Nagpur News : ‘‘जनावरांविषयी माहिती कळावी, याकरिता त्यांना टॅगिंग करण्यात आले आहे. मात्र हा टॅग हरवला तर माहितीबाबत अडचण होते. ही बाब लक्षात घेता पशुपालकांना मसल प्रिंटचा (जनावरांच्या चेहऱ्यासमोरील भाग स्कॅन करणे) पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यात ३० हजार गायींमध्ये प्रायोगिकस्तरावर हा उपक्रम राबविण्यात येईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.
‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञानासह ७५१ कोटी रुपयांतून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाद्वारे इतरही अनेक उपक्रम प्रस्तावित करण्यात आले असल्याचेही डॉ. राजू यांनी सांगितले. डॉ. राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने २००४ पासून आजवर केवळ ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र आता पशुपालन क्षेत्रात सुधारणांसाठी ‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’द्वारे ५७१.२१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्राकडे दाखल केले आहेत.
त्यामध्ये ‘मसल प्रिंट’ या तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे. माणसांसाठी ज्याप्रमाणे आधार कार्ड आहे, त्याच धर्तीवर टॅगिंगद्वारे जनावरासंबंधीची सर्व माहिती देण्यात येणार आहे. जनावरांच्या कानांजवळ हे टॅग लावले जातात. नॅशनल डिजिटल डेटा प्लॅटफॉर्मवर त्या आधारे माहिती देण्यात आली आहे. परंतु जनावराचा कानातील टॅग हरविल्यास पुढे काय, हा प्रश्न निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘मसल प्रिंट’चा उपयुक्त ठरणार आहे.
...असा होणार ‘मसल प्रिंट’चा वापर
‘‘जनावराच्या नाका लगतच्या काळ्या भागाचा वापर या तंत्रज्ञानासाठी केला जातो. त्या ठिकाणी माहिती नोंदविली जाते. विशिष्ट स्कॅनरचा वापर करून ही माहिती उपलब्ध करून घेता येते. ईव्हर्स कंपनीशी केंद्र सरकारने यासाठी करार केला आहे.
त्याच कंपनीसमवेत राज्य सरकार काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात ३० हजार जनावरांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल. त्यानंतर त्याची उपयोग लक्षात घेत राज्यातील सर्वच जनावरांसाठी हे तंत्रज्ञान वापरता येईल का, याबाबत विचार केला जाईल,’’ असेही डॉ. राजू म्हणाले.
पशुधन मंडळाचे नियोजित इतर उपक्रम
- प्रक्षेत्र बळकटीकरण
- नवीन प्रक्षेत्र तयार करणे साकुड (बीड)
- देवणी, गौळाऊ गाय, पंढरपुरी, नागपुरी म्हशींचे संवर्धन
- शेतकरी सहल
- वांझ जनावरांसाठी विशेष कार्यक्रम
- कृत्रिम रेतन प्रशिक्षणासाठी निवासी संस्था उभारणी
- शेतकऱ्यांना उद्योजक बनविणे
- प्रक्षेत्रावर चारा डेपो उभारणी
- चारा लागवडीद्वारे पडीक जमिनीचा विकास
- फार्मचे आधुनिकीकरण, शेतकरी प्रशिक्षणाची सोय
- गायींना कॉलर्स लावले जाणार. त्याआधारे त्या माजावर आहेत किंवा नाही हे कळेल. शारीरिक हालचाली कळतील
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.