Goat Farming : करडातील थायमीनची कमतरता

Animal Care : पोलिओएनसेपॅलोमलेशिया हा जीवनसत्त्व बी-१ कमतरतेमुळे होणारा चेतासंस्थेचा आजार आहे.
Goat Baby
Goat Baby Agrowon
Published on
Updated on

डॉ. मीरा साखरे, डॉ. ऊर्मिला वाकडे

Veterinary Science : पोलिओएनसेपॅलोमलेशिया हा जीवनसत्त्व बी-१ कमतरतेमुळे होणारा चेतासंस्थेचा आजार आहे. आजारी करडाच्या पायात सुरुवातीला अशक्तपणा येतो. पिले कळपातून वेगळे राहतात. सुस्तपणा येतो.लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना करावी.

पोलिओएनसेपॅलोमलेशिया किंवा सेरीब्रोकॉर्टिकल नेक्रोसिस हा जीवनसत्त्व बी-१ (थायमीन) कमतरतेमुळे होणारा चेतासंस्थेचा आजार आहे. शेळ्यांमध्ये प्रामुख्याने लिस्टेरिओसिस, आंत्रविषार रेबीज, शिशाची विषबाधा, किटोसिस, गर्भविषार, जीवनसत्त्व-अ कमतरता इत्यादी विविध कारणांमुळे चेतासंस्थेचे आजार दिसून येतात.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिओएनसेपॅलोमलेशिया हा आजार प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये होतो, परंतु वाढत्या वयाच्या करडात जास्त दिसून येतो. थायमिन जीवनसत्त्व हे सर्व प्राण्यांमध्ये मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. यासोबतच सर्व पेशींच्या कार्यासाठी थायमिनची आवश्यकता असते. ग्लुकोज किंवा शर्करा चयापचय प्रक्रियेत थायमिन गरजेचे आहे.

पण थायमिन जीवनसत्त्व प्राण्यांच्या शरीरात तयार होत नाही. रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पोटातील रुमेन कप्प्यात चाऱ्याच्या विघटन प्रक्रियेत मित्र जिवाणू थायमिन तयार करत असतात. लहान पिलू जसे करडू, कोकरू, वासरू यात पोटाची वाढ न झाल्यामुळे ते आहारातील थायमिनवर अवलंबून असतात.

Goat Baby
Goat Farming : शाळेतील नोकरी करत जपला शेळीपालन व्यवसाय

कारणे

थायमीन कमतरता.

चारा-पाणीमार्फत सल्फरचे अधिक सेवन, सल्फर हे थायमिन तयार करणाऱ्या तयार घटकावर परिणाम करते. सलगम, मोहरी, तेलबिया या चाऱ्यात सल्फरचे प्रमाण अधिक असते.तीव्र

शिशाची विषबाधा.

कर्बयुक्त आहार. रवंथ करणाऱ्या प्राण्यात अति ऊर्जायुक्त आहार हा थायमीन तयार करणाऱ्या घटकांवर विपरीत परिणाम करतो. त्यामुळे थायमीन तयार होण्यास बाधा येते.

सोडिअमची कमतरता.

आजाराची लक्षणे

सुरुवातीला पायात अशक्तपणा येतो. पिले कळपातून वेगळे राहतात. सुस्तपणा येतो.

अडखळत चालणे.

दृष्टीची क्षमता कमी होणे, अंधत्व येणे. स्नायू थरथर कापणे.

डोळ्यांच्या बाहुल्या फिरवणे, डोळे विस्फरणे.

मान आकाशाकडे करणे, मान गोल फिरवणे. कधी कधी मान गोल फिरवणे, डोके आपटणे. झटके येऊन खाली पडणे. उपचाराअभावी मृत्यू होऊ शकतो.

Goat Baby
Goat Farming : शेळीपालनातील संधी आणि आव्हाने

निदान

पिलांचे वय, शेळ्यांनी अतिकर्बयुक्त खाल्लेले धान्य, तसेच लक्षणानुसार निदान करता येते.

उपचार आणि प्रतिबंध

प्राथमिक लक्षणानुसार उपचार सुरू केल्यास चांगला प्रतिसाद मिळतो.

तीव्र स्वरूपाच्या लक्षणात, करडू, शेळीच्या मेंदूतील चेतासंस्था पेशीला इजा झाल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळत नाही. तज्ज्ञ पशुवैद्यकांकडूनच उपचार करावा.

बहुतेक वेळा पहिल्या डोसनंतर प्रतिसाद येतो.

सुरुवातीला दिवसातून तीन ते चार वेळा उपचार करावा लागतो.

चाऱ्यात व्यवस्थित बदल करून, कमी ऊर्जा असलेले धान्य आणि तंतुमय पदार्थ असलेला चारा शेळीस द्यावा.

नवजात करडाची घ्यावयाची काळजी

जन्मानंतर पहिल्या २४ तासांत करडांची विशेष काळजी घ्यावी लागते. या वेळी करडांना जास्त ऊर्जेची गरज असते. तसेच नवीन वातावरणातील बदलाशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते.

Goat Baby
Goat Farming : शेतकरी नियोजन ः शेळीपालन

सर्वसाधारणपणे शेळी व्यायल्यानंतर तिच्या पिलास चाटून स्वच्छ व कोरडे करते. जर असे दिसून आले नाहीतर मात्र अशा करडांना कोरड्या टॉवेलने पुसून स्वच्छ करावे. जर टॉवेल उपलब्ध नसेल तर वाळलेल्या मऊ गवताचा वापर करून करडाचे शरीर कोरडे करावे. करडांचे शरीर कोरडे करताना होणाऱ्या घर्षणामुळे श्‍वासोच्छवास व्यवस्थित होण्यास मदत होते.

जन्मानंतर पहिल्या २० मिनिटांत करडू उभे राहून दूध पिण्यासाठी प्रयत्न करतात. जर पिल्ले अशक्त असतील तर त्यांना चिक पिण्यासाठी मदतीची गरज असते.

करडांची नाळ २ ते ३ इंच अंतरावर निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने कापून त्यास टिंक्‍चर आयोडीन किंवा जंतुनाशक लावावे. म्हणजे नाळेमधून जंतुसंसर्ग होणार नाही, करडू आजारी पडून दगावणार नाही.

नवजात करडास जन्मल्यानंतर अर्धा ते एक तासामध्ये चिक पाजावा. या चिकातून करडाच्या आरोग्यासाठी आवश्‍यक असणारी रोगप्रतिकारशक्ती तसेच मोठ्या प्रमाणात जलद वाढीसाठी आवश्‍यकता असणारी प्रथिने, जीवनसत्त्व, लोह इ. घटक मुबलक प्रमाणात मिळतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com