
सातारा : पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shubhuraj Desai) यांच्या हस्ते लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे,
आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि पशुपालक उपस्थित होते.
जिल्ह्यात एकूण ३,४०,८६३ म्हणजेच ९६ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी या वेळी दिली. सातारा जिल्ह्यात एकूण १० तालुक्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.
शुक्रवारी (ता.३०) अखेर १,४७२ गाय व १८० बैल असे एकूण १,६५२ जनावरांस लम्पी स्कीन रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच, आतापर्यंत एकूण ११९ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या सर्व जनावरांच्या मालकास शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे. एकूण ३३५ जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.