Animal Care : जनावरांचे वजन वाढ, वंशावळ निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज

Dr. Nitin Markandey : पशू संवर्धन करताना शेतकऱ्यांनी जनावरांचे वजन वाढ आणि शुद्ध वंशावळ निर्मितीकडे लक्ष देण्याची आज गरज आहे.
Dr. Nitin Markandeya
Dr. Nitin MarkandeyaAgrowon
Published on
Updated on

Jalna News : पशू संवर्धन करताना शेतकऱ्यांनी जनावरांचे वजन वाढ आणि शुद्ध वंशावळ निर्मितीकडे लक्ष देण्याची आज गरज आहे. तसेच ‘ठेवा कोरडा गोठा, तेंव्हाच मिळतील कायम नोटा’, असे विचार परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक चर्चासत्रात व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक व मराठवाडा शेती साह्य मंडळाचे सचिव कृषिरत्न विजयअण्णा बोराडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परिवीक्षाधीन जिल्हाधिकारी अरुण एम., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने व केव्हीकेतील विविध विषयाचे तज्ज्ञ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Dr. Nitin Markandeya
Nabard Seminar: पीक कर्जासाठी सीबीलची अट नको: मुख्यमंत्री

डॉ. मार्कंडेय म्हणाले, की शेतीच्या उत्पन्नाविषयी सेंद्रिय कर्बाविषयी ज्या अडचणी समोर येत आहेत, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने देशी गोवंश संवर्धन करण्याचा मार्ग अवलंबण्याची गरज आहे. यामुळे शेतामध्ये पिकांना नैसर्गिकरीत्या मातीमधून विविध अन्नघटक सुलभतेने उपलब्ध होतील. सदृढ मातीतून सदृढ पिके घेऊन सक्षम भारत निर्मितीचा दिव्य उद्देश साधला जाऊ शकतो.

Dr. Nitin Markandeya
Agriculture Technology : शेतीमाल वाळविण्यासाठी पॉलिटनेल ड्रायर

समृद्ध व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या आहारामध्ये दूध, तूप, दही, लोणी, ताक व तत्सम दुग्ध जन्य पदार्थ यांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे.

दुधाळ जनावरांच्या संगोपनाकरिता मुक्त गोठा निर्माण करावा यामुळे पशुसंवर्धन करताना येणाऱ्या कासदाह, नेहमी-नेहमी गाय उलटणे, माज न दाखवणे तसेच खाणे अंगी न लागणे यासारख्या अडचणीवर मात करता येते असे सांगितले.

साध्या व सोप्या पद्धतीने जनावरांचे वजन मोजण्यासाठी छातीचा घेर याचा वर्ग करून जनावराच्या लांबीने गुणून यास ६६० अंकाने भागावे व याचा वापर करण्याचे सांगितले. बदलत्या युगात गाईंच्या शेणापासून गोबरगॅस, धूप बनवणे, उदबत्त्या, पणत्या, दिवे, मूर्ती व गवऱ्या बनवणे यासारखे उद्योगही करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. या वेळी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com