Pune News : दिल्लीच्या सिमेवर शेतकरी हमीभाव कायद्याच्या अंमलबजावणीसह इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. यादरम्यान शेतकऱ्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी ऊसाच्या एफआरपीवर ३४० रूपये वाढ करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. त्यापाठोपाठ त्यांनी दोन निर्णय घेतल्याचेही सांगितले आहे. ठाकूर यांनी, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उंट, घोडा, गाढव, खेचर यासारखे प्राण्यांची संख्या कमी होत असून त्यावर काम केले जाणार असल्याचे म्हटले आहे.
याबाबत मंत्री ठाकूर म्हणाले, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत एक उप योजना सुरू केली जाणार आहे. जी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाशी निगडीत आहे. सध्या उंट, घोडा गाढव, खेचरांची संख्या कमी होत आहे. यामध्ये मोठा बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियान राबविण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
काय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान?
केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय पशुधन अभियानातील सुधारणांना मंजुरी दिल्याचे मंत्री ठाकूर म्हणाले. घोडा, गाढव, खेचर आणि उंटासाठी उद्योजकतेसाठी व्यक्ती आणि एफपीओ, एसएचजी, जेएलजी, एफसीओ आणि ८ कंपन्यांची निवड करण्यात येणार आहेत.
या ८ कंपन्यांना ५० लाख रुपयांपर्यंतचे ५०% भांडवली अनुदान दिले जाईल. याशिवाय घोडे, गाढव आणि उंट यांच्या जाती संवर्धनासाठीही राज्य सरकारला मदत केली जाणार आहे. केंद्र सरकार १० कोटी रुपये देणार असल्याची माहिती मंत्री ठाकूर यांनी दिली आहे. यामधून घोडे, गाढवे आणि उंटांसाठी वीर्य केंद्रे आणि न्यूक्लियस प्रजनन फार्म उभारण्यात येणार असल्याचेही ठाकूर म्हणाले.
दरम्यान, केंद्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस खरेदीच्या दरात वाढ करण्याबाबत मोठा निर्णय झाल्याचे ते म्हणाले. ऊस खरेदीच्या दरात आठ टक्के वाढ करण्यात आली असून ती ३४०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आल्याचे ते म्हणालेत.
'महिला सुरक्षे'वरील पावले
केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत एकूण ११७९.७२ कोटी रुपयांच्या 'महिला सुरक्षितते'वरील छत्री योजनेची अंमलबजावणी प्रस्तावाला गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याचीही माहिती मंत्री ठाकूर यांनी दिली. तसेच एकूण ११७९.७२ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चापैकी एकूण ८८५.४९ कोटी रूपये गृह मंत्रालयाच्या फंडातून आणि २९४.२३ कोटी रूपये निर्भया फंडातून दिले जातील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.