Poultry Smallholder trader Problems
Poultry Smallholder trader ProblemsAgrowon

Poultry Farming : अल्पभूधारक पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी सोडवा

Poultry Business : शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्रीची सुरुवात करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर नजीकच्या काळात अनेक आव्हाने उभी आहेत.
Published on

Amravati News : शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्रीची सुरुवात करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर नजीकच्या काळात अनेक आव्हाने उभी आहेत. त्याच्या सोडवणुकीसाठी राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

या समितीच्या चार बैठकांमधून एकाही प्रश्‍नावर तोडगा निघू शकला नाही. परिणामी या समितीच्या अस्तित्वावर अमरावती जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे अतुल पेरसपुरे यांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना जमीन अकृषक करण्याची सक्‍ती केली जाते. जमीन अकृषक नसेल तर बॅंक कर्ज द्यायला तयार होत नाही. मात्र त्याचवेळी अकृषक जमीन केल्यानंतर २ एकरांसाठी वार्षिक ११ हजार ५०० रुपये इतका महसूल कर आकारणी सुरू होते.

Poultry Smallholder trader Problems
Poultry Farming : युवकाने आकारास आणला स्वयंचलित पोल्ट्री व्यवसाय

त्यानंतर संबंधित अल्पभूधारक शेतकऱ्याकडे गहाण ठेवण्यासाठी काहीच नसेल तर बॅंका कर्ज देण्यास तयार होत नाही. मात्र जमीन अकृषक केली असल्याने व्यवसाय उभा राहिला नाही तरी महसुली कर मात्र भरावाच लागतो, अशी बिकट परिस्थिती आहे.

शेतातील बांधकाम हे शेतीच समजण्यात यावे, असे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गावागावांत सर्रास ग्रामपंचायत कराची ती देखील अवाजवी आकारणी होते. विशेष म्हणजे शेतातील अशा बांधकामाकरिता ग्रामपंचायतस्तरावरून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. तरी सुद्धा कर कशाचा आकारला जातो, हे एक कोडेच आहे.

Poultry Smallholder trader Problems
Poultry Industry : अंडी समन्वय समिती स्थापनेच्या हालचाली

एक दिवसाच्या पक्षाचा २१ ते २२ रुपये उत्पादन खर्च असताना त्यापोटी ४५ ते ५० रुपये आकारले जातात. या माध्यमातून कंपन्यादेखील पोल्ट्री व्यावसायिकांचे शोषण करतात. पोल्ट्री व्यावसायिकांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा होतो.

कृषिपंपाच्या धर्तीवर त्यांना दर आकारणी व्हावी, अशी देखील पोल्ट्री संघटनांची मागणी आहे. या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या चार बैठका झाल्या. परंतु परिणाम शून्य आहेत. त्यामुळे या समितीच्या अस्तित्वावर शंका असल्याचा आरोपही अतुल पेरसपुरे यांनी केला आहे.

राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीने ग्रामविकास, महावितरण, सौरऊर्जा प्राधिकरण याकडे पत्रव्यवहार चालविला आहे. परंतु एकाच शासनाच्या दोन विभागांत समन्वय नसल्यागत नुसती कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यातून आउटपूट शून्य आहे. शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या छोट्या पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा आहे.
- अतुल पेरसपुरे, सचिव, अमरावती जिल्हा पोल्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com