Poultry Diseases : कोंबड्यांतील पटकी आजार : लक्षणे, कारणे, उपचार

Poultry Fowl Cholera Disease : काहीवेळा कोणतीही लक्षणे न दाखवता कोंबड्यामध्ये अचानक मरतूक होते. तर खूप कमी कोंबड्यांमध्ये हिरवट अतीसार, विस्कटलेले पंख, जलद श्वसन अशी लक्षणे दिसतात. अशावेळी कोंबड्यांना फाउल कॉलरा म्हणजेच पटकी हा संसर्गजन्य रोग झाला असण्याची शक्यता असते.
Poultry Diseases
Poultry DiseasesAgrowon
Published on
Updated on

Poultry Farming : काहीवेळा कोणतीही लक्षणे न दाखवता कोंबड्यामध्ये अचानक मरतूक होते. तर खूप कमी कोंबड्यांमध्ये हिरवट अतीसार, विस्कटलेले पंख, जलद श्वसन अशी लक्षणे दिसतात. अशावेळी कोंबड्यांना फाउल कॉलरा म्हणजेच पटकी हा संसर्गजन्य रोग झाला असण्याची शक्यता असते. या रोगामुळे कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मरतूक होते. काही वेळा रोगाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.

पटकी हा रोग कोंबड्यांमध्ये जिवाणूद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. जिवाणूचा संसर्ग झाल्यानंतर बाधित कोंबडीमध्ये रक्तदोष म्हणजेच सेप्टीसेमिया होऊन कोंबड्या मरतात. ब्रॉयलर आणि लेअर अशा दोन्ही कोंबड्यांना फाउल कॉलरा रोग होतो. कमी वयाच्या कोंबड्यांपेक्षा जास्त वयाच्या कोंबड्यांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त असते.

Poultry Diseases
Poultry Disease : कोंबड्यांतील जीवाणूजन्य रोग : लक्षणे, कारणे, उपाय

आजाराची कारणे आणि प्रसार

आपल्या भागात फाउल कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव थंड आणि दमट वातावरणात होते. उन्हाळ्याच्या शेवटी, पावसाळा आणि हिवाळ्यात हा आजार दिसतो. फाउल कॉलरा बाधित कोंबड्यांची लाळ, शेंबूड, आणि अश्रू पासून हा रोग एका कोंबडीपासून इतर कोंबड्यांमध्ये लगेच पसरतो. याशिवाय उंदीर, घुशी, वराह, श्वान आणि मांजरांपासून या रोगाचा प्रसार होतो. या रोगाचे जिवाणू शेडमधील भिंती आणि जमिनीवर असलेल्या भेगा, खाद्य, पिशव्या, चप्पल, आणि इतर वापराच्या उपकरणांमध्ये जास्त काळ तग धरून राहतात. आजाराचा प्रसार सहसा अंड्यातून होत नाही.

आजाराची लक्षणे

फाउल कॉलरा या रोगाच्या जिवाणूचा संसर्ग झाल्यानंतर पाच ते आठ दिवसात काही कोंबड्यांमध्ये लक्षणे दिसतात. तिव्र प्रकारात बाधित कोंबडी कोणतीही लक्षणे न दाखविता सहा ते बारा तासांत दगावते. आणि कोंबड्यांतील मरतुकीचे प्रमाण वाढत जाते. फार कमी कोंबड्या आजाराची लक्षणे दाखवितात. यामध्ये सुरवातीला हिरवट रंगाचा अतिसार दिसून येतो. नैराश्य, विस्कटलेले पंख, फुफ्फुस दाह, आणि जलद श्वसन यासारखी ही लक्षणे दिसतात. तर सौम्य प्रकारात कोंबडीच्या शरीरावर सूज येते. डोळ्यांच्या त्वचेचा आणि कंठाचा दाह होतो. डोळ्यांतून अश्रू गळतात. डोळे, तुरे आणि कल्ले सुजतात. ते निळसर काळे पडतात आणि बाधित कोंबड्या लंगडतात.

आता पाहुयात या रोगावर उपचार काय आहेत

शेड स्वच्छ आणि हवेशीर ठेवावे. शेड आणि परिसरात पक्षी, उंदीर, घुशी, वराह, श्वान आणि मांजरांना येऊ देऊ नये. कोंबड्या शेडमध्ये ठेवण्यापूर्वी शेडचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. खाद्य,पाण्याची भांडी आणि इतर साहित्य दररोज स्वच्छ करुन उन्हात वाळवून घ्यावे. शेडमध्ये खाद्य आणि पाण्याची साठवणूक करू नये. कोंबड्यांनादूषित खाद्य आणि पाणी देऊ नये. सगळ्यात महत्वाच म्हणजे वयाच्या १० ते १२ आणि २१ व्या आठवड्यांत कोंबड्यांचे लसीकरण करावे. शेडमध्ये कोंबड्यांची गर्दी होणार नाही यांची काळजी घ्यावी.

आजारी कोंबड्यांना लगेच वेगळे करावे. पशुवैद्यकाच्या सल्याने योग्य मात्रेत प्रतिजैविके द्यावी. प्रतीजैविकांचा कालावधी पूर्ण करावा.मध्येच प्रतिजैविके देणे थांबविल्यास आजाराचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. मृत कोंबड्यांना खोल पुरून टाकावे. उघड्यावर टाकू नये. अशा प्राकरे उपचार केले आणि काळजी घेतली जर फाउल कॉलरा या रोगावर नियंत्रण मिळवता येत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com