Team Agrowon
अंड्यावरील कोंबडी (लेअर) संगोपनासाठी जागेची निवड करताना येणारे ऊन, वारा व पावसाची दिशा विचारात घ्यावी.
स्वच्छ, निर्जंतुक व खेळती हवा आणि विजेचा सातत्यपूर्ण पुरवठा असणारी जागा निवडावी. निरोगी वाढीसाठी हे अत्यंत आवश्यक असते.
अंड्यावरील कोंबड्याचे (लेअर) संगोपन डीप लिटर (गादी पद्धत) अथवा पिंजरा पद्धतीने करावे.
नवीन पिले आणावयाच्या आधी ब्रूडर तयार करून ठेवावे. ब्रूडरचे तापमान साधारणत: ३० ते ३५ अंश सेल्सिअस इतके असावे.
पिले आणल्याबरोबर त्यांना ब्रूडरमध्ये ठेवून पसरट भांड्यामध्ये भरडलेला मका सर्वसाधारण तीन दिवसांपर्यंत द्यावा. पिण्यासाठी पाण्याचे पसरट भांडे ठेवावे.
पिले ब्रूडरपासून लांब जाऊ नयेत म्हणून ब्रूडरभोवती ३० ते ४० सें.मी. अंतरावर १५ इंच उंचीचे गोलाकार चिकगार्ड ठेवावे.
पिले जसजशी मोठी होतील, तसतसे वर्तुळ मोठे करावे. पहिले ३ ते ४ दिवस पिले गादीवर अंथरलेल्या कागदावर सोडावीत. कागद रोज बदलावा.