Animal Care : जनावरांचा खरारा महत्त्वाचा...

Animal Health : खरारा केल्याने नियमित त्वचेची स्थिती, जखमा किंवा आजाराची चिन्हे लवकर शोधण्यात मदत होते. त्वरित उपचार करता येतात. संसर्गाचा धोका कमी होतो. रक्ताभिसरण आणि त्वचेच्या आरोग्याला चालना मिळते.
Animal Care
Animal CareAgrowon

डॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. व्ही. जी. निंबाळकर

Animal Husbandry : पशू व्यवस्थापनामध्ये खरारा (ग्रूमिंग) हा एक महत्त्वाचा भाग आहे. खरारा केल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहाते. त्यांच्या मानसिकतेवर चांगला परिणाम होतो. नियमित खरारा, कातडीची देखभाल, खुरांची काळजी आणि बाह्य परजीवींचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

यातील प्रत्येक पद्धती ही आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. यामुळे जनावरे शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि उत्पादन सक्षम राखण्यास मदत होते. बंदिस्त गोठे हे रोगप्रसारक आणि परजीवींच्या उत्पतीचे कारण आहे.

त्यामुळे नियमित आणि वारंवार खरारा आवश्यक ठरतो. खरारा केल्याने नियमित त्वचेची स्थिती, जखमा किंवा आजाराची चिन्हे लवकर शोधण्यात मदत होते. त्वरित उपचार करता येतात. संसर्गाचा धोका कमी करते. रक्ताभिसरण आणि त्वचेच्या आरोग्याला चालना मिळते, खरारा करताना पशू आणि मालकामध्ये परस्परसंवाद होतो.

यामुळे तणावाची पातळी कमी होऊन जनावरे शांत आणि निश्‍चल होतात. सातत्यपूर्ण संवादांद्वारे पालकांचे पशूंसोबतचे नाते अधिक दृढ होते. त्यामुळे जनावरांची हाताळणी आणि तपासणी प्रक्रिया सुलभ घडते. आरोग्य सेवा, आजार नियंत्रण आणि पशूंच्या वर्तणुकीशी संवर्धन यांचे एकत्रीकरण म्हणून खरारा महत्त्वाचा आहे.

Animal Care
Animal Care : जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन

जनावरांमध्ये परजीवींचा प्रादुर्भाव रोखणे हे जनावराचे आरोग्य योग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परजीवी म्हणजे जंत आणि बाह्य कीटक जसे की गोचीड, गोमाशी, पिसवा आणि उवा यांचा समावेश होतो. परजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावर अस्वस्थ राहते. कुपोषण, अशक्तपणा आणि आजाराच्या समस्या दिसतात.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. हे लक्षात घेऊन परजीवी निर्मूलन, जंतनाशकांचा वापर आवश्यक आहे. याचबरोबरीने खरारा करणे हा प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचा आहे. बाह्य परजीवींचा त्रास कमी होतो. याचबरोबरीने गोठ्यांची स्वच्छता करणे महत्त्वाचे ठरते. दाट केस किंवा लोकरीमध्ये वाढणारे जीव तयार होण्यापासून रोखण्यासाठी लोकर कातरणे आवश्यक ठरते.

Animal Care
Animal Health Management : मुक्तसंचार गोठ्यात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

परजीवी प्रादुर्भाव रोखण्यासाठी चराई क्षेत्र व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. चराईच्या क्षेत्र बदलामुळे मातीत जन्मलेल्या परजीवींचा भार कमी होतो, ज्यामुळे जनावरे चरताना प्रादुर्भावाचा धोका कमी होतो. स्वच्छ पाणी आणि योग्य स्वच्छता सुनिश्‍चित केल्याने परजीवींचा प्रसार रोखता येतो.

परजीवी समस्या लवकर शोधण्यासाठी आणि उपचारांसाठी निरीक्षण आवश्यक आहे. नियमित विष्ठा तपासणीअंतर्गत परजीवी ओळखण्यात मदत होते. शारीरिक तपासणीमुळे बाह्य कीटकांचा प्रादुर्भाव लक्षात येतो. त्यांचा प्रसार होण्यापासून आणि कळपाच्या किंवा कळपाच्या एकूण आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणाम रोखण्यात मदत होते.

खरारा करण्याचे फायदे

खरारा केल्यामुळे जनावरांच्या शरीरावरील परजीवी, घाण निघून जाते. संक्रमण नियंत्रणात येते. रक्ताभिसरण आणि त्वचेचे आरोग्य सुधारते, कातडी चमकदार होते. त्वचा आजारांचे नियंत्रण होते. रोगजनकांचा मानव आणि इतर प्रजातींमध्ये प्रसार रोखता येतो.

खरारा केल्याने संपूर्ण त्वचेमध्ये नैसर्गिक तेल प्रसारित होण्यास मदत होते, ज्यामुळे चमक आणि गुणवत्ता सुधारते. विशेषत: लांब केस असलेल्या प्राण्यांमध्ये केसांचा गुंता टाळता येतो.

मेंढ्या आणि ससा यांच्या विशिष्ट जाती लोकर किंवा फरसाठी वाढविल्या जातात. त्यांच्यामध्ये खरारा केल्यामुळे गुणवत्ता चांगली राहते.

जाड कातडी असलेल्या जनावरांमध्ये उष्णतेच्या ताणापासून बचाव करण्यासाठी खरारा महत्त्वाचा आहे. जास्तीचे केस काढून टाकून किंवा मेंढ्यांमध्ये जाड लोकरीची कापणी महत्त्वाची ठरते. शरीराचे तापमान अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत होते, त्यामुळे उष्ण हवामानात उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com