Poultry Farming : आधुनिक पद्धतीने गावरान कुक्कुटपालन

Poultry Management : पुणे जिल्ह्यातील आर्डव (ता. मावळ) येथील आदित्य वरघडे यांची दीड एकर शेती आहे. त्यामध्ये घेवडा, मका, भात इत्यादी पिकांची लागवड असते. शेतीला पूरक म्हणून आदित्य यांनी गावरान कुक्कुटपालनाची जोड शेतीला दिली आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

Poultry Farming Techniques :

शेतकरी नियोजन । गावरान कुक्कुटपालन

शेतकरी : आदित्य अरुण वरघडे

गाव : आर्डव, ता. मावळ, जि. पुणे

एकूण क्षेत्र : दीड एकर

पुणे जिल्ह्यातील आर्डव (ता. मावळ) येथील आदित्य वरघडे यांची दीड एकर शेती आहे. त्यामध्ये घेवडा, मका, भात इत्यादी पिकांची लागवड असते. शेतीला पूरक म्हणून आदित्य यांनी गावरान कुक्कुटपालनाची जोड शेतीला दिली आहे. सध्या शेती आणि कुक्कुटपालन अशा दोन्ही व्यवसायांची धुरी यशस्वीपणे आदित्य वरघडे सांभाळत आहेत.

मागील वर्षी अर्धबंदिस्त पद्धतीने कुक्कुटपालन करण्याच्या उद्देशाने अर्ध्या एकरावरील जागेत जाळीचे कंपाउंड करत शेड उभे केले. त्यानंतर प्रत्यक्षात पारंपरिक व आधुनिक पद्धतीने गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात केली आहे. सध्या दोन शेडमध्ये मिळून ५०० गावरान कोंबड्या व ६०० पिलांचे संगोपन केले जात आहे.

Poultry Farming
Poultry Farming : तरडे गावाने मिळवली पोल्ट्री व्यवसायात ओळख

व्यावसायिक स्तरावर गावरान कुक्कुटपालन व्यवसाय करण्यापूर्वी वरघडे कुटुंबीयांकडे आधीपासून ४० ते ५० कोंबड्या होत्या. त्यांचे योग्य संगोपन करून विक्री केली जायची. त्या वेळी वातावरण बदलामुळे कोंबड्यांमध्ये येणाऱ्या विविध आजारांविषयी पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला. आलेल्या अडचणींवर मात करत कोंबड्यांच्या संगोपनावर भर देत गेले. मात्र हळूहळू मिळत गेलेल्या अनुभवावरून यशस्वी कुक्कुटपालन करणे शक्य झाल्याचे आदित्य वरघडे सांगतात.

व्यवसायाच्या सुरुवातीस कुक्कुटपालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण घेतले. त्यामुळे संगोपनातील बारकावे, आरोग्य, नियमित लसीकरण, खाद्य व्यवस्थापन या विषयी पुरेशी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घरीच ५०० पिले तयार करून त्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली.

कुक्कुटपालनासाठी दोन शेड

कुक्कुटपालनासाठी सिमेंट पत्र्याच्या दोन शेडची उभारणी केली आहे. त्यापैकी एक शेड १९ बाय ४० फुटांचे, तर दुसरे २० बाय ६० फूट इतक्या आकारमानाचे आहे.

शेडमध्ये कोंबड्यांचे नैसर्गिक मुक्तसंचार पद्धतीने संगोपन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. कोंबड्यांना बसण्यासाठी लाकडे ठेवली आहेत. पाण्याची सुविधा, बसण्यासाठी सुविधा, अंडी घालण्यासाठी डब्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

साधारणपणे तीन ते चार महिने योग्य पद्धतीने संगोपन केल्यानंतर एका कोंबडीचे वजन साधारण १२०० ते १४०० ग्रॅमपर्यंत भरते. कोंबड्यांची विक्री प्रति नगाप्रमाणे केली जाते. शिवाय कोंबड्यांपासून मिळणाऱ्या अंड्यांची विक्री देखील केली जाते.

