Team Agrowon
कॅल्शिअम हे दुग्धोत्पादन, हाडे व दातांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणासाठी आवश्यक असते.
कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रसूती सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो.
फॉस्फरस दुग्धोत्पादन, चयापचय आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते.
फॉस्फरसच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन चक्र अनियमित होते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.
मॅग्नेशियममुळे हाडे व दात मजबूत होतात.
मॅग्नेशियम प्रथिनांचे उत्पादन तसेच कर्बोदकावरील क्रियेसाठी आवश्यक आहे.
सल्फर प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकावरील क्रियेसाठी उपयुक्त आहे.