Fodder Crop Harvesting : चारा पिकाची वेळेवर कापणी करा

Green Fodder : चारापिकांची लागवड केल्यानंतर त्यांची ठरावीक वेळी कापणी करून पशुआहारात वापर करणे गरजेचे आहे. वेळेवर कापणी न केलेला चारा जनावराला न दिल्यामुळे काय होते? आणि चाऱ्याची कापणी नेमकी केंव्हा करावी?
Fodder Crop Harvesting
Fodder Crop HarvestingAgrowon

Fodder Crop : पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे या काळात जनावरांना हिरवा चारा किंवा गवतच जास्त प्रमाणात दिलं जातं.

हिरव्या चाऱ्यामध्ये (Green Fodder) प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे हे जास्त प्रमाणात असले तरी जनावरांना हिरवा चारा देताना तो योग्य प्रमाणातच दिला पाहिजे.

चारापिकांची (Fodder Crop) लागवड केल्यानंतर त्यांची ठरावीक वेळी कापणी करून पशुआहारात वापर करणे गरजेचे आहे. वेळेवर कापणी न केलेला चारा जनावराला न दिल्यामुळे काय होते? आणि चाऱ्याची कापणी नेमकी केंव्हा करावी?

अधिक उत्पादनासाठी आणि जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी हिरवा चारा दैनंदिन आहारात देणं गरजेचं आहे.

जनावराच्या आहारात साधारणपणे ७० टक्के हिरव्या चाऱ्याचे प्रमाण असावे लागते. बरेच शेतकरी जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळावा यासाठी शेतात चारा पिकाची लागवड करतात.

चाऱ्याची कापणी मात्र वेळेवर करत नाहीत. चाऱ्याची लवकर कापणी आणि उशिरा कापणी केल्यास अशा चाऱ्यामुळे जनावरांचे कुपोषण होत असते. याकरिता प्रत्येक चारापिकांची योग्य काळातच कापणी करावी.

Fodder Crop Harvesting
Fodder Crop Management : एकदल हंगामी चारा पीकाच नियोजन कसं करावं?

योग्यवेळी कापणी केल्यास चारा उत्पादन आणि चाऱ्याची प्रत उत्तम राहते. चाऱ्याची लवकर कापणी केल्यास त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त राहाते, इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण कमी असते.

त्यामुळे असा चारा जनावरांना दिल्यानंतर जनावरांमध्ये दूध उत्पादन थोडेसे वाढलेले दिसेल परंतु दुधातील फॅट व इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण कमी झालेले दिसेल. याबरोबरच जास्त हिरवा चारा खाल्ल्यामुळे जनावरांचे शेण पातळ होण्याची समस्या दिसते.

याउलट चारा निबर झाल्यानंतर त्यामधील रसाचे प्रमाण कमी होऊन तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढते. तर इतर पोषणतत्वांचे प्रमाण कमी होते. अशा चाऱ्याची पचनक्षमता कमी असते. त्यामुळे चाऱ्याची योग्य वेळी कापणी करण आवश्यक आहे.

Fodder Crop Harvesting
Barsim Crop : बरसीम चारा पिकाची लागवड

बहुवर्षीय चारापिकांमध्ये योग्य स्थितीत कापणी केल्यामुळे पुढील वाढ जलद होऊन चारा उत्पादन जास्त मिळते. चाऱ्याची उशिरा कापणी केल्यास चाऱ्यातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढून पुढील वाढ खुंटते.

उदाहरण द्यायच झालं तर, धारवाड हायब्रीड नेपियर या चाऱ्याची कापणी ४५ ते ७० दिवसांच्या दरम्यान केल्यास पौष्टिकता चांगली असते व पुढे वाढही जलद होते. चारा पिकांची कापणी करताना चारापिकांचे केवळ पाने किंवा धाट येणार नाही तर संपूर्ण भाग येईल याची काळजी घ्यावी.

चाऱ्याची केवळ पाने किंवा केवळ धाट आहारात वापरून जनावरांचे योग्य पोषण होणार नाही. चारा कापणी करताना त्याच्यासोबत शेतातील तण मिसळणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा, जनावरांच्या आहारातून मिळणाऱ्या पोषणतत्त्वांच्या प्रमाणात घट होते. 

संकरित नेपियर वर्गीय चारा पिकांची कापणी जमिनीलगत करावी. दशरथ सारख्या चाऱ्याची कापणी जमिनीपासून ३० ते ३५ सेंटीमीटर bj केल्यास फुटव्यांची संख्या वाढून उत्पादन जास्त मिळते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com