Animal Identification : जनावरांच्या ओळखीसाठी मायक्रो चिप

Micro Chip : मायक्रो चिप ही जनावरे ओळखण्याची नवीन पद्धत आहे. कान किंवा शेपटीत मायक्रोचीप बसवतात. यामुळे मालकी किंवा जनावरे कोणत्या ठिकाणची आहेत याची कायमस्वरूपी ओळख होऊ शकते.
Animal Identification
Animal IdentificationAgrown

डॉ. प्रेरणा घोरपडे

Micro Chip in Animal : मायक्रो चिप ही जनावरे ओळखण्याची नवीन पद्धत आहे. कान किंवा शेपटीत मायक्रोचीप बसवतात. यामुळे मालकी किंवा जनावरे कोणत्या ठिकाणची आहेत याची कायमस्वरूपी ओळख होऊ शकते.

पशुतज्ज्ञ या पद्धतीची शिफारस करतात, कारण जेव्हा मायक्रो चिप बसविताना जनावरांना वेदना होत नाही. मायक्रो चिप बसविल्यानंतर ती योग्यरीत्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी स्कॅन करणे आवश्यक आहे. काही पशुधन प्रदर्शनात मायक्रो चिप आवश्यक असते.

Animal Identification
Animal Tagging : जनावरांना ओळखण्यासाठी टॅगिंग, ब्रॅंंडिंग

प्रक्रिया

हायपोडर्मिक सुई वापरून जनावराच्या त्वचेखाली मायक्रो चिप बसवली जाते.

फायदे

मायक्रो चिप्स कायमस्वरूपी असतात. जनावरांना वेदना होत नाही.

तोटे

मायक्रो चिप जनावरांचा मांसामध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता असते.

मायक्रो चिप बसविण्यासाठी विशेष उपकरणाची आवश्यक असते.

Animal Identification
Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

ओळख चिन्हाचे फायदे

प्रत्येक जनावराची वैयक्तिक ओळख असेल तर पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होते.

अचूक नोंदी उत्पादकाला वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाचा व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होते.

एखाद्या विशिष्ट जनावराची मालकी दर्शविण्यासाठी किंवा मूळचा कळप सूचित करण्यासाठी जनावराची ओळख महत्त्वाची आहे. पशुपालक जनावरांचा नोंदी सहज ठेवू शकतात. मागील नोंदींच्या उपलब्धतेसह जनावरांवर उपचार करण्यात मदत होते.

येणाऱ्या प्रजनन हंगामापूर्वी सहजपणे बदली स्टॉक निवडता येतो.

जनावरांचे वर्तन आणि हालचालींचा मागोवा घेता येतो. जनावरांवर मालकी प्रस्थापित करता येते. विमा दाव्यांसाठी जनावरांची ओळख चिन्हांकित करणे महत्त्वाचे आहे.

डॉ. प्रेरणा घोरपडे, ९८३३३०४७२९ (सहायक प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com