कोंबड्या का पाळाव्यात?

कुक्कुटपालन हा व्यवसाय जरी शेतीपूरक असला तरी त्यातून चांगली रोजगारनिर्मिती होऊन स्वतंत्र व्यवसाय बनू शकतो.चिकन, अंडी यांना भारतातच नाही तर जगभरातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Backyard Poultry Rearing
Backyard Poultry Rearing

कुक्कुटपालन हा व्यवसाय जरी शेतीपूरक असला तरी त्यातून चांगली रोजगारनिर्मिती होऊन स्वतंत्र व्यवसाय बनू शकतो. चिकन, अंडी यांना भारतातच नाही तर जगभरातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अत्यंत कमी जागेत करता येतो. तसेच कुक्कुटपालन करण्यासाठी आपलं शासनही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक घरात दूध-दुभत असण्याची प्रथा होती, याचबरोबर परसबागेत एकदोन कोंबड्याही असायच्या. आपल्या देशात इथूनच कुक्कुटपालनाची मुळे रोवली गेली आहेत. सततची वाढणारी मागणी त्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी व्यावसायिक तत्वानुसार कुक्कुटपालनाची सुरुवात झाली. मांस आणि अंड्याच उत्पादन तर मिळतच सोबतच कोंबडी खताचा वापरही शेतीमध्ये करून मातीची सुपीकता वाढवू शकतो. व्यावसायिक तत्त्वावर अंडी उत्पादनासाठी वापरल्या जाणा-या कोंबड्याना ‘लेअर' तर मांस उत्पादनासाठीच्या कोंबड्याना 'ब्रॉयलर' असं म्हणतात. परसबागेतील कोंबडी पालनास अत्यंत कमी खर्च लागत असून या कोंबड्या उघड्यावर पडलेले धान्य, किडे-मुंग्या, स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ खाऊन जगतात. यामुळे खाद्यावरील खर्चात मोठी बचत होते. देशी कोंबड्यांसारख्या दिसणाऱ्या व तेवढ्याच काटक अशा वनराजा, गिरीराजा, ग्रामप्रिया यांसारख्या अनेक जाती आहेत. यातील प्रत्येक जातीच्या कोंबड्यांची वैशिष्ट्ये वेग-वेगळी आहेत.

ग्रामीण भागातील अंडी व मांसाची कमतरता भरून काढण्यासाठी परसातील कोंबडीपालन हा एक चांगला पर्याय आहे. या व्यवसायात देशी जातीच्या स्थानिक कोंबड्या वापरल्या जातात. त्यांचे अंडी उत्पादन अल्प असते. अशा परिस्थितीत, देशी जातीच्या पक्ष्यांऐवजी विकसित जातीचे पक्षी परसबागेत वाढविल्यास ग्रामीण भागातील अंडी व मांसाचे उत्पन्न वाढून ग्रामीण भागातील गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच या माध्यमातून भूमिहीन, गरीब, शेतमजूर यांच्या अन्नातील प्रथिनांची गरज भागून कुपोषण थांबविण्यास मदत होईल. देशी कोंबड्यांची अंडी आणि मांस उत्पादन क्षमता सहसा कमी असते यासाठी सुधारित कोंबड्यांच्या जाती अंडी आणि मांस उत्पादनासाठी वापरून अंडी आणि मांस उत्पादन सुधारले जाऊ शकते. परसातील कोंबडीपालनामुळे अतिरिक्त उत्पन्नाबरोबरच कुटुंबातील सदस्यांना अतिरिक्त प्राणीजन्य प्रथिनेही मिळतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com