Bull Rearing : चार पिढ्यांपासून बैलांचे अखंडित संगोपन

Animal Care : झोपेतून जाग येते आणि सर्वप्रथम लक्ष जाते ते गोठ्याकडे.. पहिला विचार येतो बैलांचा. गोठ्यात बैल बघितल्याशिवाय चैन पडत नाही.
Bull Rearing
Bull RearingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : झोपेतून जाग येते आणि सर्वप्रथम लक्ष जाते ते गोठ्याकडे.. पहिला विचार येतो बैलांचा. गोठ्यात बैल बघितल्याशिवाय चैन पडत नाही. पहाटेपासून सुरू होते बैलांची सेवा. ती झोपेपर्यंत सुरू राहते.

उदगाव (ता. शिरोळ) येथील वरेकर कटुंबीयांचा गेल्या चार पिढ्यांपासून सुरू असणारा हा दिनक्रम. या कुटुंबाकडून शंभरहून अधिक वर्षांपासून बैलांचे जिवापाड संगोपन सुरू आहे.

कधी जोडी तर कधी एक बैल. चौथ्या पिढीपर्यंत गोठ्यात बैल नाही असा एकही दिवस आतापर्यंत गेला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी बैलांच्या संगोपनात कसूर ठेवला नाही हे विशेष.

रवींद्र महादेव वरेकर (लाडू) हे चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत. बैल त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या जमान्यात बैल जोड्या आता केवळ नाममात्र उरलेल्या असताना वरेकर कुटुंबीयांचा हा बैलांप्रती असणारा स्नेह कौतुकाचा विषय ठरला आहे.

वरेकर यांची दोन एकर शेती आहे. यातून त्यांची गुजराण होते. रवींद्र यांचे आजोबा कै. शिवा, वडील कै. महादेव यांनी शंभरहून अधिक वर्षांपासून बैल जोडी अखंडपणे गोठ्यात ठेवली. तीच परंपरा रवींद्र चालवत आहेत.

Bull Rearing
Animal Care : जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन

२००६ पासून त्यांनी बैलाचा छंद जोपासला. सांगली जिल्ह्यातून खोंड आणून त्याची पोटच्या पोराप्रमाणे जोपासना करायची. सहा महिन्यांपर्यंत त्यांचा सांभाळ करायचा आणि त्याची विक्री करायची असा दिनक्रम पंधरा वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. यातून फारसा नफा होत नसला तरी बैलांची जोपासणा करणे हाच छंद प्रामुख्याने त्यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांना यासाठी संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य मिळते.

आई प्रमिला, पत्नी शुभांगी, भाऊ सुशांत, भावाच्या पत्नी सीमा यांच्यासह कुटुंबातील सदस्य बैलांची जोपासना करतात. बैल जोडीची जोपासना दहा वर्षांपर्यंत केली जाते. सातत्याने चांगल्या प्रकारचे बैल शोधण्याचा छंदच रवींद्र यांना लागला आहे.

त्यामुळे त्यांच्या गोठ्यात नेहमीच एक ते दोन उत्कृष्ट बैल असतात. हे बैल पाहण्यासाठीही शेतकरी घरी येत असतात आतापर्यंत त्यांनी ४० हून अधिक बैल गोठ्यात जोपासना करून विकले आहेत. सध्या शर्यतीमुळे चांगल्या बैलांना सातत्याने मागणी असते.

Bull Rearing
Animal Care : जनावरांचा खरारा महत्त्वाचा...

सातू, हरभरा, मटकी मोड, दूध अंडी, नारळ तुमचा दररोज ६०० ते ७०० रुपयांचा खर्च एका बैलासाठी आहे. हा खर्च कुटुंबीयातर्फे आनंदाने केला जातो. कधी कधी आर्थिक अडचण येते पण काहीही करून बैलांच्या खाद्याला कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाते.

कुटुंबातील महिलांचा सहभाग ही बैलांच्या व्यवस्थापनासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. एक प्रकारे बैलांचा लळाच लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना लागल्याने बैलांचे व्यवस्थापन करणे आनंददायी झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी विना मोबदला काम

एखाद्या शेतकऱ्याला एखादा बैल हवा असेल किंवा कुठे तो उपलब्ध असेल याची बहुतांशी माहिती रवींद्र यांच्याकडे असते. सोशल मीडियाद्वारे ही त्यांना माहिती कळत असते. ज्या शेतकऱ्याला अथवा शर्यत शौकिनाला एखादा बैल हवा आहे तो मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न विना मोबदला सुरू असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com