Animal Health Care : दुधाळ जनावरांसाठी खनिज मिश्रणाचे महत्त्व

Animal Health Management : जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी एकूण २२ खनिजांची गरज असते. ज्यामध्ये ७ प्रमुख घटक आणि १५ सूक्ष्म खनिज घटक लागतात.
Animal
Animal Agrowon
Published on
Updated on

डॉ. सोमेश गायकवाड, डॉ. चंद्र दत्त

Animal Mineral Element : जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी एकूण २२ खनिजांची गरज असते. ज्यामध्ये ७ प्रमुख घटक आणि १५ सूक्ष्म खनिज घटक लागतात. प्रमुख घटकांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सल्फर, सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोराइड यांचा समावेश आहे.

कॅल्शिअम

शरीराच्या सामान्य दैनंदिन कामासाठी कॅल्शिअम १६ ग्रॅम प्रति दिवस आणि फॉस्फरस ७ ग्रॅम प्रति दिवस याप्रमाणे गरज असते. यांचे योग्य गुणोत्तर २:१ आवश्यक आहे. कॅल्शिअम दुधाचे उत्पादन वाढवते.

कमतरतेमुळे अंडाशय आणि शुक्राणूची क्रिया बाधित होते. रक्तातील कमतरतेमुळे गर्भाशयावर परिणाम होतो. दुग्ध ज्वर वाढतो, नवजात वासरामध्ये रिकेट्स दिसतात.

फॉस्फरस

सामान्य चयापचय, दूध उत्पादन, पुनरुत्पादन आणि शरीर प्रणालीच्या विकासासाठी आवश्यक आहे.

कमतरतेमुळे माज येण्यास विलंब होतो. प्रजनन, गर्भधारणा राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे खनिज आहे.

कमतरतेमुळे पाईका आजार होतो. जनावरे लाकूड, दोर किंवा पॉलिथिन खातात किंवा चाटतात.

मॅग्नेशिअम

गर्भधारणा, पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचा घटक आहे.

गर्भधारणेदरम्यान मॅग्नेशिअम आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण यांच्यात थेट संबंध दिसतो.

कमतरतेमुळे हायपोमॅग्नेसेमिक टेटॅनी आजार होतो. मासपेशी संकुचन पावतात.

आहारामध्ये फॉस्फरस आणि पोटेशिअमची अधिक मात्रा मॅग्नेशिअमचे शोषण प्रभावित करते.

Animal
Animal Health : थंडीच्या काळात दुभत्या गाई, म्हशींकडे लक्ष द्या...

सल्फर

प्रथिने, हार्मोन आणि एन्झाइम्ससाठी महत्त्वाचा घटक.

चयापचय प्रक्रियेसाठी नायट्रोजन, सल्फर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. याचे गुणोत्तर साधारणपणे १०:१ असावे. हे प्रमाण लोकरीच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असलेले अमिनो ॲसिड आणि प्रथिनांसाठी उपयुक्त आहे.

कमतरतेमुळे भूक लागत नाही. स्नायू कमकुवत होतात. पचनशक्ती आणि दूध उत्पादनात घट होते.

पोटॅशिअम

स्नायूंच्या (विशेषत: हृदय) कार्यासाठी महत्त्वाचा घटक. सामान्यतः पशुखाद्यात मुबलक प्रमाणात असते.

हिवाळ्यात अधिक प्रमाणात गरजेचे असते.

सोडिअम,क्लोराइड

कमतरतेमुळे पचनसंस्था सुरळीतपणे कार्य करत नाही. साधारणपणे १ ते २ टक्के प्रमाणात पशुखाद्य आणि धान्य मिश्रणात मिसळावे.

सामान्य रक्तदाब राखण्यासाठी आवश्यक. उन्हाळ्यात गरज जास्त प्रमाणात असते.

तांबे

लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन परिपक्वतासाठी आवश्यक.

कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. लोकरीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. माजास विलंब होतो.

तांबे आणि झिंक कमतरतेमुळे कासदाह होण्याची शक्यता वाढते.

उन्हाळ्यात तांबे आणि आयोडीनची गरज वाढते.

Animal
Animal Health Care : पावसाळ्यात गायी, म्हशी आजारी पडू नयेत म्हणून काय करावे?

आयोडीन

जनावरांची वाढ, गर्भधारणा, प्रजनन क्षमता आणि कंठ ग्रंथीसाठी महत्त्वाचे.

कमतरतेमुळे गलगंड, प्रजनन समस्यांमध्ये स्त्रीबीजांचा विलंब, वंध्यत्व आणि वजन वाढणे ही लक्षणे दिसतात. गर्भपाताची शक्यता असते.

लोह

हिमोग्लोबिन आणि मसल मायोग्लोबिन संश्‍लेषणासाठी आवश्यक घटक.

कमतरतेमुळे शरीराचे तापमान कमी राहते. अनेमिया होऊन श्‍वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे गर्भातील जिवास समस्या दिसतात.

सेलेनियम

सेलेनियम आणि जीवनसत्त्व ई शरीरात एकमेकांना पूरक म्हणून काम करतात.

प्रतिजैविकामधील महत्त्वाचा घटक.

कमतरतेमुळे प्रजनन समस्या दिसतात. वार पडत नाही. स्नायू कडक होतात. रोगप्रतिकारशक्ती घटते.

- डॉ. सोमेश गायकवाड, ८८३०६६९६५६

(डॉ. चंद्र दत्त हे कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेमध्ये पशू पोषण विभागामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. डॉ. सोमेश गायकवाड हे मास्टर स्कॉलर आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com