Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे परभणीत आतापर्यंत ५३७ जनावरे मृत

Lumpy Skin Disease : मागील वर्षभरापासून लम्पी स्कीन आजाराची साथ सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ४) जिल्ह्यातील ४ हजार ७१२ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून लम्पी स्कीन आजाराची साथ सुरू आहे. शुक्रवारपर्यंत (ता. ४) जिल्ह्यातील ४ हजार ७१२ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला. उपचारानंतर ३ हजार ८८१ जनावरे बरी झाली आहेत.

परंतु गंभीर असलेली ५३७ जनावरे दगावली आहेत. जनावरे दगावलेल्या ४१७ पशुपालकांना ७२ लाख ४१ हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात गायी, बैल, म्हैस मिळून एकूण ३ लाख ९८ हजार ३५६ पशुधन होते. आजवर जिल्ह्यातील ८४९ पैकी १४४ गावांतील जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. लम्पी बाधित जनावरांची एकूण संख्या ३ हजार ७१२ झाली आहे. सध्या जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचे २९४ पशुरुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ३० पशुरुग्ण गंभीर आहेत.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : सोलापूर जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ बाधित ४६७ जनावरे

बाधित गावांच्या ५ किलोमीटर परिघातील ६२६ गावांतील पशुधनाची संख्या २ लाख ८० हजार ३९७ आहे. आजाराच्या प्रतिबंधासाठी २ लाख ८३ हजार ५५१ जनावरांचे लसीकरण करावयाचे आहे. त्यासाठी २ लाख ९९ हजार ३०० लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. लसीकरण करावयाच्या गोवर्गीय जनावरांची संख्या २ लाख ९९ हजार ८६१ आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावामुळे २ जनावरांचा मृत्यू

आजवर २ लाख ६५ हजार २५० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लम्पी स्कीन आजारामुळे जिल्ह्यातील ६४ गायी, १४८ बैल, ३२५ वासरे असे एकूण ५३७ जनावरे दगावली आहेत. त्यापैकी ५४ गायी, ११६ बैल, २५७ वासरांच्या पशुपालकांना ७२ लाख ४१ हजार रुपये अनुदान अदा करण्यात आले.

तर २ लाख १४ हजार ४०७ रुपये एवढ्या अनुदानाचे वाटप शिल्लक आहे, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले. लम्पी स्कीन प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुधनाचे परत लसीकरण केले जात असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com