Cowshed Management : मुक्त गोठा तंत्राने जनावरांचे संगोपन झाले सुकर

Animal Care : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पशुपालकांची संख्या मोठी आहे. जनावरांच्या संगोपनासाठी पशुपालकांनी मागील काही वर्षात मुक्‍त संचार गोठ्यावर पशुपालकांनी भर दिल्याने विस्तारही मोठा झाला आहे.
Animal care
Animal care Agrowon

Animal Health Management : जनावरे खास करून दुभती जनावरे सांभाळणे तसे कठीणच. पारंपरिक पद्धतीत मजूर तसेच जनावरांनाच्या चारा आणि एकूण आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचा प्रश्‍न गंभीर आहे.

परंतु मुक्‍त गोठा पद्धतीचा अवलंब पशुपालकांनी करायला सुरुवात केल्यापासून पशुपालनात बऱ्यापैकी सकारात्मकता आल्याचे चित्र आहे. शिवाय जनावरांचा आरोग्य सुदृढ राहून त्यांचा सांभाळ करणे सोपे झाल्याचे पशुपालक सांगतात.

२०१९ च्या पशुगणनेनुसार आठही जिल्ह्यांत १५ लाख २६ हजार १५१ दुभती जनावरे आहेत. पारंपरिक पद्धतीने दुभत्या जनावरांचा सांभाळ करण्यासाठी साधारणत: १० जनावरांच्या मागे एक व्यक्‍ती लागणे क्रमप्राप्त आहे. त्या जनावराला गोठ्यात बांधण्यापासून शेण काढणे, चारा, पाणी, दूध काढणे, जनावरांचे आरोग्य जपले जावे अशी व्यवस्था निर्माण करणे अशी सर्व कामे करावी लागतात.

Animal care
Animal Care : अतिथंडीचे जनावरावर काय परिणाम होतात?

ही कामे सोपस्कर करण्यासाठी मुक्‍त गोठ्याची संकल्पना पुढे आली. या पद्धतीत साधारणत: एक मजूर जोडपे ५० जनावरांचा सांभाळ सहजपणे करू शकते. त्यामुळे पशुपालकांवर जनावरांच्या सांभाळाचा येणारा बहुतांशी ताण मिटला. शिवाय जनावरांचे आरोग्यही सुदृढ राहून जनावरे तणावमुक्‍त राहत असल्याने एकूणच जडणघडणीवर चांगले परिणाम दिसून आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुंभेफळ शिवारात मुक्‍त गोठ्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. अलीकडच्या तीन चार वर्षांत जवळपास ३० ते ४० पशुपालकांनी मुक्‍त गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे. साधारण ६० ते ७० गायींचा सांभाळ मुक्त गोठा पद्धतीतून पशुपालक करताना दिसतात. जालना जिल्ह्यातही रोहनवाडी, वरुडी आदी गावांमध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्याची संख्या मोठी असलेल्या गावांमध्ये हा विस्तार चांगला झाल्याचे प्रकर्षाने दिसते.

Animal care
Animal Care : हे आहेत जनावरांतील आयोडीन कमतरतेचे परिणाम

...असे असावे नियोजन

खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. हनुमंत आगे म्हणाले, दुभत्या जनावरांचे संगोपन करताना किमान १० जनावरांसाठी २ गुंठ्यांत मुक्‍त गोठा असावा. त्यातील एक तृतीयांश जागेत निवारा तर उर्वरित जागा मुक्‍त संचारासाठी ठेवावी. गोठ्यात स्वच्छ पिण्याची पाण्याची सोय करावी. वार्षिक चारा नियोजनासाठी एका दुभत्या जनावरांसाठी ५ गुंठे एकदल व २ गुठे द्विदलवर्गीय चारा पिकांचे नियोजन करावे.

मुरघास तंत्र ठरले फायदेशीर

जनावरांना वर्षभर सकस चारा मिळण्यासाठी पशुपालक मुरघास निर्मितीस प्राधान्य देत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. गोठ्यासमोर मुरघासाचे बोद दिसून येतात. कुभेफळ - भालगाव शिवारात शेती असलेल्या सांडू मसूजी वाघ यांनी घराजवळ १५ बाय २७ फूट रुंदीचा हौद बांधून त्यात जवळपास ६० टन मुरघास साठवण्याची सोय केली आहे. त्यामुळे त्यांचा बोद घेण्याचा खर्च वाचला आहे.

मुक्त संचार गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे दुग्ध उत्पादनात सातत्य राखणे शक्य होते.
- डॉ. हनुमंत आगे, विषय विशेषज्ञ, पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना ९०२८२५४९५०
मागील १० वर्षांपासून मी मुक्‍त गोठ्यात जातिवंत गीर गायींचे संगोपन करत आहे. जनावरांच्या चारा-पाण्यासाठी यापूर्वी मजुरांची गरज जास्त होती. मात्र मुक्त गोठ्यामुळे दोन मजुरांचे जोडपेही ४० ते ४५ जनावरांसाठी पुरेसे होते आहे.
- मारोती पालोदे, राजूर, ता. भोकरदन, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com