Bird Flu : नांदेडमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लू आजाराची लागण

Poultry Disease : लोहा तालुक्यातील किवळा येथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लू आजार झाल्याचे निदान झाल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलले आहेत.
Poultry Farming
Use of medicinal plant in poultry feedAgrowon
Published on
Updated on

Nanded News : लोहा तालुक्यातील किवळा येथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लू आजार झाल्याचे निदान झाल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलले आहेत. या आजाराचा प्रसार होऊ नये या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रविणकुमार घूले यांनी दिली.

किवळा येथील कोंबड्या ता. २० जानेवारी रोजी मृत्युमुखी पडल्याचे दिसून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्ष्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

हे रोग नमुने बर्ड फ्लू रोगाकरिता होकारार्थी आलेले असल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या आजाराचा प्रसार होऊ नये या करिता किवळा परिसरातील १० किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्कभाग म्हणून घोषित केला आहे. या परिसरात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने आदेशित केलेले आहे. प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणची खासगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्याबाबत आदेशित केले आहे.

Poultry Farming
Bird Flu News : रायगडनंतर आता नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग; अफवा आणि गैरसमज पसरू नका, प्रशासनाच्या सूचना

प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षिखाद्य, आनुषंगिक साहित्य व उपकरणे आदीच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर दोन टक्के सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रभावित क्षेत्राच्या पाच किलोमीटर त्रिज्येतील परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने व कुक्कुट मांसाची (चिकन) दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा प्रदर्शन आदी बाबी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा व गैरसमज पसरविण्यात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Poultry Farming
Bird Flu : योग्य काळजी घ्या, चिंता करू नका

‘पक्ष्यांमध्ये मरतुक आढळल्यास संपर्क करा’

जिल्ह्यात कोठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा १९६२ या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रवीणकुमार घुले यांनी केले आहे.

किवळा येथे बर्ड फ्लू बाधित ४५६ कोंबड्या केल्या नष्ट

लोहा तालुक्यातील किवळा येथील कुक्कुट पक्षांमधील नमुने बर्ड फ्लू या रोगासाठी होकारार्थी दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तत्काळ या परिसरामध्ये प्रतिबंधक आदेश जारी केले आहेत. त्याप्रमाणे पशुसंवर्धन विभागामार्फत एकूण १९ पशुपालकांचे ३८२ मोठे व ७४ लहान असे एकूण ४५६ कुक्कुटपक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या आहेत.

रोग आढळून आलेल्या किवळा (ता. लोहा) या ठिकाणापासून एक किलोमीटरचे क्षेत्र बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटरचे क्षेत्र हे दक्षता क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. जिल्हा प्रशासनाने बाधित क्षेत्रामधील सर्व पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त राजेंद्रकुमार पडिले यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com