Nagpur News : नॅशनल एग्ज कॉर्डिनेशन समितीच्या धर्तीवर महाराष्ट्र एग्ज कॉर्डिनेशन समितीची स्थापना करावी. अंडी उत्पादकांचे हे फेडरेशन राज्यातील अंडी बाजार, दरासह इतर बाबींवर नियंत्रण ठेवेल.
त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करेल. त्यामुळे अशा फेडरेशनच्या स्थापनेला मान्यता मिळावी,’’ अशी पोल्ट्री व्यवसायिकांची मागणी आहे. दुसरीकडे याकरिता कोणत्याच शासन परवानगीची गरज नसल्याने असे फेडरेशन स्थापन करण्यात अडचण नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.
राज्यातील लेअर आणि बॉयलर पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य असलेल्या डॉ. पठाण यांनी महाराष्ट्र अंडी समन्वय समिती असावी, अशी मागणी केली आहे. त्यावर पशुसंवर्धन आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रीय अंडी समन्वय समितीप्रमाणे महाराष्ट्रातील अंडी उत्पादक (हॅचरीधारक) पोल्ट्री व्यावसायिकांसाठी राज्य अंडी समन्वय समिती असावी हे स्वागतार्ह आहे. ही संघटना, फेडरेशन योग्य अधिनियमाखाली स्थापन करावी. राज्यातील जास्तीत जास्त कुक्कुटपालकांना यात सहभागी करून घ्यावे. यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीमध्ये सदस्य असलेल्यांनी पुढाकार घ्यावा.
कर्नाटकमध्ये अशाप्रकारचे फेडरेशन असल्याची माहिती या वेळी डॉ. पठाण यांनी दिली. त्याची दखल घेत त्या ठिकाणी असलेल्या फेडरेशनचे कामकाज डॉ. पठाण यांनी जाणून घ्यावे. त्या फेडरेशनचे कामकाज नेमके कसे चालते, याबाबतही आढावा घेण्याची सूचना डॉ. हेमंत वसेकर यांनी बैठकीत दिली. परिणामी, राज्यस्तरीय फेडरेशनची स्थापना होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.