Animal Care : निकृष्ट चारा, पशुखाद्याचे वाढवा पोषणमूल्य

निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याची पचनीयता वाढविण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेला चारा जनावरांना दिल्याने कोटी पोटात त्यांचे चांगले पचन होते. प्रक्रिया केल्यामुळे पशुखाद्याची पचनीयता १० ते २० टक्के वाढते. त्याचा दूध उत्पादनासाठी फायदा होतो.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. समीर ढगे,

डॉ. उल्हास गायकवाड,

डॉ. तुषार भोसले

मुख्य पिकाची कापणी (Crop Harvesting) झाल्यानंतर उर्वरित भाग जसे गव्हाचे कांड, भाताचे पिंजार, उसाचे चिपाड, बाजरीचे सरमाड (Crop Residue) इत्यादींमध्ये साखरेचे (स्टार्च) प्रमाण अत्यंत कमी असून, जनावरांना पचण्यासाठी जड सेल्युलोज, हेमीसेल्युलोजचे प्रमाण जास्त असते. याशिवाय नत्र, क्षार, प्रथिने यांचे प्रमाण अत्यल्प असते. परंतु लिग्निन प्रमाण अधिक असते. लिग्निन, सेल्युलोज आणि हेमीसेल्युलोजशी संयोग साधून या कर्बोदकांची पचनीयता परिणामकारकरीत्या कमी करते. (Animal Feed)

ज्या चाऱ्यात प्रथिने, सहज विद्राव्य कर्बोदके यांचे प्रमाण अधिक असते आणि लिग्निनचे प्रमाण अत्यल्प असते, त्या चाऱ्याची पचनियता अधिक असते. रवंथ करणारी जनावरे सूक्ष्मजीव जंतूंच्या साह्याने अन्नाचे पचन मोठ्या प्रमाणात करतात. हे पचन कोठी पोटात होत असते. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होण्यासाठी या सूक्ष्मजीव जंतूंची वाढ कोटी पोटात मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक असते.

परंतु या जीवजंतूंच्या वाढीसाठी आवश्यक प्रथिने तसेच इतर मूलद्रव्ये जसे सल्फर, फॉस्फरस, कॅल्शिअम आणि कोबाल्ट यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने जीवजंतूंची अन्न पचवण्याची क्षमता परिणामकारकरीत्या कमी होते. म्हणूनच निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याची पचनीयता वाढविण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

वाळलेल्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यात कोटी पोटातील जीवजंतूंच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये नसल्याने त्यांची वाढ मंदावते. कोटी पोटातील अन्नाच्या पचनास अधिक कालावधी जातो. त्यामुळे अन्नाची पचनसंस्थेतील हालचाल व वहन मंद गतीने होते. त्यामुळे अन्न ग्रहण कमी होऊन जनावरे अशक्त होतात. म्हणूनच निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यातील पोषणमूल्ये वाढवणे आवश्यक आहे.

गव्हाचे काड, भात पिंजाराचा वापर

गव्हाचे काड पाण्यात भिजवून खाऊ घातल्यास त्याचे सेवन वाढते. पोटात वोलाटाइल फॅटी ॲसिडची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. भात पिंजारामध्ये ऑक्झालेटचे प्रमाण अधिक असते. त्यातील अधिकाधिक भाग हा विद्राव्य पोटॅशिअम ऑक्झलेट आणि कॅल्शिअम ऑक्झलेटच्या स्वरूपात असतो भाताचे पिंजार पाण्यात भिजविल्यास ऑक्झलेटचे प्रमाण कमी होते. त्याद्वारे अन्नद्रव्याचे पचन चांगले होण्यास मदत होते. शरीरातील कॅल्शिअम शरीराबाहेर टाकण्याचे परिणाम कमी होते.

पशुखाद्य प्रक्रिया

प्रक्रिया केल्यामुळे पशुखाद्याची पचनीयता १० ते २० टक्के वाढते. त्याचा दूध उत्पादनासाठी फायदा होतो. पशुखाद्यातील कणांचा आकार लहान करणे आवश्यक असते. त्यामुळे खाद्याचे सेवन वाढते किंवा खाद्याची पचनीयता वाढते. उदा. धान्य दळणे किंवा भरडा करणे. पशुखाद्यातील पाण्याचे प्रमाण कमी केल्यामुळे साठवणूक चांगली होते. आकारमानाने मोठे असलेले पशुखाद्यांची गोळ्या बनवाव्यात. यामुळे अन्नद्रव्यांची घनता वाढवता येते. वाहतुकीचा खर्च कमी होतो.

Animal Care
Animal Diet : जनावरांच्या आरोग्यासाठी लोह महत्त्वाचे

पशुखाद्यामध्ये मळी किंवा इतर घटक मिसळले जातात. जेणेकरून पशुखाद्य अधिक रुचकर बनते. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणे शक्य आहे. ज्वारीतील प्रथिनांची उपलब्धता फार कमी असते. यामध्ये स्टार्चचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. परंतु स्टार्चचे ‘जिलेटिनायझेशन’ करून स्टार्च कणिका तयार केल्यास त्याची पचनीयता वाढते. खाद्याच्या गोळ्या करून कोंबड्यांना खाऊ घातल्यास फॉस्फरस या क्षाराची उपलब्धता वाढते.

