शेळीपालनातून महिलांना आर्थिक सक्षम करणार

सुनील केदार ः राज्यातील पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाचा प्रारंभ
Goat Farming
Goat FarmingAgrowon
Published on: 
Updated on: 

नागपूर : महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत (Women Empowerment) गोट बँकेच्या (Goat Bank) सहकार्याने पाचशे महिलांना शेळ्यांचे वाटप करण्यात येत असून, या योजनेच्या यशस्वितेनंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. महिलांनी शेळीपालनाचा व्यवसाय करून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी सोमवारी (ता. २३) येथे केले.

रामटेक तालुक्यातील अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या बोंद्री येथील प्रक्षेत्रावर गोट बँकेच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना केदार बोलत होते.

Goat Farming
शेळी पालन व्यवसायाला मिळणार चालना; राज्य सरकार राबवणार समूह शेळी योजना 

गोट बँकेच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा महिलांना शेळी ‍वितरणाचा राज्यातील हा पहिला उपक्रम आहे. या वेळी पहिल्या शंभर महिलांना शेळीचे वितरण करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती चाफेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोंडारे, महाराष्ट्र मत्स्य व पशुसंर्धन विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर, गोट बँक ऑफ कारखेड्याचे अध्यक्ष नरेश देशमुख, व्यंकटेश्‍वरा गोट बँकेचे प्रमुख सतीश भांडे, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक पांडे, जिल्हा परिषद सदस्य दुधारामजी सव्वालाखे, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सरंगपते, सरपंच सुषमा भीमनवार, पंचायत समिती सभापती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

केदार म्हणाले, की अमूलच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाची मोठी चळवळ डॉ. कुरियन यांनी राबविली असून, त्याच धर्तीवर राज्यात गोट बँकेच्या माध्यमातून शेळी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शेळीपालनामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार जास्त उत्पादन व लाभ देणाऱ्या प्रजाती विकसित करण्यात येत आहेत. पन्नास किलोपर्यंत वजन असलेल्या शेळीचे संगोपन करताना त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शेळी वितरित करताना सोनोग्राफीसह तपासणी करण्यात येईल. तसेच घरपोच वैद्यकीय सुविधा देण्यात आली आहे. शेळीपासून दूध व मांस याला बाजारपेठेत मागणी वाढत असल्यामुळे निर्यातीलाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सुनील केदार यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com