Livestock Management: उष्णतेचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम! उपाय काय?

Animal Health: वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवर होत आहे. जनावरांचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते.
Animal Health
Animal HealthAgrowon
Published on
Updated on

Animal Care: दुधाळ जनावरांतील प्रजननात वेगवेगळे वातावरण बदलानुसार दुष्परिणाम दिसतात. तसेच प्रजनन संस्थेत अनेक बदल दिसून येत असतात. यामध्ये प्रामुख्याने माजाची तीव्रता कमी होत असते. माजाची लक्षणे बंद होतात.शरीरात संप्रेरकाची कमतरता होते. तात्पुरता वंधत्वपणा येतो. गर्भधारणेचे प्रमाण कमी होते, वार अडकतो.गर्भपात होतो. वासराची गर्भाशयातील वाढ खुंटते. दुधाला जनावरे अशक्त किंवा कमजोर होतात. आजारास लवकरच बळी पडतात. उष्णतेचा दुष्परिणाम म्हशीमध्ये जास्त दिसून येतो.

Animal Health
Animal Care : जनावरांतील लोहाची कमतरता अशी ओळखा

उपाययोजना

गोठ्यामध्ये उष्णता कमी करण्यासाठी हवा खेळती आणि थंड राहण्याची सोय करावी. साधारणपणे गोठ्याची उंची मध्यभागी १३ ते १५ फूट आणि बाजूच्या भिंती ८ फूट असाव्यात. त्यामुळे गोठ्यात पुरेशी हवेशीर जागा मिळेल.

जनावरांना २४ तास थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावे.

जास्त उष्ण काळामध्ये दर अर्धा ते एक तासाने जनावराचे अंगावर पाणी टाकावे. शक्य असल्यास सूक्ष्म तुषार संचाचा वापर करून गोठ्यातील वातावरण थंड ठेवता येते.

Animal Health
Animal Care : जनावरे गाभण न राहण्याची कारणे

गोठ्यामध्ये पंखे किंवा कूलरचा वापर केल्यास वीस टक्यांपर्यंत उत्पादन वाढून प्रजनन क्षमता वाढू शकते.

गोठ्याच्या छताला ॲसबेसटॉस पत्रे वापरल्यास गोठा थंड राहण्यास मदत होते. पत्र्याचे छत असल्यास त्यावर गवताचे आच्छादन किंवा ऊस पाचट, तुराट्या, पऱ्हाट्याचे आच्छादन केल्यास उन्हाळ्यात जनावरांचा उष्णतेपासून संरक्षण होते.

बहुतांश गोठे हे पत्र्याचे आहेत. या पत्र्यांना बाहेरच्या पृष्ठभागावर पांढरा रंग दिल्यास ७५ टक्के उष्णतेचे वातावरणात परावर्तन होऊन गोठा थंड राहण्यास मदत होते.

सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास गोठ्याभोवती चारा लागवड, पिकांची लागवड किंवा मोठी झाडे लावावीत. त्यामुळे गोठ्यात येणारी हवा थंड होते. तसेच गोठ्यातील वातावरण थंड राहण्यास मदत होते.

गोठ्याच्या छताचा आकार ‘A’ सारखा असल्यास बऱ्याच अंशी उष्णतेपासून संरक्षण होते.

कमी तंतुमय पदार्थ व उच्च ऊर्जा घटक तसेच जीवनसत्वे, खनिजे योग्य प्रमाणात दिल्यास दुधाळ जनावरे उन्हाळ्यात सुद्धा योग्य पद्धतीने माज दाखवून गाभण राहू शकतात.

- डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६

(प्राध्यापक, पशू प्रजनन शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com