Hybrid Calves Crisis : संकरित गाईंची नर वासरे झाली नकोशी

Cow Slaughter Ban : दूध उत्पादनाला प्राधान्य दिले जात असले तरी संकरित दुभत्या गाईंचे नर वासरे शेतकऱ्यांना नकोशी झाली आहेत. शेतीसह कोणत्याही कामी येत नसलेली नर वासरे पोसण्याचा खर्च पोलावत नसल्याने शेतकरी हतबल आहेत.
Hybrid Calves
Hybrid Calves Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : दूध उत्पादनाला प्राधान्य दिले जात असले तरी संकरित दुभत्या गाईंचे नर वासरे शेतकऱ्यांना नकोशी झाली आहेत. शेतीसह कोणत्याही कामी येत नसलेली नर वासरे पोसण्याचा खर्च पोलावत नसल्याने शेतकरी हतबल आहेत.

ही वासरे कत्तसीसाठी विक्री केली जात होती. मात्र गोवंश हत्या बंदीच्या होणाऱ्या त्रासामुळे कुरेशी समाजाने गायवर्गीय जनावरे खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असल्याने अशा वासरांची खरेदी-विक्री बंद आहे. त्याचा ताण येऊन आर्थिक गणित बिघडले असल्याने अशी वासरे निर्जनस्थळी मोकाट सोडले जात आहे. राहुरी तालुक्यात असा प्रकार उघडकीस आला.

Hybrid Calves
Cow Slaughter Ban: गोवंश हत्याबंदी: पशुपालनाचा घातक अडथळा

राज्यातील अहिल्यानगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूर, मराठवाड्यासह विदर्भातील बऱ्याच भागात दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. बऱ्यापैकी दूध देणाऱ्या संकरित (एचएफ) गाईंचे बहुतांश शेतकरी पालन करतात. दुभत्या गााईने मादी वासराला जन्म दिला तर त्याचे जतन केले जाते.

मात्र नर वासराला जन्म दिला तर त्याचे पालन पोषण करणे शेतकऱ्यांना खर्चिक ठरत आहे. संकरित गाईंची नर वासरे पुढे शेतीच्या बैलकामालाही कामी येत नाहीत. त्यामुळे त्याला पोसण्यात खर्च न करता भाकड जनावरांसारखेच बहुतांश शेतकरी जन्मानंतर काही दिवसांत त्याची विक्री करतात.

अशी वासरे कत्तलीसाठी विकली जातात. मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून गोवंश हत्या बंदीमुळे परवाने असूनही भाकड जनावरे व संकरित गाईंची नर वासरे खरेदी केली तर त्याचा त्रास होतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कुरेशी समाजाने अहिल्यानगर येथे बैठक घेऊन गोवंशातील जनावरे खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतल्याने काही दिवसांपासून खरेदी बंद आहे. त्याचा आर्थिक ताण शेतकऱ्यांवर येत असून आर्थिक गणित बिघडत जात आहे. त्याचा परिणाम आता संकरित गाईंची नर वासरे निर्जन स्थळी सोडून देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

राहुरी तालुक्यातील करजगाव, बोधेगाव शिवारात असे प्रकार दिसून आले. शेतीमध्ये आता यांत्रिक साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने बैलांची गरज उरलेली नाही. परिणामी नर जातीची जनावरे आर्थिक दृष्टिकोनातून निरुपयोगी ठरू लागली आहेत.

Hybrid Calves
Pankaja Munde: गोवंश हत्याबंदी कायदा बळकट करणार: पंकजा मुंडे

रानावनात मोकाट वासरांची संख्या वाढतेय, यामुळे पर्यावरणीय प्रश्‍नही निर्माण होऊ शकतो. निर्जनस्थळी अशी वासरे सोडल्यावर मोकाट कुत्र्यांकडूनही वासरांवर हल्ले होण्याचे प्रकार होत आहेत. वासरे जोपासली तर खर्च परवडेना आणि सोडावी तरी कोठे अशा अवस्थेत शेतकरीही हतबल झाले आहेत.

गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे संकरित गाई व त्यांच्यापासून होणाऱ्या नर गोऱ्यांच्या व्यवस्थापनाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांना किमान ९० दिवस गाईच्या दुधावर जगवावे लागते. त्यामुळे हजारोंचा खर्च येतो. यापूर्वी अशा जनावरांना काही प्रमाणात मूल्य मिळत होते, आता मात्र शेतकऱ्यांना त्यांना सोडून देण्याची वेळ येते. गोवंश रक्षण देशी गाईपुरते मर्यादित असावे; संकरित व भाकड गाईंचा यात समावेश करून दूध व्यवसायच अडचणीत आला आहे. नैसर्गिक दुधाला भाव नाही, भेसळ वाढतेय आणि शेतकरी कर्जबाजारी होतोय.
- अनिल औताडे, दूध उत्पादक शेतकरी तथा जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com