Parshottam Rupala : पशुपालक, मच्छीमारांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ : पुरुषोत्तम रुपाला

Union Cabinet Minister : पशुपालक आणि मच्छीमार हे गरीब लोक आहेत, त्यामुळे ते कधीच कर्ज बुडवत नाहीत. त्यांच्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले.
Union Cabinet Minister
Union Cabinet Minister Agrowon

Animal Husbandry and Dairy Minister : देशातील पशुपालक आणि मच्छीमार यांना किसान क्रेडीट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. पशुपालक आणि मच्छीमार हे गरीब लोक आहेत, त्यामुळे ते कधीच कर्ज बुडवत नाहीत. त्यांच्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, यासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट) मासा हा राज्य मासा म्हणून जाहीर करत असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

Union Cabinet Minister
Lumpy Virus : आतापर्यंत ७० टक्के जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा दुसरा डोस : पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित किसान क्रेडीट कार्ड वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते सोमवारी (ता. ४) झाले. त्यावेळी ते बोलत होते. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह केंद्रीय व राज्य शासनाचे मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन विभागांचे सचिव, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, नाबार्ड आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Union Cabinet Minister
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंकडे आता पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग, राज्यात तब्बल ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

रुपाला म्हणाले की, ‘किसान क्रेडीट कार्ड ही योजना शेतकऱ्यांप्रमाणेच पशुपालक, मच्छीमारांना लागू आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात त्यांना लाभ मिळणे आणि या कार्डचे वितरण त्यांना होणे आवश्यक आहे. बॅंकांनी याबाबत अधिक सकारात्मक भूमिका बजावणे अपेक्षित आहे. यामध्ये संबंधित घटकांना जो लाभ केंद्र शासनाने देय केला आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया गतीने करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठीच्या पीक कर्जाचा आढावा प्रत्येक जिल्ह्यांत घेतला जातो. त्याप्रमाणे पशुपालक आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचे वाटपाबाबत आढावा घेतला जावा.’

केंद्रीय राज्यमंत्री मुरुगन म्हणाले की, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण या संकल्पनेला बळ देणारी ही किसान क्रेडीट कार्ड योजना आहे. ती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे स्वनिधी योजना, मुद्रा योजनांची अंमलबजावणी सुरु आहे, त्याप्रमाणेच किसान क्रेडीट योजनेची अंमलबजावणी व्हावी.

‘सिल्व्हर पॉम्फ्रेट राज्य मासा’

राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून जाहीर करत असल्याचे मत्स्यव्यवसाय सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com