Animal Blood Transfusion: पशूंमध्ये रक्त संक्रमणाची गरज

Animal Care: रक्त संक्रमण ही संकल्पना केवळ मनुष्यासाठी मर्यादित राहिली नाही, प्राण्यामध्ये सुद्धा रक्त संक्रमण यशस्वीरीत्या केले जाते. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर या ठिकाणी प्राण्यामधील रक्त संक्रमणाबाबत संशोधन झाले आहे.
AnimalBlood Transfusion
AnimalBlood TransfusionAgrowon
Published on
Updated on

डॉ.पंकज हासे

एका जिवाला नवजीवन देण्यासाठी ज्यांनी कोणी स्वेच्छेने, विनाशुल्क रक्तदान केले असेल, त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. सुरक्षित आणि नियमित रक्तदानाची सततची आणि तातडीची गरज अधोरेखित करण्याचा देखील हा दिवस आहे.

कार्ल लेंडस्टेनर यांना रक्त संक्रमण आणि रक्तगटाचे जनक म्हटले जाते. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून १४ जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा करतात. प्राण्यामध्ये सुद्धा रक्त संक्रमण यशस्वीरीत्या केले जाते. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर या ठिकाणी प्राण्यामधील रक्त संक्रमणाबाबत संशोधन झालेले आहे.

१९९९ मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्राण्यासाठी देशातील पहिली रक्तपेढी स्थापन करण्यात आली. महाविद्यालयात ‘श्‍वानांच्या लाल रक्त पेशीचा जीवनकाल’ या महत्त्वाच्या विषयावर संशोधन झाले आहे. सध्या श्‍वान, मांजर, गाय, बैल म्हैस यामध्ये रक्तसंक्रमण केले जाते.

AnimalBlood Transfusion
Veterinary Office Leak : ‘पशुवैद्यकीय’चा कारभार पाण्यातून; ६० हजार पशुगण संख्येला एक अधिकारी, शेतकऱ्यांची तीव्र नाराजी

रक्त हे कनेक्टिव्ह पेशींचा संच आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने रक्त पेशी आणि प्लाझ्मा असतो. एका प्राण्याचे रक्त (पूर्ण रक्त) किंवा रक्ताचे घटक जसे की लाल रक्त पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेट दुसऱ्या रक्तक्षय झालेल्या प्राण्यास देणे यास रक्त संक्रमण असे म्हणतात.

संक्रमणाची गरज

ज्या प्राण्याच्या रक्तामध्ये लाल रक्त पेशीचे प्रमाण आणि हिमोग्लोबिन कोणत्याही कारणाने कमी झाले असेल, तर रक्त संक्रमण करता येते.हिमोलायटिक आजार     गोचीडजन्य आजार ः ायलेरिया, बबेसिया इ.     श्‍वान ः बबेसिया, एर्हेल्षीया, आनाप्लाझ्मा इ.     लेप्टोस्पायरा     अपघात किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणारा रक्तस्राव     मूत्रपिंड निगडित आजार     रक्त साकळण्याच्या प्रक्रियेतील दोष     रक्त क्षय (अनेमिया)     भाजणे / जळणे     यकृत संबंधित आजार (कावीळ इ)     स्फुरद घटकांच्या कमतरतेमुळे होणारी लाल लघवी (मुख्यतः म्हैस) शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्राव.

संक्रमणापूर्वीच्या चाचण्या

रक्त संक्रमण करण्यापूर्वी रक्त दाता प्राण्याच्या रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात. जसे की पूर्ण रक्त तपासणी (CBC), मूत्रपिंड कार्यक्षमता चाचणी (KFT), यकृत कार्यक्षमता चाचणी (LFT), गोचीडजन्य ताप. इत्यादी.

AnimalBlood Transfusion
Veterinary Clinic Crisis: खानदेशात पशुवैद्यकीय दवाखाना ‘सलाईन’वर

रक्त संक्रमणाचे प्रकार

अ) पूर्ण रक्त देणे ब) रक्ताचे काही भाग देणे : प्लाझ्मा, लाल रक्त पेशी, प्लेटलेट देणे.

