Methane Emission : मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना

Environmental Protection : खाद्य आणि आहाराच्या मिथेन उत्पादन क्षमतेवरील प्राथमिक नोंदीवर आधारित पशुधनातून आंतरीक मिथेन उत्सर्जनावर राज्यवार यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने विशेष प्रकल्प महत्त्वपूर्ण राबविला. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
Methane Emission
Methane EmissionAgrowon
Published on
Updated on

डॉ.मनोजकुमार आवारे

Emission Reduction : भारतीय कृषी संशोधन परिषदेने मिथेन उत्सर्जनाच्या तंतोतंत अंदाजाची पद्धती विकसित करणे आणि आंतरीक मिथेन सुधारण्यासाठी धोरणे तयार करण्याची कल्पना मांडली होती. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिषदेने विविध खाद्य प्रणाली अंतर्गत मिथेन उत्सर्जनाचा अंदाज आणि कमी करण्याच्या धोरणांचा विकास या दीर्घकालीन प्रकल्पासाठी वित्तपुरवठा केला.

यामध्ये पशुधन प्रजाती (गाय, म्हैस, मेंढी आणि शेळी) आणि प्रादेशिक स्तरावर आंतरीक मिथेन उत्सर्जनाची प्रमुख कारणे शोधणे इत्यादींचा समावेश होतो. विशेष प्रकल्पामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत बंगळुरू आणि अविकानगर येथील संशोधन संस्था, चेन्नई येथील पशुवैद्यकीय विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, आनंद आणि बाएफ या स्वयंसेवी संस्थेचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी संशोधन प्रकल्प सुरू आहेत.

खाद्य आणि आहाराच्या मिथेन उत्पादन क्षमतेवरील प्राथमिक नोंदीवर आधारित भारतीय पशुधनातून आंतरीक मिथेन उत्सर्जनावर राज्यवार यादी तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला. या प्रकल्पांतर्गत हरितधारा, तामारिन प्लस आणि अवि बाटिका यांसारख्या अँटी-मिथेनोजेनिक उत्पादनांचा विकास झाला आहे.

Methane Emission
Climate Change : मिथेन उत्सर्जनाचा जनावरांवर होतोय परिणाम

प्रकल्पातील प्रमुख संशोधन

मिथेन इन्व्हेंटरीचा विकास.

मिथेन उत्पादनाच्या अंदाजासाठी समीकरण.

भारतातील आंतरीक मिथेन उत्सर्जनाचे प्रजातीनिहाय योगदान.

आंतरीक मिथेन सुधारक रणनीती: मिथेन सुधारात्मक उपायांचा विकास.

उष्णकटिबंधीय झाडांच्या पानांचे पूरक.

कृषी घटक.

अपारंपारिक स्त्रोत: रेशीम कीटक प्युपा तेल

बाभूळ अरेबिका झाडाची साल.

तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘बाएफ'चे प्रयत्न

बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन जमीन, पाणी, पशुधन आणि वनस्पती यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आर्थिक विकासासाठी प्रयत्न करत आहे. दुग्धोत्पादन सुधारण्यासाठी आणि ग्रामीण लोकांना शाश्वत उपजीविका देण्यासाठी १५ राज्यांमध्ये सुमारे ४,५०० पेक्षा जास्त पशुधन विकास प्रजनन केंद्र कार्यरत आहेत.

हरीतधरा तंत्रज्ञान

उरुळी कांचन येथील पशूप्रक्षेत्रावर संकरित जनावरांच्यामध्ये हरितधारा या अँटी मिथेनोजेनिक उत्पादनांचे मूल्यमापन करण्यात आले. अभ्यासाचे परिणाम लक्षणीयरित्या जास्त शरीराचे वजन आणि प्रायोगिक गटात सरासरी दैनंदिन वाढ दर्शवितात. ‘अॅग्रिनोवेट-आयसीएआर'तर्फे हरीतधराच्या माध्यमातून पशुधनाचे मिथेन उत्सर्जन १७ ते २० टक्यांपर्यंत कमी करण्यात मदत होईल. दुग्धजन्य जनावरांची उत्पादकता सुधारण्यास मदत करेल.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने मिथेनोजेनिक विरोधी हरितधरा विकसित केले आहे. टॅनिन समृद्ध वनस्पती आधारित स्त्रोतांपासून बनविले आहे. काही निवडक फायटो स्त्रोतांचा वापर करून तयार केलेले अँटी-मिथेनोजेनिक फीड सप्लिमेंट आहे. यामध्ये कंडेन्स्ड टॅनिन, हायड्रोलायसेबल टॅनिन आणि सॅपोनिन्स असतात. हे उत्पादन आंतरीक मिथेन उत्सर्जन १८ ते २० टक्के कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. पशुखाद्यामध्ये समाविष्ट केल्यावर पशुधनाची उत्पादक कामगिरी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

Methane Emission
Animal care : जनावरांमधील मिथेन उत्सर्जन अन् प्रतिबंधात्मक उपाय

मात्रा

हरितधरा ५०० ग्रॅम प्रति प्रौढ जनावर आणि १५० ग्रॅम प्रति दिवस प्रति वासराला द्यावे.

चार महिन्यांच्या आतील वासरांच्या आहारात हरितधरा वापरू नये. कारण त्यांचे ओटीपोट संपूर्णपणे तयार झालेले नसते.

ओटीपोटातील (रूमेन) प्रोटोझुआ सूक्ष्मजंतूंची संख्या कमी करते, जे हायड्रोजन उत्पादनासाठी जबाबदार असते. कार्बन डायऑक्साइडचे रुपांतर मिथेनमध्ये कमी करण्यासाठी मदत करते.

