Animal Care: जनावरांमधील कीडनाशकाची विषबाधा

Animal Health: कीडनाशकांच्या अयोग्य वापरामुळे जनावरांना विषबाधा होऊ शकते, जी सामान्यतः कमीत कमी तीव्र पण दीर्घकालीन प्रभावी ठरते. या विषबाधेची लक्षणे आणि उपचारांविषयी डॉ. सुनील देशपांडे यांचा सल्ला महत्त्वपूर्ण आहे.
Animal
AnimalAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रशांत धर्माधिकारी, डॉ. सुनील देशपांडे

Animal Pesticide Poisoning Management: जनावराने चुकून कीडनाशक चाटल्याने किंवा नुकतीच कीडनाशकाची फवारणी केलेला चारा जनावरांच्या आहारात आल्यास विषबाधा होऊ शकते. सामान्यतः दुधाळ जनावरे आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये रसायनाची होणारी विषबाधा सामान्यतः कमी तीव्र परंतु दीर्घकालीन सेवनामुळे विषारी असल्याचे मानले जाते.

जनावरांमध्ये अपघाती संपर्क आणि सेवन टाळण्यासाठी कीडनाशकांची योग्य साठवणूक, हाताळणी, चारा पिकावर शिफारशीनुसार वापर करणे तसेच कीडनाशकाची फवारणी केलेला चारा लगेच खाऊ न घालणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. चारा पिके किंवा अन्य कुठल्याही पिकांवर कीडनाशके वापरताना त्याचा कमीत कमी मर्यादेमध्ये वापर करणे आवश्यक आहे. म्हणजे त्याचे कमीत कमी अंश चारा पिकांमध्ये उतरतील.

Animal
Animal Vaccination: पावसाळ्याआधी जनावरांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या लसी

विषबाधेची लक्षणे

जनावर शांत होते, त्याला सुस्ती येणे, स्नायूंचा पक्षाघात होणे, श्वसन प्रक्रियेत बिघाड होणे

भूक कमी होते, तोंडातून लाळ गळते आणि डोळे लालसर होतात.

Animal
Animal Care: शेळ्यांवरील उष्णतेचा ताण आणि उपाययोजना

उपचार

कीडनाशकांच्या विषबाधेवर तातडीने उपचार करण्यासाठी श्वसन प्रक्रियेस नियमित करणारी औषधे देता येतात.

जनावरांचा आजार किंवा त्रासाच्या कोणत्याही लक्षणांसाठी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.

विषबाधेची लक्षणे आढळल्यास, सेवनाची व्याप्ती निश्चित करण्यासाठी आणि योग्य उपचार देण्यासाठी त्वरित पशुवैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. सुनील देशपांडे ९४२३८६५४५८

(पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी १) कुडाळ, ता. जावली जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com