Lumpy Skin : नगर जिल्ह्यात वाढतोय ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

Lumpy Skin Vaccination : पुन्हा एकदा जनावरांना वेगाने ‘लम्पी स्कीन’ची बाधा होत आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून, पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांना वेगाने ‘लम्पी स्कीन’ची बाधा होत आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून, पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू आहे. नगर जिल्ह्यात जुलैपासून पावणेनऊशे जनावरांना बाधित झाली.

त्यातील २४१ जनावरे या आजारातून बरी झाली असून, उर्वरित ६५० जनावरे सध्या बाधित आहेत. मार्चपासून आतापर्यंत ४० जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

नगर जिल्ह्यात गायवर्गाची १४ लाख, तर म्हैसवर्गाची दोन ते अडीच लाख जनावरे आहे. त्यात दुभत्या जनावरांची संख्या ही त्यात मोठी आहे. गेल्या वर्षी लम्पी स्कीनची बाधा झाली होती. यंदा १ जुलैपासून पुन्हा बाधित जनावरे सापडू लागले आहेत.

पशुसंवर्धन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यात १ जुलैपासून लसीकरण सुरू झाले आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे परभणीत आतापर्यंत ५३७ जनावरे मृत

मे महिन्यात लम्पीची बाधा असलेली ४ ते ५ जनावरे आढळायची. जुलैपासून त्यात वाढ होत आहे. मार्चपासून आतापर्यंत ५४ गावांत ८८६ जनावरांना लम्पीची बाधा झाली. त्यात २४१ जनावरे पूर्णपणे बरी झाली. त्यात ८२ गाई आणि ५९ जनावरे आहेत.

आजमितीला राहुरी तालुक्यात सर्वाधिक १८५ बाधित जनावरे आहेत, त्या पाठोपाठ शेवगाव तालुक्यात १७८, पाथर्डीला ४६, नेवाशाला ५९, कोपरगावला ७७, श्रीगोंदा तालुक्यात २०, तर श्रीरामपूर तालुक्यात २२, राहात्याला १०, पारनेरला १०, नगरला ६, कर्जतला ८ जनावरे बाधित आहेत. नगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन वर्षांत ५७ हजार ५७७ जनावरांना बाधा झालेली असून, ४४२६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी ४० जनावरे लम्पीने दगावली आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ने चार महिन्यांत दोन हजार पशुधनांचा मृत्यू

चारा, जनावरे वाहतूक सुरू

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी लम्पी स्कीनची मोठा फटका शेतकरी, पशुपालकांना बसला होता. लम्पी स्कीनची बाधा सुरू झाल्यानंतर लसीकरण, पाच किलोमीटर परिघातील जनावरांचे विलगीकरण व अन्य बाबीच्या उपाययोजना केल्या. यंदाही जुलैपासून लम्पी स्कीनची बाधा वाढत आहे.

यंदा मात्र लम्पी स्कीन आजाराबाबत फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. लम्पीची पुन्हा साथ आल्याने गतवर्षी मोठा फटका सहन करणाऱ्या पशुपालकांत मात्र या आजाराने धास्ती निर्माण झाली आहे.

सव्वातेरा लाख लसीकरण

लम्पी स्कीनची बाधा सुरू झाल्याने १ जुलैपासून पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत ११ लाख ४३ हजार १२७ गाई, ७२ हजार ६८५ बैल व १ लाख ८ हजार ४५७ वासरे अशी १३ लाख २४ हजार २७९ जनावरांना लसीकरण केले आहे. लम्पीची बाधा कमी व्हावी यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या वर्षी ज्या भागात लम्पीचे बाधित जनावरे सापडत होती, त्या गावांत यंदा बाधित जनावरे आढळून येत नाहीत.

लसीकरण केल्यानंतर तसेच पाऊस पडून गेल्यावर लम्पीची बाधा झालेली जनावरे वाढतात. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून मोफत उपचार, जनावरे क्वारंटाइन करणे, लसीकरण आदी उपचार सुरू आहेत. गतवर्षी पेक्षा यंदा बाधित जनावरांची संख्या कमी आहे.
- डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com