावरांला उसाचे वाढे देतात. अशा वेळी वाढ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी उसाच्या वाढ्याचा मुरघास बनवून ठेवावा.
पशुसंवर्धन विभागाने आणि कृषी विभागाने एकत्र येऊन चाऱ्याचा प्रश्न सोडविला पाहिजे. मका सोडून बाकी सर्वच चारा पिकाला पाणी कमी लागत. मका पीक खादाड म्हणजे जमिनीतून जास्त पोषक घटक घेणार पीक आहे. त्यामुळे मका न घेता ईतर द्विदलवर्गीय चारा पिकाची लागवड करण फायदेशीर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.