Animal Care : जनावरांतील सांसर्गिक श्वसनलिका दाह

Animal Disease : सांसर्गिक श्वसनलिका दाह हा जनावरांच्यामध्ये होणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. कमी वय असलेली जनावरे जास्त बळी पडतात.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. प्रशांत पवार

सांसर्गिक श्वसनलिका दाह हा जनावरांच्यामध्ये होणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. कमी वय असलेली जनावरे जास्त बळी पडतात. हरपिजविरीडी कुळातील बोव्हाईन हरपिज व्हायरस टाइप-१ या विषाणूमुळे हा आजार होतो.

प्रसार:

१) आजारातून बऱ्या झालेल्या जनावरांमध्ये हा विषाणू सीआयडी आणि ट्रायजेमिनल गॅंगलियामध्ये अव्यक्त राहतो आणि पोषक वातावरण मिळाल्यानंतर वेळोवेळी व्यक्त होऊन स्त्रावाद्वारे शरीरातून बाहेर पडतो.

२) बाधित जनावरांच्या शरीरातून अनुनासिक स्त्राव, खोकला, जननेंद्रियातील व गर्भाशयातील स्त्राव, वीर्य इत्यादी द्वारे विषाणू बाहेर फेकला जातो. दूषित हवेद्वारे आजाराचा प्रसार होतो. गोठविलेल्या वीर्यामध्ये या रोगाचे विषाणू जवळपास एक वर्षभरापर्यंत जिवंत राहू शकतात.

Animal Care
Animal Disease : जनावरांमधील जिवाणूजन्य आजार : लिस्टेरिओसिस

लक्षणे:

१. श्वसन संस्था:

- ताप येतो.डोळ्यांचा दाह.

-नाकातून जास्तीचा स्त्राव बाहेर पडतो तसेच स्त्रावामुळे नाकपुड्या बंद होतात व श्वसनाचा त्रास होतो

-जनावरे तोंडाद्वारे श्वास घेऊ लागतात

-श्लेषमल स्त्रावामुळे श्वासनलिका अरुंद होते. ब्रोंकोनीमोनियामुळे मृत्यू सुद्धा उद्भवू शकतो.

२. लहान वासरेः

- विषाणूमुळे होणाऱ्या सांसर्गिक श्वसनलिका दाह या आजाराचा संसर्ग अगदी लहान वासरामध्ये सुद्धा सामान्य आहे.

-श्वसन संस्थेच्या सहभागाची कोणतीही लक्षणे नसलेली स्थिती तीव्र आणि सामान्यतः घातक ठरू शकते.

३.जननेंद्रिये ः

- हा आजार पश्च्युलार वोल्वो वजायनायटिस, क्वायटल एक्झांथेमा, वेसिक्युलर वेनेरियल डिसीज, वेसिकलर वजायनाइटिस इत्यादी नावाने सुद्धा ओळखला जातो.

- प्रामुख्याने म्हशींच्या व गायींच्या जननेंद्रियावर फोड येऊन जखमा होतात. रेड्याच्या किंवा बैलाच्या जननेंद्रियावर देखील जखमा होतात.

-जननेंद्रियाची श्लेष्मल त्वचा लाल गडद होते. त्यावर फोड येतात.

-संक्रमित रेड्याच्या/बैलाच्या वीर्यामधून विषाणू बाहेर पडत असले कारणाने अशा रेड्यांनी म्हैस भरवल्यास एक ते तीन दिवसांमध्ये म्हशीमध्ये आजाराची लक्षणे दिसण्यास सुरवात होते.

Animal Care
Animal Disease : जनावरांमध्ये दिसतोय घटसर्प प्रादुर्भाव

४.गर्भपात ः

- सामान्यतः सांसर्गिक श्वसनलिका दाह आजारामध्ये श्वसनलिकेच्या संदर्भातील लक्षणे दाखविल्यानंतर गोठ्यामधील किंवा कळपातील ६० टक्के पर्यंत गाभण म्हशींमध्ये गर्भपात होऊ शकतो.

- गर्भपात हा गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो. परंतु सर्वात जास्त वेळा तो तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ७ ते १० महिन्यात होण्याचा धोका असतो .

- संक्रमित रेड्याच्या/बैलाच्या वीर्यामधून विषाणू बाहेर पडत असले कारणाने अशा संक्रमित रेड्यापासून म्हैस भरवू नये.

प्रतिबंध उपाय ः

- गोठ्यात नवीन जनावरे खरेदी करताना आयबीआर साठी चाचणी करावी.

- ज्या जनावरामध्ये आयबीआरव्ही ची लागण नाही असेच जनावर खरेदी करावे.

- भारतामध्ये या आजाराच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध नाही.

उपचार:

- आजाराची लक्षणे आढळताच ताबडतोब पशुवैद्यकाशी संपर्क साधून उपचार करावेत.

संपर्क ः डॉ.विठ्ठल धायगुडे, ९८६०५३४४८२

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com