Animal Care : जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन

Animal Health : पावसाळ्यात गव्हाणी, पाण्याचा हौद आणि गोठ्यात चुना फवारणी आवश्यक आहे. जनावरांना स्वच्छ पाणी आणि पौष्टिक खाद्य देणे आवश्यक आहे.
Animal Health
Animal HealthAgrowon
Published on
Updated on

डॉ. मंगेश वैद्य, डॉ. संदीप ढेंगे

Animal Health Management : पावसाळ्यात गव्हाणी, पाण्याचा हौद आणि गोठ्यात चुना फवारणी आवश्यक आहे. जनावरांना स्वच्छ पाणी आणि पौष्टिक खाद्य देणे आवश्यक आहे, जनावरांच्या खाद्यात हिरव्या चाऱ्याचे योग्य प्रमाण ठेवावे, यामुळे अतिसार, पोटदुखी होणार नाही.

पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि ऊन कमी असल्याने गोठा ओलसर राहतो. त्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. बदलत्या वातावरणात जनावरांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नसल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. हे लक्षात घेऊन पावसाळ्यात जनावरांचे योग्य संगोपन, गोठा व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन तसेच विविध आजारांपासून प्रतिबंध करता येईल.

छतातून पावसाचे पाणी गळत असल्यास, गोठ्यात पाणी साचू लागते. जनावरे बसण्याच्या जागी खाचखळगे असल्यास त्यात शेण, मूत्र साचून राहते. पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना गोठ्यामध्ये बांधून ठेवले जाते.

पावसाचे पाणी आत येऊ नये यासाठी गोठे पूर्णपणे बंदिस्त केले जाते. गोठ्यात हवा कोंडल्यामुळे आणि बाहेरील स्वच्छ हवा आत येत नसल्याने जनावरे तणावग्रस्त राहतात. त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते.

गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो, अमोनियाचे प्रमाण वाढल्याने जनावरांच्या डोळ्यांवर परिणाम होतो, अस्वच्छ गोठा, पाण्याच्या गळतीमुळे कोक्सीडिओसिस होऊ शकतो. शेळ्यांमध्ये खूर कुजण्याचा आजार होतो. याकडे दुर्लक्ष करू नये.

Animal Health
Animal Care : जनावरांचे आरोग्य, आहार व्यवस्थापन

गव्हाणी, पाण्याचा हौद आणि गोठ्यात चुना फवारणी आवश्यक आहे. दूध काढण्याची जागा स्वच्छ खेळती असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा किंवा शेण असू नये. गोठ्याच्या भिंतीला जमिनीपासून पाच फुटांपर्यंत चुना लावावा, त्यामुळे गोठा जंतुविरहित राहतो. गोमूत्र, पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना करावी. गोठ्याबाहेर शोषखड्डा तयार करावा. त्यात मलमूत्र सहज जमा होईल अशी व्यवस्था करावी.

जनावरांना कमी प्रमाणात सुका चारा आणि जास्त प्रमाणात हिरवा चारा दिल्याने हगवण लागते. कारण पावसाळ्यात उगवणाऱ्या कोवळ्या गवतामध्ये भरपूर पाणी असते. पशुखाद्य ओले झाल्यावर बुरशी तयार होते. बुरशीयुक्त खाद्य जनावरांना दिल्यास चयापचय आणि सांसर्गिक आजार होण्याची शक्यता असते.

Animal Health
Animal Health Management : मुक्तसंचार गोठ्यात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

जनावरांना स्वच्छ पाणी आणि पौष्टिक खाद्य देणे आवश्यक आहे, जनावरांच्या खाद्यात हिरव्या चाऱ्याचे योग्य प्रमाण ठेवावे, यामुळे अतिसार, पोटदुखी होणार नाही.

खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी खनिज विटा गोठ्यात टांगत्या ठेवल्यास गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आवडीने चाटतात. त्यामुळे खनिजांची कमतरता होणार नाही, जनावरांची प्रकृती योग्य राहण्यास मदत होते.

दमट हवामानामुळे गोचीड, कीटक आणि माशांचे प्रजनन अधिक प्रमाणात होते. हे सर्व परजीवी असल्याने पशूंच्या शरीराला चावतात, रक्त प्यायल्यामुळे जनावरे अशक्त होऊन मृत पावतात.

जास्त दूध देणाऱ्या संकरित गाईंच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे, कारण संकरित आणि परदेशी गाईची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. या गायीला कासदाह आजार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

पावसाळ्याच्या सुरुवातीस बागायती क्षेत्रात फुलीचे गवत मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा वेळेस जनावरांना फुलीचे गवत खाऊ घातल्यास विषबाधेमुळे कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन जनावरे दगावू शकतात.

पावसाळ्याच्या सुरवातीस आणि संपूर्ण हंगामात जनावरांचे जंतनाशन करावे. कारण या कालावधीत जंत जास्त प्रमाणात वाढतात. परजिवींचे नियंत्रण करावे.

जनावरांना लसीकरण करावे. संसर्गजन्य आजार म्हणजे घटसर्प (सेप्टिसीमिया), एकटांग्या (ब्लॅक क्वार्टर) आणि लाळ्या खुरकूत, आंत्रविषार आजारास प्रतिबंध करावा.

डॉ. मंगेश वैद्य, ९५४५४६८३५७

(सहायक प्राध्यापक, पशू शरीर क्रिया शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com