Livestock Management : जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन

Animal Welfare : ऋतुमानानुसार हिवाळा ऋतू हा जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो परंतु अति थंडीमुळे जनावरांचे नुकसान होते. यामध्ये दुग्ध उत्पादन कमी होणे, श्वसनाचे आजार दिसतात.
Animal
AnimalAgrowon
Published on
Updated on

डॉ.रविराज सूर्यवंशी, डॉ.अनिल पाटील

Animal Health Management : ऋतुमानानुसार हिवाळा ऋतू हा जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो परंतु अति थंडीमुळे जनावरांचे नुकसान होते. यामध्ये दुग्ध उत्पादन कमी होणे, श्वसनाचे आजार दिसतात. अशा परिस्थितीत दुग्धजन्य जनावरांची हिवाळ्यात काळजी घेणे फार गरजेचे आहे, जेणेकरून त्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होणार नाही.

थंडीच्या काळात जनावरांच्या

देखभालीमध्ये बदल केल्याने त्यांची संसर्गजन्य रोग प्रतिकारशक्ती वाढते. थंडीमुळे होणारे आजार टाळता येतात. थंडीमुळे जनावरांच्या शरीराला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते, जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य राहते. परंतु योग्य व्यवस्थापन आणि लक्ष देऊन आपण या समस्या सोडवू शकतो आणि जनावरांची उत्पादकता टिकवून ठेवू शकतो.

गोठ्यामधील व्यवस्थापन

थंड वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यामध्ये पडदे वापरावेत. जनावरांना दिवसा उन्हात ठेवावे, जेणेकरून त्यांना सूर्यकिरणांपासून जीवनसत्त्व -ड मिळेल.

गोठ्यामध्ये जास्त क्षमतेचे बल्ब लावल्याने तापमान स्थिर होते. त्यामुळे थंड वाऱ्यापासून संरक्षण होते.

Animal
Winter Livestock Care : थंडी काळातील जनावरांचे व्यवस्थापन

आहाराचे व्यवस्थापन

शास्त्रीय दृष्टिकोनातून थंड हवामानात, जनावरांना ८ ते २५ टक्के जास्त खाद्य लागते. यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होऊ शकते. शेंगदाणा पेंड, मोहरीची पेंड, प्रथिने भरपूर असलेले सोयाबीन यांसारखा पौष्टिक आहार द्यावा. पिण्यासाठी कोमट पाणी द्यावे, जेणेकरून थंडीपासून संरक्षण होईल. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.

दूध उत्पादन आणि शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी कोरडे गवत , बरसीम सारखा चारा द्यावा. थंडीच्या काळात जनावरांच्या आहारात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. पशुपालकांनी जनावरांच्या आहारात मोहरीच्या तेलाचा २ टक्यांपर्यंत समावेश करावा, जेणेकरून त्यांना आवश्यक चरबी आणि ऊर्जा मिळू शकेल.

जनावरांना हिरवा व सुका चारा पुरेशा प्रमाणात द्यावा. बरसीम, ल्युसर्न इत्यादी हिरवा चारा हिवाळ्यात जनावरांसाठी अत्यंत पोषक असतो. याशिवाय हिवाळ्यात कोमट पाण्यामध्ये थोडासा गूळ (५०-१०० ग्रॅम) मिसळावा. ज्यामुळे त्यांचे शरीर उबदार राहते.

Animal
Livestock Management : बदलत्या हवामानात जनावरांचे व्यवस्थापन

लसीकरण

हिवाळ्यात जनावरांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असते. लाळ्या खुरकूत, घटसर्प, विषबाधा, धनुर्वात, इत्यादी आजारांच्या त्यांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण करावे.

थंड वातावरणात शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी जनावरांना नियमितपणे प्रथिने आणि ऊर्जायुक्त आहार द्यावा. -आहारात तंतूमय घटकांचे प्रमाण जास्त असल्याची खात्री करावी, जेणेकरून दुधातील फॅटचे प्रमाण कायम राहील.

थंडीमुळे जनावरांना खोकला, सर्दी, न्यूमोनिया यांसारख्या आजारांचा धोका असतो. त्यामुळे जनावरांवर लक्ष ठेवावे. आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. शेळ्या मेंढ्यांमध्ये फुफुसाचा दाह, सर्दी, खोकला, यासारखे आजार मुख्यतः

हिवाळ्यात दिसून येतात, त्यामुळे त्यांना उबदार गोठ्यामध्ये ठेवणे महत्त्वाचे असते.

ताज्या पाण्याची उपलब्धता

हिवाळ्यात जनावरांना स्वच्छ ताजे व कोमट पाण्याची पूर्तता करावी. कारण थंडीमध्ये मुख्यतः जनावरे थंड पाणी पिण्यास नाकारतात, त्यामुळे पचनक्रियेचे आजार, कमकुवतपणा ही लक्षणे दिसून येतात.

थंडीमुळे अनेक वेळा पशुपालक आपल्या जनावरांना पाणी देण्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र थंडीत त्यांच्या पचनसंस्थेसाठी आणि आरोग्यासाठी पाणी आवश्यक असते. जनावरांना नेहमी ताजे पाणी उपलब्ध असल्याची खात्री करावी.

दररोजच्या पिण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ (५०-१००ग्रॅम) वापर केला तर जनावरे पाणी जास्ती पितात. यामुळे त्यांना आजार पासून दूर ठेवता येते.

वासरांची काळजी

५ महिन्यापर्यंतच्या वासरांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या वयात आजार होण्याची शक्यता असते. थंड हवेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा गोठा पॉलिथिनने झाकून ठेवावा किंवा जास्त क्षमतेचे बल्ब लावावेत. त्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान स्थिर राहते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कोमट पाणी आणि पुरेशा प्रमाणात चीक आणि दूध द्यावे. तसेच वासरांना दररोज १-२ तास उन्हात फिरण्याची संधी द्यावी, जेणेकरून त्यांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील.

लहान वासरांना जंतनाशक द्यावे. शरीरावर पिसवा, गोचीड, तांब, इत्यादी परोपजीवीचा प्रादुर्भाव असेल तर त्याचे पशुवैद्यकाकडून प्रतिबंधात्मक इलाज करून घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com