Gopalratn Award : रविशंकर सहस्रबुद्धे यांना राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर

जातिवंत गीर गोवंश संवर्धन, शास्त्रशुद्ध पैदास, वंश सुधार आणि शाश्‍वत देशी गोपालनातील कार्य लक्षात घेऊन रावेत (पुणे) येथील प्रयोगशील गीर पैदासकार रविशंकर सहस्रबुद्धे यांना यंदाचा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
Gopalratn Award : रविशंकर सहस्रबुद्धे यांना राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर
Published on
Updated on

पुणे : जातिवंत गीर गोवंश (Gir Cow Breed) संवर्धन, शास्त्रशुद्ध पैदास, वंश सुधार आणि शाश्‍वत देशी गोपालनातील (Cow Rearing) कार्य लक्षात घेऊन रावेत (पुणे) येथील प्रयोगशील गीर पैदासकार रविशंकर सहस्रबुद्धे (Ravishankar Sahstrbudhhe) यांना यंदाचा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार (Gopalratn Award) जाहीर झाला आहे.

Gopalratn Award : रविशंकर सहस्रबुद्धे यांना राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर
Animal Care : जनावरांसाठी खनिजे का आहेत आवश्यक?

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालयातर्फे बुधवारी (ता. २३) या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशी गोवंश सुधार, संवर्धन या विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार रविशंकर सहस्रबुद्धे यांना जाहीर झाला आहे. या बाबत ते म्हणाले, की मी गेल्या दहा वर्षांपासून गीर गोवंश संवर्धन, जातिवंत पैदास, वंश सुधार करत आहे.

Gopalratn Award : रविशंकर सहस्रबुद्धे यांना राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर
Animal Care : प्रतिजैविकाबाबत जागरूक रहा

यातून माझ्याकडे दररोज सरासरी १४ ते १५ लिटर दूध देणाऱ्या जातिवंत गीर गाई तयार झाल्या आहेत. तसेच पैदाशीसाठी वळूदेखील तयार झाले आहेत. त्यांच्या सर्व वंशावळ नोंदी माझ्याकडे आहेत. पारंपरिक रेतन पद्धतीच्या बरोबरीने मी कृत्रिम रेतन, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालयातर्फे तीन विभागांमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत.

याचबरोबरीने उत्कृष्ट कृत्रिम रेतन तज्ज्ञ आणि सहकारी दुग्ध संस्था विभागातही पुरस्कार जाहीर झाले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त बंगळूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह आणि पुरस्कार रकमेसह राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

देशी गोवंश विभागातील पुरस्कार

१) प्रथम क्रमांक- जितेंद्र सिंग, फतेनाबाद, हरियाना (साहिवाल गोवंश संवर्धन) - पाच लाख रुपये

२) द्वितीय क्रमांक - रविशंकर सहस्रबुद्धे, पुणे (गीर गोवंश संवर्धन)- तीन लाख रुपये

३) तृतीय क्रमांक - श्रीमती सोनलबेन गोयल, कच्छ, गुजरात (गीर, कांकरेंज गोवंश संवर्धन)- दोन लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com