Animal Care : जनावरे गाभण न राहण्याची कारणे

Team Agrowon

प्रजनन संस्थेचे आजार

मादी जनावरांमध्ये प्रजनन संस्थेचे अनेक आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्‍याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

Animal Care | Agrowon

पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार

महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यामुळे अशा आजारांची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करणे गरजेचे असते.

Animal Care | Agrowon

गर्भाशयाचा दाह

गर्भाशयातून पू येणे त्याचा कुजट वास येणे. गर्भाशय मोठे व मऊ होणे. वार पूर्णपणे न पडणे व गाय वारंवार उलटणे.

Animal Care | Agrowon

इन्फेक्शीयस बोवाईन रिनोट्रायकीयासीस

एकाकी ताप चढणे, नाकातून चिकट स्त्राव येणे, ढासने, योनीमार्गात पूवाच्या गाठी तयार होणे. डोळे लाल होणे. गर्भपात होणे. वारंवार उलटणे.

Animal Care | Agrowon

व्हीब्रीओसीस

चार ते पाच महिन्याचा गर्भपात होणे. वारंवार उलटणे, गाभ उशिरा धरणे. माज न दाखविणे.

Animal Care | Agrowon

लेप्टोस्पायरोसीस

एकाएकी ताप चढणे. भूक मंदावणे. कोणत्याही कालावधीत गर्भपात होणे. तांबडी लघवी होणे. अशक्तपणा जाणवणे. चिकट दूध येणे.

Animal Care | Agrowon

ब्रुसोलोसीस

६ ते ७ महिन्याचा गर्भपात होणे. वार व्यवस्थित न पडणे, वारंवार उलटणे, गर्भाशयाचा दाह वाढणे.

Animal Care | Agrowon

ट्रायकोमोनीओसीस

२ ते ३ महिन्याचा गर्भपात होणे, गर्भाशयाचा दाह होऊ पु तयार होणे. अनियमित माज दाखविणे, वारंवार उलटणे.

Animal Care | Agrowon

Rose Market : व्हॅलेंटाइन डे, लग्नसराईमुळे गुलाबाची कळी खुलली ; गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ

आणखी पाहा...