वापरल्यानंतर किण्वन केल्याने अधिक प्रोपियोनिक ॲसिड तयार होण्यास मदत होईल, जे लॅक्टॉज (दुधातील साखर) उत्पादन आणि शरीराचे वजन वाढवण्यासाठी अधिक ऊर्जा देते.

जनावरांच्या मिथेन उत्सर्जन १७ ते २० टक्के प्रमाण कमी होऊन दूध उत्पादन वाढ होऊ शकते.

हरितधरा दिल्यानंतर वैयक्तिक प्रौढ जनावरांसाठी दररोज ५०० ग्रॅम पशुखाद्य वाचते.

बाएफतर्फे २५० टनांपेक्षा जास्त हरितधरा हे विविध प्रकल्पांतर्गत जनावरांना दिले आहे. यातून सुमारे १२ टन मिथेन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली.

अवि बाटिका

अविकानगर येथील केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेने अँटी-मिथेनोजेनिक फीड ब्लॉकद्वारे अवि बाटिका निर्मिती केली आहे.

लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा वापर

पारंपारिक गर्भदान आणि नैसर्गिक रेतनामुळे ५० टक्के नर वासरे तयार होत आहेत. या नर वासरांचा आहार आणि व्यवस्थापन खर्चामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. यावर पर्याय म्हणजे वर्गीकृत वीर्य रेतमात्रा तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. या तंत्रज्ञानाने ९० टक्के मादी वासरे जन्मतात.

शेण आणि खत हाताळणी

पशुधन प्रक्षेत्रावरील वायू उत्सर्जनाचा मुख्य स्त्रोत म्हणजे घन, स्लरी स्वरूपात विविध भौतिक गुणधर्मांसह असणारे शेणखत. या खताचा योग्य वापर करावा. बायोगॅस डायजेस्टर, बायो प्रॉम, गांडूळ खत इत्यादी तंत्रज्ञानाच्या विविध संकल्पनांबाबत जागरूकता करणे आवश्यक आहे.

मिखत साठवण सुविधा आणि बायोगॅस डायजेस्टर आच्छादित करणे हे मिथेन कमी करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे.

बाएफ संस्थेने बायोगॅसचे शाश्वत ऊर्जा मॉडेल तयार केले आहे. याला पेटेंट मिळाले आहे. या तंत्राने द्रवरूप जैविक खते तयार करता येतात.

लोकांमध्ये जागरूकता

मिथेन कमी करण्याच्या धोरणांसाठी, पशुधनासाठी मिथेन सुधारक उत्पादनांचा वापर, मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी मूल्यवर्धित उत्पादनांचा वापर, पीक व्यवस्थापनासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, शेण आणि खत व्यवस्थापन करावे लागेल.

वेगवेगळ्या संशोधन संस्थांनी मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी विकसित केलेली उत्पादने आणि तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रातील कामगारांद्वारे क्षेत्रामध्ये प्रचार केला पाहिजे.

हरितधारा सारखी मिथेन कमी करणारी उत्पादने उद्योजकता बिझनेस मॉडेलच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध करून द्यावीत. अशा व्यापारीकरणासाठी विविध खासगी उद्योजकांना सहभागी करून घ्यावे.

दूध पुरवठा साखळीच्या शेवटच्या भागात उत्सर्जनाचे स्त्रोत म्हणजे दूध आणि प्रक्रिया युनिट यांच्या वाहतुकीदरम्यान होणारे कार्बन डॉयऑक्साईड उत्सर्जन. यासाठी सौर आणि उर्जेचे इतर नूतनीकरणीय स्त्रोत हे मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्याय आहेत.

मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि उत्पादने किफायतशीर असावीत.

पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपाय

पशुपालकांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करावा. उच्च आनुवंशिकतेची जनावरे सांभाळावीत.

चारा पिके ही कमी मिथेन उत्सर्जन करणारी असावीत. पर्यावरण पूरक चारा आणि व्यवस्थापनाचा अवलंब पशुपालनामध्ये करावा.

लिंग निर्धारित रेत मात्रा, जनावरांच्या आहारामध्ये हरितधरा या सारखे मिथेन उत्सर्जन कमी करणारे अन्नपुरक घटक वापरावेत. जेणेकरून जनावरांपासून मिथेन उत्सर्जन कमी होवून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

दुग्ध व्यवसाय, पशुपालानाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पहावे. संतुलित आहार प्रणाली, योग्य चारा नियोजन, चारा आणि पिकांच्या अवशेषांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रक्रिया जसे, की ओझोन प्रक्रियेचा वापर करून जनावरांची उत्पादकता आणि प्रजाननक्षमता सुधारता येईल.

जनावरांच्यामार्फत नैसर्गिकरित्या तयार होणारे मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी बाएफ संस्थेमार्फत काही तांत्रिक प्रणालींचा वापर करण्याच्यादृष्टीने यशस्वी प्रयत्न होत आहे. यामध्ये लिंग निर्धारित रेतमात्रांचा कृत्रिम गर्भधारणेसाठी उपयोग, हरितधरा, सौर व अक्षय उर्जेवर आधारित बायोगॅस मॉडेलचा वापर केला जात आहे.

शेणाचा योग्य वापर करण्यासाठी बायोगॅस आणि बायोप्रॉम निर्मिती करावी.

संतुलित खाद्य आणि चारा एकत्र करून सुधारित आहार पद्धतीचा वापर करावा. पीक अवशेषांचे विविध पद्धतीने मूल्यवर्धन करावे.

डॉ.मनोजकुमार आवारे, ९४२१००७७८५ (विभाग प्रमुख, पशुपोषण व पशुआहार शास्त्र, बाएफ, उरुळी कांचन,जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com