डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
Milch Animals : देशी गाईंच्या दूध उत्पादनवाढीसाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. तसेच त्यांच्या आहार आणि आरोग्य व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करावा. जातिवंत देशी गोवंश संगोपनासाठी हवेशीर गोठा, लसीकरण, जंतनिर्मूलन आणि शास्त्रीय पद्धतीने पैदास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.
गोठा नियोजन आजही देशी जनावरांचा गोठा हा पारंपरिक पद्धतीने बांधलेला दिसतो. चारी बाजूंनी बंदिस्त आणि उंचीने कमी असतो. यामध्ये जनावरांची गर्दी असते, तसेच स्वच्छताही पाहिजे त्या प्रमाणात केली जात नाही.
उन्हाळ्यामध्ये अशा गोठ्यामध्ये बांधून ठेवलेल्या जनावरास उष्णतेचा त्रास होतो. शरीरावर ताण येऊन दूध उत्पादन कमी होते. माजावर न येणे किंवा गाभण न राहणे अशा समस्या दिसून येतात. यामुळे देशी जनावरे आर्थिकदृष्ट्यापरवडत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार असते.
याउलट आपण संकरित गाई तसेच मुऱ्हा म्हशींसाठी चांगल्या पद्धतीचा उंच गोठा तयार करतो. यामध्ये जनावरांना गरजेनुसार जागा असते. हे लक्षात घेऊन देशी गोवंशासाठी देखील हवेशीर आणि योग्य आकारमानाचा गोठा तयार करावा.
बऱ्याचवेळा देशी जनावरे ऊन, पावसात झाडाखालीच बांधलेली दिसून येतात. यामुळे जनावरांच्या शरीरावर ताण राहून उत्पादनावर जातिवंत दुधाळ गोवंशाचे संगोपन जातिवंत देशी गाईंच्या संगोपनासाठी मुक्त संचार गोठा फायदेशीर ठरतो.
गोठ्यामध्ये जातिवंत पैदास तयार करावी. डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील देशी जनावरांना चांगली व्यवस्थित जागा उपलब्ध असलेला आणि ऊन, पावसापासून संरक्षण करणारा गोठा असावा, परंतु तो कमी खर्चिक असावा. चांगल्या प्रतीचा चारा द्यावा.
योग्य आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापन केल्यास जातिवंत देशी गोवंशाची दुधाळ पिढी आपल्या गोठ्यात तयार होते. प्रजनन व्यवस्थापन पशुपालक देशी गाय माजावर आल्यानंतर नैसर्गिक रेतनासाठी वापरात येणारा वळू हा उत्तम, जातिवंत वळू आहे का? त्या वळूच्या आईचे दूध उत्पादन किती होते? याची माहिती घेत नाही.
गावातील उपलब्ध वळू हा बऱ्याचवेळा जातिवंत नसतो तसेच तो कमी दूध उत्पादनशील गाई-वळूपासून जन्मलेला असू शकतो. आपल्या देशी गाईची पुढची पिढी उत्पादनशील बनवण्यासाठी नैसर्गिक रेतनासाठी सिद्ध वळू असावा. आता सर्व ठिकाणी देशी गोवंशाच्या रेतमात्रा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या देशी गाईंमध्ये कृत्रिम रेतन करून पुढची पिढी उत्पादनशील तयार करता येते.
गावातील नैसर्गिक रेतनासाठी वापरात येणाऱ्या वळूची कोणत्याही संसर्गजन्य आजाराची चाचणी केलेली नसते, त्यामुळे अशा वळूपासून गावातील देशी गाईंना रोगांचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. आपली गाय फक्त गाभण राहिली पाहिजे मग वासरू कसले का होईना हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. आरोग्य व्यवस्थापन देशी गाईची रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे.
परंतु रोगप्रतिकारशक्ती आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे योग्य आहार व्यवस्थापनबरोबरच आपल्या देशी जनावरांचे संसर्गजन्य आजारापासून नियंत्रण करण्यासाठी जंतनिर्मूलन, लसीकरण आवश्यक आहे.
गोठा स्वच्छता, गोठ्यासभोवतालचा परिसर स्वच्छ आणि कोरडा राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांचे बाह्यपरजीवी जसे गोचीड, पिसवा, उवा, माशा इत्यादींपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
परिणाम होत असतो. हे लक्षात घेऊन देशी जनावरांना चांगली व्यवस्थित जागा उपलब्ध असलेला आणि ऊन, पावसापासून संरक्षण करणारा गोठा असावा, परंतु तो कमी खर्चिक असावा.
देशी गायींना नेहमी बांधून न ठेवता त्यांना मुक्तसंचार गोठ्यात ठेवल्यास त्यांचे दूध उत्पादन वाढण्यास आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. आहार व्यवस्थापन बहुतांश जण देशी जनावरांच्या खाद्यामध्ये उपलब्ध कडबा, सोयाबीन गुळी/भुसकट तसेच बांधावरील गवत आणि शेतातील तण वापरतात. यामध्येपोषणतत्त्वांची कमतरता असते, त्यामुळे जनावरांची वाढ व्यवस्थित होत नाही, अपेक्षित दूध उत्पादन मिळू शकत नाही.