Poultry Farming
Desi Poultry Farming : गावरान कोंबडीपालनातून मिळतोय ‘मनानंद’

पारंपरिक पद्धतीने पिलांची निर्मिती

कुक्कुटपालनातून अंडी उत्पादन घेण्यास सुरुवात केल्यावर हळूहळू त्यात वाढ होत गेली. आज मितीस दररोज जवळपास ६० ते ७० अंड्यांचे उत्पादन मिळते. उत्पादित सर्व अंड्यांची विक्री केली जाते. तसेच शेडमध्येच आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीने पिलांची निर्मिती केली जाते. त्यासाठी अंडी उबवण मशिन आहे. सध्या अंडी, लहान पिले तसेच मोठ्या कोंबड्याच्या विक्रीतून चांगले आर्थिक उत्पन्न त्यांना मिळते आहे.

खाद्य व्यवस्थापन

गावरान कोंबड्यांच्या संगोपनात खाद्यावरील खर्च हा तुलनेने कमी येतो. गावरान कोंबड्या जमिनीवरील किडे, खाद्य खाऊन आपली गुजराण करतात. त्यामुळे विशेष खाद्य देण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र तरीदेखील कोंबड्यांना हॉटेल वेस्ट, भाजीपाला, गिरणीतील पीठ, वाया जाणारे धान्य देण्यात येते.

Poultry Farming
Poultry Management : वाढत्या थंडीत अशी घ्या कोंबड्यांची काळजी

विक्री व्यवस्था

नैसर्गिक पद्धतीने वाढविलेल्या गावरान कोंबड्यांची जागेवरूनच विक्री करण्यावर भर असतो. अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून गावरान कोंबड्यांच्या विक्रीसाठी जाहिरात केल्यापासून ग्राहक थेट फार्मवर येऊन खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे विक्रीसाठी अडचणी येत नाहीत. फार्मवर आल्यानंतर ग्राहक त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पाहणी करून जी आवडेल ती कोंबडी खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांचा फार्मवरील ओढा वाढला आहे. काही वेळा ग्राहक फोनवर माहिती घेऊन कोंबड्यांच्या तसेच अंड्यांच्या ऑर्डर देतात. येणाऱ्या काळात पुणे शहरातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत गावरान कोंबड्या आणि अंडी पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे.

सध्या गावरान कोंबडीची प्रति नग ४०० ते ५०० रुपये, तर कोंबडा प्रति नग ८०० ते १००० रुपये प्रमाणे विक्री केली जाते. तसेच उत्पादित अंड्याची उबवण करून पिलांची थेट वयानुसार विक्री केली जाते. सध्या महिन्याकाठी जवळपास ३० ते ४० जिवंत कोंबड्यांची विक्री होते. विविध ठिकाणच्या यात्रा आणि उत्सवावेळी मागणी जास्त असते. त्या वेळी चांगली उलाढाल होते.

व्यवस्थापनातील बाबी

कोंबड्यांच्या संगोपनासाठी योग्य पद्धतीने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. फार्मवर योग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो.

कोंबड्यांच्या निवाऱ्यासाठी आणि मुक्त संचारासाठी शेड उभारतेवेळी वेगळी

जागा सोडण्यात आली आहे. यामुळे कोंबड्यांना मुक्त संचार करणे शक्य होते. त्यामुळे त्यांची चांगल्या पद्धतीने शारीरिक वाढ होण्यास मदत मिळून अपेक्षित वजन भरते. कोंबड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मुक्तसंचार पद्धती फायदेशीर ठरते.

नियमितपणे शेडची स्वच्छता केली जाते. निर्जंतुकीकरणावर विशेष भर दिला जातो. त्यासाठी वेळेवर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जाते.

कोंबड्या शेडमध्ये फिरताना त्यांना सावली उपलब्ध होण्यासाठी शेवगा लागवड केली आहे.

लहान पिलांसाठी नवीन शेड उभारले आहे.

खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

शेडमध्ये खाद्य, पाण्यासाठी भांडी लावली आहेत.

थेट विक्री करण्यावर भर दिला जातो.

- आदित्य वरघडे, ९३०९९८३३८०, (शब्दांकन : संदीप नवले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com