पूर्ण रक्त देण्याच्या प्रक्रियेत लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट आणि प्लाझ्मा यांचा समावेश असतो. अनेक आजारामध्ये पूर्ण रक्त देणे फायद्याचे ठरते. पशूंना अपघात झाल्यानंतरचा होणारा रक्तस्राव भरून काढण्यासाठी पूर्ण रक्त देतात.

प्रथिनांची कमतरता, यकृताशी संबंधित आजार, अतिसार होणे, भाजणे यामध्ये प्लाझ्मा संक्रमणाचा अधिक फायदा होतो. (प्लाझ्मा म्हणजे रक्त साकळल्यानंतर (गोठल्यामुळे), रक्ताचा न गोठलेला भाग).पशूंना त्वरित प्रतिकार क्षमता पुरविण्यासाठी प्लाझ्मा संक्रमण करतात.

प्लेटलेट हा रक्ताचा एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त साकळण्याच्या प्रक्रियेत याचा महत्त्वाचा सहभाग असतो. गोचीडजन्य आजार, रक्तात प्लेटलेटची संख्या कमी होते. रक्त गोठण्याच्या संबंधाने होणारे विविध आजार, रक्त लवकर न गोठणे यासाठी प्लेटलेट संक्रमणाचा पर्याय निवडला जातो. तथापि, पशूमध्ये हा पर्याय फार वापरला जात नाही. प्राण्यांच्या शरीरात लाल रक्त पेशींचे प्रमाण अचानक खालावले असल्यास लाल रक्त पेशी संक्रमण केले जाते.

AnimalBlood Transfusion
Veterinary Registration : खासगी पशुसेवकांना नोंदणी करणे बंधनकारक

रक्त संक्रमण प्रक्रियेचे टप्पे

रक्तदाता शोधणे : रक्त देणाऱ्या प्राण्याला रक्तदाता असे म्हटले जाते. रक्त संक्रमणात योग्य रक्तदाता मिळणे खूप महत्त्वाचे आहे.

गायवर्गीय रक्त दाता : वजन कमीत कमी २५० किलो असावे. सशक्त असावा. कोणत्याही आजाराने बाधित नसावे.गेल्या ३ महिन्यांत हिमोप्रोटोझोन आजार नसावा.

रक्त चाचणी परीक्षणामध्ये हिमोग्लोबिन कमीत कमी ११ gm/dl आणि पीसीव्ही ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असावे. प्लेटलेट चार लाख असावे. गोचीड ताप असू नये. शक्यतो नर असावा. मादी असल्यास गाभण नको, माजावर नको, नुकतीच व्यायलेली नको. भाकड काळ आणि व्यायल्यानंतर १ महिना, रक्त घेण्यासाठी आदर्श काळ समजला जातो.

रक्त जुळणी

जसा मनुष्यामध्ये रक्त गट तपासून ठेवला जातो आणि पाहिजे त्यावेळी त्या रक्तगटाच्या माणसाचे रक्त दिले जाते. तसे प्राण्यामध्ये होत नाही. कारण वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगवेगळे रक्तगट आहेत. रक्तगटांची संख्या भिन्न आहे. त्यामुळे प्रत्येक रक्तगट तपासण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही.

AnimalBlood Transfusion
Veterinary Services : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कामाची ॲपद्वारे नोंद

रक्तदाता आणि आजारी प्राणी यांच्या रक्ताची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्या नंतरच रक्त दात्या प्राण्याचे रक्त योग्य आहे की नाही हे ठरविले जाते.प्रक्षेत्रावर पशुवैद्यकासाठी काच पट्टीवर रक्त जुळणी करण्यासाठीची चाचणीसुद्धा उपलब्ध आहे. श्‍वानामध्ये पहिले रक्त संक्रमण विना चाचणी सुद्धा सुरक्षित समजले जाते. तथापि रक्त जुळणी चाचणी करणे आवश्यक आहे.