देशी जनावरांना पशुखाद्य दिले जात नाही किंवा खूपच कमी प्रमाणात देतात. क्षार मिश्रणाचा वापर करत नाही. तरीही अशा जनावरांकडून आपण दूध उत्पादनाची अपेक्षा धरतो. जर त्यांचा आहार चुकीचा असेल तर ही जनावरे अपेक्षित दूध उत्पादन देऊ शकत नाहीत.
देशी जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा जसे की संकरित नेपियर, मका, कडवळ काही प्रमाणात द्विदल चारा दिला तर निश्चितपणे त्यांचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. देशी गायींना बाहेर चारण्यासाठी चारा उपलब्ध नसताना विनाकारण बाहेर फिरवू नये.
देशी जनावरांनाही गोठ्यामध्ये चारा कुट्टी करून द्यावा. पिण्यासाठी स्वच्छ मुबलक पाण्याची उपलब्धता करावी. गाभणकाळात देशी गाईंना योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. यामुळे गर्भाशयातील वासरू सुदृढ जन्मते तसेच पुढच्या वेतातील दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
वासरांचे संगोपन आपण नेहमी पाहतो, की पशुपालक देशी गाईच्या कालवडीला दूध खूपच कमी प्रमाणात पाजतात आणि खोंडाना जास्त प्रमाणात दूध पाजतात. याचा परिणाम होऊन देशी कालवडींची वाढ कमी होते. वाढीच्या प्रमाणात त्यांचे वजन कमी राहाते.
दिवसेंदिवस पहिले तर लक्षात येईल, की आपल्या देशी गायीचे प्रौढ वजन हळूहळू घटू लागले आहे. जर या देशी गाईची शरीरयष्टी मजबूत नसेल किंवा कासेची वाढ योग्य प्रमाणात नाही झाली तर दूध कोठून मिळणार, हा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.
उत्तम देशी गाईंच्या निर्मितीसाठी कालवड संगोपनाकडे जास्तीचे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी जातिवंत देशी कालवड संगोपनाची सुरुवात करावी. यामध्ये सुरुवातीला निश्चित जास्तीचा खर्च होईल, परंतु देशी गोवंशाची पुढील पिढी निश्चितपणे उत्पादनशील तयार होईल.
जातिवंत देशी कालवडीच्या आहारात मिल्क रिप्लेसर, बाळ खुराक आणि पौष्टिक एकदल, द्विदल चाऱ्याचा वापर केल्यास देशी गाय शरीराने सुदृढ आणि जास्त दूध उत्पादनशील बनते. जातिवंत देशी गोवंश संगोपन करणाऱ्या पशुपालकांना कालवड संगोपनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत किंवा खाद्य पुरवठा करणे गरजेचे आहे. उत्तम वाढीसाठी वेळोवेळी वासरांचे जंतनिर्मूलन करणे गरजेचे आहे.
प्रजनन व्यवस्थापन पशुपालक देशी गाय माजावर आल्यानंतर नैसर्गिक रेतनासाठी वापरात येणारा वळू हा उत्तम, जातिवंत वळू आहे का? त्या वळूच्या आईचे दूध उत्पादन किती होते? याची माहिती घेत नाही.
गावातील उपलब्ध वळू हा बऱ्याचवेळा जातिवंत नसतो तसेच तो कमी दूध उत्पादनशील गाई-वळूपासून जन्मलेला असू शकतो. आपल्या देशी गाईची पुढची पिढी उत्पादनशील बनवण्यासाठी नैसर्गिक रेतनासाठी सिद्ध वळू असावा.
आता सर्व ठिकाणी देशी गोवंशाच्या रेतमात्रा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या देशी गाईंमध्ये कृत्रिम रेतन करून पुढची पिढी उत्पादनशील तयार करता येते. गावातील नैसर्गिक रेतनासाठी वापरात येणाऱ्या वळूची कोणत्याही संसर्गजन्य आजाराची चाचणी केलेली नसते, त्यामुळे अशा वळूपासून गावातील देशी गाईंना रोगांचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. आपली गाय फक्त गाभण राहिली पाहिजे मग वासरू कसले का होईना हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
आरोग्य व्यवस्थापन देशी गाईची रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे. परंतु रोगप्रतिकारशक्ती आहार व्यवस्थापनावर अवलंबून असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे योग्य आहार व्यवस्थापनबरोबरच आपल्या देशी जनावरांचे संसर्गजन्य आजारापासून नियंत्रण करण्यासाठी जंतनिर्मूलन, लसीकरण आवश्यक आहे.
गोठा स्वच्छता, गोठ्यासभोवतालचा परिसर स्वच्छ आणि कोरडा राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांचे बाह्यपरजीवी जसे गोचीड, पिसवा, उवा, माशा इत्यादींपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.