Fodder Crop Management : एकदल हंगामी चारा पीकाच नियोजन कसं करावं?

Kharif Season fodder crop : समीश्र चारा उत्पादन हे जनावराच्या समतोल आहाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे साध्य करण्यासाठी एकदल व व्दिदल चारा पिकाच नियोजन करण आवश्यक आहे.
Fodder Crop Management
Fodder Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

Fodder Crop : दुभत्या जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध असणे हा यशस्वी दुग्धोत्पादनाची पहिली पायरी आहे. समीश्र चारा उत्पादन हे जनावराच्या समतोल आहाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे साध्य करण्यासाठी एकदल व व्दिदल चारा पिकाच नियोजन करण आवश्यक आहे.

जनावरांच्या आहारात एकदल व्दिदल चा-याचे प्रमाण निम्मे निम्मे असावे.भरपुर व उत्कृष्ट प्रतीचा चारा सातत्याने मिळण्यासाठी धान्य पीकाप्रमाणेच चारा पीक लागवडीचे नियोजन करावे.

योग्य चारा पीकाची निवड, जमीनीची निवड, शेतमशागत, योग्य वाणाची निवड, खत पाणी व्यवस्थापन या गोष्टी विचारात घेऊन चारा पीकाची लागवड करावी.

खरीप हंगामात कोणत्या एकदल हंगामी चारा पीकांची लागवड करावी याविषय़ीची माहिती पाहुया. 

ज्वारी 

मध्यम जमिनीत ज्वारी या चारा पिकाची लागवड करता येते.  एक नांगरट व २ ते ३ वेळा वखरणी करुन जमीन तयार करावी. जून जुलै या कालावधीत पेरणी करावी.

लागवडीसाठी रुचीरा आर-४-११, मालदांडी ३५-१, निळवा, एमपी चारी, पुसा चारी, आय एस ४७७६, एएसजी १४, एमकेव्ही चारी या वाणांची निवड करावी.

पेरणीसाठी हेक्टरी २० किलो बियाणे लागते. पेरणी ३० बाय ४५ सेंमी अंतरावर पाभरीने करावी. ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. अशा पद्धतीने लागवड केल्यास चाऱ्याचे हेक्टरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते. 

Fodder Crop Management
Grass Fodder Management : दशरथ घास चारा लागवडीचे नियोजन कसे करावे?

बाजरी

हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत ज्वारी या चारा पिकाची लागवड करता येते. एक नांगरट व २ वेळा वखरणी करुन जमीन तयार करून पेरणीयोग्य पाऊस पडल्यास जून ते ऑगस्ट या कालावधीत पेरणी करावी.

पेरणी साठी जाएन्ट बाजरा, जाएन्ट बाजरा गराजको यापैकी वाणांची निवड करावी.  पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे लागते.

पेरणी ३० बाय ४५ सेंमी अंतरावर पाभरीने करावी. २०–२५ टन कंपोस्ट, नत्र ८० किलो, स्फुरद ४० किलो आणि पालाश ४० किलो द्यावे. अशा पद्धतीने  लागवड केल्यास चाऱ्याचे हेक्टरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते. 

Fodder Crop Management
Green Manuring : हिरवळीची खते देण्याच नियोजन कसं करावं?

मका 

मका चारा पिकाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत करता येते.  एक नांगरट व २ ते ३ वेळा वखरणी करुन जमीन तयार करून पेरणीयोग्य पाऊस पडल्यास जून ते ऑगस्ट या कालावधीत पेरणी करावी.

पेरणी साठी आफ्रीकन टॉल, मांजरी, कंपोझीट विजय, गंगासफेद डेक्‍कन हायब्रीड यापैकी वाणांची निवड करावी.  पेरणीसाठी हेक्टरी ४०-४५ किलो बियाणे लागते.

पेरणी ३० बाय ४५ सेंमी अंतरावर पाभरीने करावी. २०–२५ टन कंपोस्ट, नत्र ८० किलो, स्फुरद ४० किलो आणि पालाश ४० किलो द्यावे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com