रक्त जुळणीचे प्रकार

डायरेक्ट पद्धत आणि इनडायरेक्ट पद्धतीने रक्त जुळणी केली जाते.रक्त जमा करणे रक्तदाता प्राणी निश्‍चित झाल्यानंतर, त्याच्या शरीरामधून योग्य मात्रेत आणि योग्य मार्गाने रक्त जमा करणे आवश्यक आहे. अधिक रक्त काढल्यास रक्तदाता प्राण्याच्या जिवास धोका संभवतो.

रक्त दाता प्राण्याच्या शरीरामधून साधारणतः १० मिलि प्रति किलो वजनानुसार रक्त जमा करता येऊ शकते. म्हणजे ३०० किलो वजनाच्या बैलामधून ३ लिटर आणि ३० किलो श्‍वानाच्या शरीरामधून ३०० मिलि रक्त काढता येऊ शकते. प्राण्याच्या मानेत असणाऱ्या जुगुलार नसेमधून रक्त काढले जाते.

AnimalBlood Transfusion
Akola Veterinary College : महाविद्यालय पशुधनाला संजीवनी देणारे ठरेल

रक्ताची साठवण

श्‍वानाचे रक्त जमा करण्यासाठी, मनुष्यासाठी असणारी ३५० मिलि रक्त पिशवी वापरली जाते. गायवर्गीय प्राण्यात स्वच्छ केलेली काचेची बाटली वापरली जाते. परंतु रक्त न गोठण्यासाठी त्यामध्ये रक्त संरक्षक वापरले जातात.

घ्यावयाची काळजी

रक्त संक्रमण होत असताना संक्रमित प्राण्याकडे सतत लक्ष असणे आवश्यक आहे. त्याच्या शरीर हालचालींकडे व बदलांचे निरीक्षण करावे. रक्त संक्रमण करताना रक्त देण्याचा दर योग्य ठेवावा. श्‍वानामध्ये सुरुवातीला ६ ते १२ मिलि/किलो/तास असावा.

कोणतीही अनपेक्षित प्रतिक्रिया न आल्यास जो १५ मिनिटांनंतर २० मिलि/किलो/तास करता येतो. गायवर्गीय जनावरामध्ये हा दर ४० ते ८० मिलि/किलो/तास असावा. रक्त संक्रमण करताना रक्त पिशवी वारंवार हलवणे गरजेचे आहे. ज्यामुळे रक्त आणि त्यामधील रक्त संरक्षक यांची मिसळ होत राहील.

रक्ताची योग्य मात्रा देणे गरजेचे आहे. प्रमाणापेक्षा अधिक किवा कमी रक्त देणे अपेक्षित नाही. प्रत्येकी २० मिनिटांनंतर जनावराचे तापमान, हृदयाचे ठोके, नाडी, डोळ्याच्या हालचाली यांची नोंद ठेवणे महत्त्वाचे आहे.

अनपेक्षित लक्षणे

ताप येतो. हृदयाचे ठोके वाढतात.श्‍वानामध्ये उलटी होते.अशक्तपणा जाणवणे.जनावर थरथरणे. चेहऱ्यावर सूज येणे.लाल लघवी होणे.त्वचेवर लालसरपणा येणे.अनपेक्षित लक्षणे प्राण्यामध्ये दिसल्यास त्वरित रक्त संक्रमण बंद करावे. तापशामक औषधे आणि इतर लक्षण संबंधित उपचार करावेत.

आव्हाने

रक्ताची अनुपलब्धता. रक्त पिशवी अनुपलब्धता. रक्त संक्रमणासंदर्भात अंधश्रद्धा.रक्तदाता / रक्त संक्रमणाबाबत माहितीचा अभाव.रक्त संक्रमणासाठी पशुवैद्यकांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षणाचा अभाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com