Animal Diet : जनावरांच्या आहारात अपारंपरिक खाद्याचा वापर

दरवर्षी जगभरात सुमारे १.३ अब्ज टन अन्न वाया जाते, या नुकसानीमध्ये भाजीपाला आणि फळांचा वाटा ४५ टक्के आहे. फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील मोठ्या प्रमाणात तयार होणारे घटक हे पशूखाद्य म्हणून वापरता येतात.
Animal Diet
Animal Diet Agrowon

डॉ. अश्विनी बनसोड, डॉ. प्रतीक जाधव

दरवर्षी जगभरात सुमारे १.३ अब्ज टन अन्न वाया (Waste Of Food) जाते, या नुकसानीमध्ये भाजीपाला (Vegetable) आणि फळांचा (Fruit) वाटा ४५ टक्के आहे. फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योगातील (Vegetable Processing Indtry) मोठ्या प्रमाणात तयार होणारे घटक हे पशूखाद्य (Animal Feed) म्हणून वापरता येतात. अपारंपरिक खाद्याचा (Alternative Feed) योग्य वापर करणे फायदेशीर ठरते.

Animal Diet
Poultry Feed : संतुलित कोंबडी खाद्य निर्मितीचे तंत्र

भाजीपाला पाने, फळांची साले, केळी आणि आंब्याची साले, कोबीची पाने ही पोषक तत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे. याचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर केल्यास पशुखाद्याचा खर्च कमी होईल. मूल्यवर्धित उत्पादनांची श्रेणी निर्माण होईल. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यात मदत होईल. बहुतेक परीक्षित फळांचा प्रक्रियेनंतरचा लगदा, केळीची पाने आणि साले, आंब्याची साल, लिंबूवर्गीय फळे, अननसच्या प्रक्रियेनंतर शिल्लक राहणारा चोथा, गाजर, मटार शेंगा, बेबी कॉर्न भुसा हे जनावरांच्या खाद्यामध्ये पोषक तत्त्वांचे उत्कृष्ट स्रोत म्हणून वापर शक्य आहे.

Animal Diet
Animal Care : दुय्यम पदार्थांपासून बनवा संपूर्ण खाद्य

केळी ः बाजारपेठेत विक्रीस योग्य नसलेली केळी, कच्ची केळी, प्रक्रियेनंतरचा चोथा, केळीची साले, पाने, कोवळ्या देठांचा वापर पशुखाद्यात करता येतो. केळीच्या सालीमध्ये विविध पोषक घटक असतात. हिरव्या सालीमध्ये अंदाजे १५ टक्के स्टार्च असते, जे फळ पिकल्यावर साखरेमध्ये रूपांतरित होते आणि पिकलेल्या सालीमध्ये अंदाजे ३० टक्के मुक्त शर्करा असते. जनावरांच्या आहारात १५ ते ३० टक्के केळीच्या सालीचा समावेश केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण न होता किंवा रुचकरपणावर परिणाम न होता वजन लक्षणीयरित्या वाढले. शेळ्यांमध्ये वाढीच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम दिसून आला आहे. वाळलेल्या केळीच्या सालीचा १० टक्के समावेश ब्रॉयलर कोंबडीच्या आहारामध्ये केल्याने वजन वाढते, कोंबड्यांची खाद्य रूपांतर कार्यक्षमता सुधारते. मात्र आहारात १० टक्क्यांहून अधिक प्रमाणात समावेश केल्याने कोंबड्यांची वाढ खुंटलेली दिसून आली आहे.

लिंबूवर्गीय फळे ः लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादन हे रस तयार करण्यासाठी वापरतात. रस काढल्यानंतर उरलेल्या अवशेषांमध्ये ६० ते ६५ टक्के साल, ३० ते ३५ टक्के अंतर्गत उती आणि १० टक्के बिया असतात. प्रौढ जनावरे दररोज ५० किलो ताजा लिंबूवर्गीय लगदा खाऊ शकतात. परंतु पाणी आणि विरघळणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते नाशवंत आहे. त्यामुळे हा लगदा सूर्यप्रकाशात वाळवून त्याच्या पॅलेट तयार करता येतात. या लगद्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरसचे चांगले प्रमाण असते. लिंबूवर्गीय लगदाच्या वापर केल्याने चांगल्या प्रकारे लाळ तयार होते. या लगद्याचा पशुतज्ज्ञाच्या शिफारशीप्रमाणे वापर करावा.

कोबीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने कॅलरी कमी आहेत. तंतूमय घटक, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व सी आणि बी ९ आणि कॅल्शिअमचा चांगला स्रोत आहे. कोबीमध्ये इंडोल,आयसोथियोसायनेट्स आणि डायथिओलथिओन्स हे घटक कर्करोगविरोधी आहेत. पानामधील लोह सहज पचण्याजोगे आहे.

फ्लॉवरमध्ये तंतूमय घटक चांगल्या प्रकारे आहेत तसेच प्रथिने, थायामिन, रिबोफ्लेविन, फॉस्फरस, पोटॅशियम, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व के, जीवनसत्त्व बी ६, फोलेट, पॅन्टोथेनिक ॲसिड आणि मॅंगेनीजचा चांगला स्रोत आहे. फ्लॉवर आणि त्याचे टाकाऊ पदार्थ जनावरांसाठी पर्यायी खाद्य स्रोत आहे. - डॉ. प्रतीक जाधव, ९८९०९९७७९५ (पशुधन विकास अधिकारी, औंध, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com