Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Poultry Management Issue : राज्यातील सर्वच भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम कुक्कुट उद्योगावर झाला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोंबड्या जगवायच्या कशा? असा प्रश्‍न कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे.
Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले
Published on
Updated on

Nagar News : राज्यातील सर्वच भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम कुक्कुट उद्योगावर झाला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोंबड्या जगवायच्या कशा? असा प्रश्‍न कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे.

उन्हाचा अत्याधुनिक पोल्ट्री शेडमध्ये फारसा परिणाम जाणवत नसला तरी खुल्या शेडमधील कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले असून वजनातही कमालीची घट होत आहे. त्यामुळे बाजारात दर चांगला असूनही शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

राज्यात सुमारे दोन लाखांच्या जवळपास शेतकरी ब्रायलर कुक्कुटपालन करतात. खासगी कंपन्यांशी करारावर कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. साधारणपणे दर महिन्याला चार ते साडेचार कोटी कोंबड्याचे आणि दहा कोटी किलोच्या जवळपास कुक्कुटमांस उत्पादीत होते.

नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात ब्रायलर कुक्कुटपालन केले जाते.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले
Poultry Disease : कोंबड्यांतील संक्रमक कोराइजा आजार

याशिवाय परसातील गावरान कुक्कुटपालन करणारेही लाखापेक्षा अधिक शेतकरी राज्यात आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताने कोंबड्याच्या मरतुकीचे प्रमाण सध्या २० ते २५ टक्क्यावर गेले आहे. ज्या कोंबडी शेडमध्ये एसी व अन्य सुविधा आहेत, तेथे उन्हाचा परिणाम अल्प आहे. मात्र असे शेड असलेल्या शेतकऱ्यांची संख्या दहा ते पंधरा टक्के असून ८० टक्के शेतकरी खुल्या शेडमध्ये कुक्कुटपालन करतात,

तेथे मात्र अधिक फटका आहे. साधारणपणे ४२ दिवसांत वाढ होणारे वजनासाठी सध्या ५० दिवस लागत आहेत. त्यात खाद्य अधिक लागत असून जसे वजन वाढेल तसे मरतुकीचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा सर्वाधिक फटका कुक्कुटपालन करणाऱ्यांना शेतकऱ्यांना बसत आहे.

दर मिळूनही आर्थिक फटका

उन्हाळ्यात चिकनला मागणी कमी असते. मात्र उन्हामुळे नुकसान होत असल्याने सध्या कुक्कुट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नेहमीच्या तुलनेत केवळ ४० टक्के आहे. त्यातही मरतुकीचे प्रमाण अधिक आहे.

त्यामुळे साधारणपणे शंभर रुपये किलोपर्यंत असलेला ठोक विक्रीचा चिकनचा सध्याचा दर १६० ते १८० रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात ३०० रुपये प्रती किलो दर मिळत आहे. ठोक व किरकोळ बाजारात ब्रायलर चिकनला दर चांगला असूनही मुरतुक, वजनात घट आणि वाढीला अधिक कालावधी लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले
Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

चिकनचे दर प्रती किलो

ब्रॉयलर (जिवंत) १६० ते १८०

ब्रॉयलर (कापून) २६० ते ३००

गावरान जिवंत २३० ते २६०

गावरान (कापून) ३४० ते ३६०

उन्हामुळे पक्षांना उष्णता सहन होत नाही. ३० अंश सेल्सिअसला पंधरा दिवसांपर्यंत. त्यानंतर जस वजन वाढेल तशी शरिरात तापमान वाढते. त्यामळे बाहेरील तापमान कमी करावे लागते. सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्याचा परिणाम कुक्कुटपक्षांवर होत आहे. २४ ते २८ तापमान असणे गरजेचे आहे. ज्यांचे एसी शेड त्यांना शक्य, पण इतरांना ते शक्य होईना. त्यामुळे नुकसानीने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सचिन भोंगळ, कुक्कुटपालन करणारे शेतकरी, राहुरी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com