Animal Care : वनस्पतींमुळे जनावरांमध्ये होणारी विषबाधा

Poisonous Plants : जनावरांना विषारी वनस्पतींची होणारी विषबाधा टाळण्यासाठी स्थानिक परिसरात उगवणाऱ्या विषारी वनस्पतींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
Poisoning by Plants
Poisoning by PlantsAgrowon
Published on
Updated on

डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. प्राजक्ता देठे

Information on Poisonous Plants : तीव्र वासामुळे तसेच चवीला रुचकर नसल्यामुळे जनावरे शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत. परंतु बऱ्याचदा दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची कमतरता असल्यामुळे जनावरे या हिरव्या वनस्पतींकडे आकर्षित होऊन नाइलाजास्तव खातात.

परिणामी, अशा विषारी वनस्पती खाल्याने जनावरांना विषबाधा होते. तसेच जर जनावर जास्त वेळ उपाशी असेल तर अशा स्थितीत त्यांना चरण्यास सोडल्यानंतर ते अधाशीपणाने खातात. त्या वेळी देखील विषारी वनस्पती खाण्यात येऊन विषबाधा होण्याची शक्यता वाढते.

विषबाधा टाळण्यासाठी आपल्या परिसरात उगवणाऱ्या विविध प्रकारच्या विषारी वनस्पतींची माहिती तसेच विषबाधा कशा प्रकारे टाळता येईल याबाबत माहिती पशुपालकांना असणे आवश्यक आहे.

विषबाधा होण्यासाठी कारणीभूत वनस्पती :

कण्हेर : अ) लाल कण्हेर ब) पिवळी कण्हेर

घाणेरी

रुई किंवा रुचकी

घाणेरी

रानमोहरी

धोत्रा

बेशरम

कण्हेर

या वनस्पतीचा वापर शोभेचे झाड म्हणून केला जातो.

रस्ताच्या कडेला मोठ्या प्रमाणात आढळते.

या वनस्पतीच्या बिया अत्यंत विषारी असतात.

या वनस्पतीमध्ये ओलन्ड्रोसाइड, नेरीओसाईड हे विषारी घटक असतात.

लक्षणे :

या वनस्पतीची पाने किंवा बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जनावरांची भूक मंदावणे, पोटात वेदना होणे, हगवण लागणे, अशक्तपणा येणे, स्नायू थरथर कापणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, आकडी येणे, हृदयाचे ठोके कमी होऊन शेवटी मृत्यू होतो.

Poisoning by Plants
Animal Care : जनावरांना द्या पुरेसे स्वच्छ पाणी

रुई/रुचकी

बऱ्याच भागात चाऱ्याचा तुटवडा असल्यास ही वनस्पती गाय, शेळी, मेंढी यांना खायला दिली जाते.

या वनस्पतीचे सर्वच भाग जसे की पाने, फुले, शेंगा या विषारी असतात.

या वनस्पतीमध्ये कॅलोट्रोक्झीन, कॅलॅक्टिन हे विषारी घटक असतात.

लक्षणे :

रुईच्या दुधासारख्या दिसणाऱ्या चिकामुळे त्वचेची जळजळ होते. चीक डोळ्यात गेल्यास डोळे लाल होऊन पाणी येते.

रुईची पाने जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास लाळ गळणे, घसा जळजळणे, पचनास त्रास होणे, वेदना व जुलाब होऊन गॅस्ट्रोएन्टेरिटीस होणे ही लक्षणे दिसतात.

या वनस्पतीमधील विषारी घटकांचा विशेषतः हृदयावर विपरीत परिणाम होतो. हृदयाचे ठोके अनियमित होतात. आणि शेवटी हृदयक्रिया बंद पडून जनावराचा मृत्यू होतो.

बेशरम

या वनस्पतीमध्ये लायसेर्जिक आम्ल अल्कलॉइड व सॅपोनिन हे विषारी घटक असतात. तसेच ही वनस्पती ‘नायट्रेट’ हा घटक मोठ्या प्रमाणात मातीमधून शोषून तो साठवून ठेवते. या घटकामुळे देखील विषबाधा होऊ शकते.

ही वनस्पती खाल्यामुळे शेळ्यांमध्ये विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच मेंढी व वासरांमध्ये देखील विषबाधा होते.

लाळ गळणे, जुलाब होणे, डोळ्यांची बुब्बुळे मोठी होणे, जनावर थरथर कापणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे व मृत्यू होणे ही लक्षणे दिसतात.

घाणेरी

ही विषारी वनस्पती सर्वत्र आढळते.

या वनस्पतीमधील विषारी घटकांमुळे मुख्यतः यकृताची हानी होते.

लक्षणे :

भूक मंदावणे, वजन घटणे, कावीळ होणे ही लक्षणे दिसून येतात.

जनावराची त्वचा सूर्यप्रकाशाला संवेदनशील होते. यामध्ये शक्यतो डोळे व कान या भोवतीची त्वचा, नाक, कासेवरील त्वचा जास्त बाधित होते. त्वचा लाल होणे, खाज सुटणे त्याजागी सूज येणे, जनावर अस्वस्थ होणे ही लक्षणे दिसतात.

Poisoning by Plants
Plant Story : गाव शिवारातील वनस्पती आता दुर्मिळ का होऊ लागली?

रानमोहरी

या वनस्पतीमध्ये ग्लुकोसिनोलेट्स व त्याचे उपघटक जसे की आयसोथियोसायनेट, थियोसायनेट, गॉयट्रिन हे विषारी घटक असतात.

यामध्ये पोटदुखी, आतड्याचा दाह होणे, शरीरात रक्ताची कमतरता, रवंथ न करणे, जनावराची वाढ खुंटणे ही लक्षणे दिसतात.

प्रथमोपचार

सर्वप्रथम पशुवैद्यकास संपर्क करून विषबाधा झालेल्या जनावरावर त्वरित उपचार करावेत.

जनावराने कोणती वनस्पती खाल्ली आहे याचा अंदाज असेल तर लगेच त्या नमुन्याची तपासणी पशुवैद्यकाद्वारे करून घ्यावी.

जनावरास श्‍वसनाचा त्रास होत असेल तर त्याला हवेशीर जागेत ठेवावे.

त्वचा प्रकाशास संवेदनशील झाली असेल तर अशा जनावरास सावलीमध्ये बांधावे.

जनावरास अ‍ॅक्टिवेटेड चारकोल तोंडावाटे द्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटकांचे शोषण कमी होईल.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

विषारी वनस्पती असलेल्या ठिकाणी जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.

चारा कापताना किंवा कुट्टी करून देताना त्यात विषारी वनस्पती येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

गोठ्यात नियमित फिरून पाहणी करावी. त्यामुळे जनावराच्या वागणुकीत झालेला बदल, विषबाधेशी निगडीत लक्षणे लगेच लक्षात येतात.

डॉ. बाबासाहेब घुमरे, ७७०९५११७४१, डॉ. प्राजक्ता देठे, ७७७६९४१४७९

(पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com