रोगजंतू आणि रोगजंतूंना अनुकूल परिस्थिती या दोन गोष्टी कुठलाही रोग होण्यास कारणीभूत ठरतात. रोगजंतूंनी शरीरात प्रवेश केला तरी अनुकूल परिस्थिती नसल्यास रोग होऊ शकत नाही किंवा रोगाचा प्रादुर्भाव (Disease Attack) कमी प्रमाणात दिसून येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोंबड्यांमध्ये जिवाणू (Bacteria), विषाणू (Virus) आणि एकपेशीय जंतूपासून होणाऱ्या रोगांची माहिती दिली आहे. यामध्ये कोंबड्यांना (Poultry) पुढील रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
१. जिवाणूंपासून होणारे रोग
कॉलरा - या रोगामध्ये कोंबड्या अचानक मरतात, कोंबड्यांना हिरवट पातळ विष्ठा होते, ताप येतो. उपचार करताना पशूवैद्यकाच्या सल्ल्याने औषधे खाद्यातून व पाण्यातून दिली जातात.
पांढरी हगवण - हा लहान पिलांमध्ये होणारा रोग आहे. यामध्ये पिलांना पांढरी विष्ठा होते. पोट दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.
निळा तुरा - मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग अढळून येतो. यामध्ये कोंबड्यांना ताप येतो. आणि तुरा निळा पडतो.
२. विषाणूंपासून होणारे आजार
राणीखेत - या रोगाला मानमोडी असेही म्हणतात. या रोगामध्ये कोंबड्याची मान वाकडी होते. श्वास घेण्यासाठी त्रास होतो. या रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण करुन नियंत्रण मिळवता येते.
देवी - कोंबड्यांना केस नसलेल्या भागावर फोड उठून खपल्या बसतात. कोंबड्यांना ताप येतो. रोगावर नियमित लसीकरण करुन रोगावर नियंत्रण मिळवता येते.
गंबोरो - पक्षामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या अवयवावर या रोगाचा परिणाम होतो. प्रतिकारशक्ती नष्ट होते. कोंबड्या कोणत्याही रोगाला सहज बळी पडतात. लसीकरण हाच या रोगावर प्रभावी उपचार आहे.
मॅरेक्स - १ ते १५ दिवसाच्या पिलांना हा रोग होतो. पिले पांगळी होऊन मरतात. एक दिवसाच्या पिल्लांना या रोगाची लस पायाच्या स्नायूमध्ये टोचली जाते.
३. एकपेशीय जंतूपासून होणारे रोग (अमीबा)
कॉक्सीडिओसीस - कॉक्सीडिओसीस म्हणजेच रक्ती हगवण हा रोग १ ते ६ आठवड्यांच्या कोंबड्यांना जास्त प्रमाणात होतो. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधे खाद्यातून आणि पाण्यातून द्यावीत.
अंतर्गत जंत - कोंबड्यांना गोल व चपट्या जंतांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कोंबड्यांची भूक मंदावते आणि कोंबड्या अशक्त होतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.