Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Animal Husbandry : कोणत्याही आजाराची बाधा झाल्यानंतर जनावरांमध्ये लसीकरण करणे योग्य ठरत नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस टोचून घ्यावी. नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य होते.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon

डॉ. प्रज्योत दखने, डॉ. आकाश सूर्यवंशी, डॉ. गणेश थोरात

Vaccination in Animals :

बदलत्या ऋतुमानानुसार पशुधन

व्यवस्थापनात योग्य बदल करणे गरजेचे आहे. बदलत्या वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी आहार, आरोग्य व्यवस्थापनावर वेळोवेळी बदल करणे क्रमप्राप्त ठरते. बदलत्या वातावरणामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. कोणत्याही आजाराची बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, केव्हाही फायद्याचे ठरते.

पावसाळ्यामध्ये जनावरांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. अशक्त जनावरे आजारांस लगेच बळी पडतात. काही आजारांमध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते. जनावरांमध्ये कोणत्याही आजाराची बाधा झाल्यानंतर त्यांच्या उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. संसर्गजन्य किंवा साथी आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे गरजेचे ठरते. त्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण फायदेशीर ठरते.

Animal Vaccination
Animal Care : राज्यात ३० हजार जनावरांत ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञान वापरणार

लसीकरणाचे महत्त्व

पावसाळ्यापूर्वी मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या आजारांविरुद्ध तर शेळ्या-मेंढ्यामध्ये पीपीआर, आंत्रविषार, देवी आणि घटसर्प या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे ठरते.

आजाराची बाधा होण्यापूर्वी लसीकरण करणे गरजेचे आहे. कारण लस टोचल्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास किमान १५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आजाराची बाधा झाल्यानंतर किंवा साथ आल्यानंतर लसीकरण करणे फायद्याचे ठरत नाही.

लसीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनिर्मूलनाचे औषध दिले पाहिजे. यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोचीड, गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा.

जनावरांना आहारातून क्षार मिश्रणांचा व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. यामुळे जनावरांना टोचलेल्या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन चांगले परिणाम होतात.

लसीकरणासाठी नेहमी नामांकित कंपनीची लस निवडावी. कारण या लसीवर योग्य संशोधन आणि चाचण्या झालेल्या असतात.

लस योग्य तापमानात म्हणजे कोल्ड चेनमध्ये ठेवूनच लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.

जनावरांना लागणाऱ्या बहुतांश लसी या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असतात. काही कारणामुळे लस उपलब्ध नसल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाजारातून लस उपलब्ध करून घ्यावी.

Animal Vaccination
Animal Care : जनावरांतील उष्माघाताची कारणे, काळजी, उपाय

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

लसीकरण नेहमी तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच करावे.

लसीकरणासाठी चांगल्या नामांकित कंपनीची लस वापरावी.

लस खरेदी करताना औषध कालबाह्य होण्याची तारीख तपासून पाहावी.

जनावरांना ठरावीक मात्रेमध्येच लस द्यावी. दिलेल्या लशीचा बॅच क्रमांक नोंद ठेवावी.

लस जनावरांना टोचेपर्यंत थंड व कोरड्या ठिकाणी ठेवावी.

लसीकरण नेहमी निरोगी जनावरांचेच करावे.

गाभण जनावरे तसेच ६ महिन्यांखालील वासरांना लस देऊ नये.

लसीकरण शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे.

लसीकरणासाठी वापरली जाणारी सुई प्रत्येक वेळी बदलावी किंवा निर्जंतुक करावी.

उघड्यावरील लस जनावरांना टोचू नये. जनावरांमध्ये कोणत्याही आजाराची बाधा झाल्यानंतर लसीकरण करणे योग्य ठरत नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस टोचून घ्यावी.

फोडलेली लस लवकरात लवकर संपवावी. लसीचा साठा करू नये.

दुग्ध व्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांना कोणत्याही प्रकारच्या आजाराची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट होते. जनावरांची कार्यक्षमता कमी होते. मिळणाऱ्या उत्पादनाची प्रतही खालावते. लसीकरणामुळे जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. मात्र ही रोगप्रतिकारशक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते. त्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच लसीकरण करावे.

गाई, म्हशींमधील लसीकरण

आंत्रविषार (Enterotoximia) मे, जून महिन्यांत

घटसर्प (गळसुजी) दरवर्षी मे, जून महिन्यात (पावसाळ्यापूर्वी)

एक टांग्या किंवा फऱ्या दरवर्षी मे, जून महिन्यांत (पावसाळ्यापूर्वी)

तोंडखुरी (F.M.D.) दरवर्षी मार्च, एप्रिल व नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत.

पीपीआर (P.P.R.) मे, जून किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत

डॉ. प्रज्योत दखने, ७९७२७९११६२, (पशुशल्य चिकित्सक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com