कपाशीच्या बियांमध्ये ‘गॉसिपॉल’ नावाचा विषारी घटक असतो परंतु या बियांना उष्णता देऊन त्यातील गॉसिपलचे प्रमाण घालवता येते. तसेच सोयाबीनमध्ये असलेले ट्रिप्सीन, चाअमोट्रिप्सीन या विकरांना बाधा आणणारे विषारी घटक उष्णतेच्या प्रक्रियेने नष्ट करता येतात. हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा उत्तम दर्जाचा मुरघास तयार करता येतो. जो अधिक काळ टिकू शकतो. पशुखाद्यावर वाढणाऱ्या अनावश्यक बुरशीपासून त्याचे संरक्षण करता येते किंवा बुरशी पासून तयार होणाऱ्या अफलाटॉक्सिनसारख्या विषारी घटकांचे निर्मूलन होते. अमोनिया किंवा अमोनिअम हायड्रॉक्साइडच्या प्रक्रियेने विषारी घटकांचे नियंत्रण करता येते.

Animal Care
Animal Feed : पशु आहारात कॅल्शिअम का आहे गरजेचे?

पशुखाद्यातील कणांचे आकारमान

कमी करण्यासाठी प्रक्रिया

धान्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती

अ) शुष्क प्रक्रिया पद्धती

दळणे

पशुखाद्य कणांचे आकारमान लहान करण्याची सर्वांत सोपी व साधी पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पशुखाद्य तयार करण्यासाठी वेगवेगळ्या खाद्यात मिश्रण तयार करण्यासाठी, अगोदर दळून लहान करणे आवश्यक असते.

धान्याचा भरडा किंवा बारीक दळून पीठ तयार करता येते. याकरिता हॅमरमिलचा वापर करता येतो. मध्यम ते बारीक आकाराचे दाणे दळून त्याचे मध्यम ते बारीक आकाराचे कण तयार करणे अत्यंत उपयुक्त ठरते. अति बारीक दळल्यास त्याची पावडर होते. जनावरांना खाताना अडचणीचे होते. अति पिठाळ दळल्यास तसेच अति पिठाळ खाऊ घातल्यास गायीच्या दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

कणांचा आकार बारीक झाल्याने अन्नाचा पृष्ठभाग वाढतो. ज्यामुळे पचनास मदत होते. पाचक विकारांची प्रक्रिया वेगाने होते.

खाद्य चांगल्या पद्धतीने पचन होऊन जनावरांच्या उत्पादनात वाढ होते.

वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व इतर खाद्य यांचे मिश्रण करणे सोपे होते.

धान्य एकत्र मिसळून त्याच्या गोळ्या बनविणे शक्य होते.

जे खाद्य जनावरे आवडीने खात नाही ते देखील आवडीने खातात. खाद्याचा अपव्यय टाळता येतो.

खाद्य चावून खाण्यासाठी जी ऊर्जा लागते, त्यामध्ये बचत होते.

पचनसंस्थेतून पुढे पुढे जाण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत बचत होते. पचन चांगल्या पद्धतीने होऊन खाद्य सेवन वाढते.

पॉपिंग आणि पफिंग

धान्याच्या लाह्या तयार करता येतात. १५ ते २० सेकंद कोरडी उष्णता देऊन (३७० ते ४२५ अंश सेल्सिअस) धान्याच्या लाह्या तयार करता येतात. यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा कमी असते. धान्यापेक्षा धान्याच्या लाह्याचा रुचकरपणा अधिक असतो. त्यामुळे खाद्यसेवन ५ ते १० टक्क्यांपर्यंत अधिक होते.

मायक्रोनायझिंग

लाह्या बनविण्याची ही आधुनिक पद्धती असून इन्फ्रारेडचा वापर करून लाह्या बनविल्या जातात.

रोस्टिंग

तृणधान्य आगीच्या ज्योतीतून १४८.९ अंश सेल्सिअस या तापमानातून नेले जाते. त्यामुळे धान्याचा आकार वाढतो. पचनास सोपे जातात.

ब) ओलसर प्रक्रिया पद्धती

भिजविणे

धान्य १२ ते २४ तास पाण्यात भिजवून जनावरांना खाऊ घातले जातात. खुराक देखील १२ ते २४ तास पाण्यात भिजवून जनावरांना खाऊ घातला जातो. मोहरी पेंड, निंबोळी पेंड, सरकी पेंड पाण्यात भिजविल्याने त्यातील विषारी घटकांचा नाश होतो.

स्टीम रोलिंग

धान्यावर वाफेची प्रक्रिया वेगवेगळ्या कालावधीसाठी केली जाते. धान्य हे वाफेवर वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या दबावाखाली प्रक्रिया केले जाते. त्यानंतर त्यावर रोलिंग केले जाते.

वरील प्रक्रियेच्या बरोबरीने वाफ प्रक्रिया व शाल्कीभवन, हवेच्या दाबाखाली शिजवणे, लाह्या तयार करणे, दीर्घकाळ भिजवणे, गोळ्या तयार करणे या प्रक्रिया देखील धान्यावर करता येतात.

वाळलेल्या चाऱ्यातील पोषणमूल्ये

वाळलेला चारा / भुसा पोषणमूल्ये (टक्के)

पचनीय प्रथिने (टक्के) एकूण पचनीय अन्नद्रव्ये (टक्के)

भाताचा पेंढा ०.२ ४५.९

गव्हाचा पेंढा ०.० ४८.३

नाचणी भुसा ०.२ ५०.०

हरभरा भुसा २.२ ५१.०

बाजरी सरमाड ०.८ ४८.०

ज्वारी कडबा १.० ५१.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com